पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्षपदी प्रविण शिर्के आणि डिजिटल मिडिया अध्यक्षपदी प्रशांत साळुंखे

प्रतिनिधी श्रावणी कामत

पिंपरी, पुणे मराठी पत्रकार संघ मुंबई सलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड डिजिटल मिडियाची द्विवार्षिक निवडणूक मार्च २०२३ ते मार्च २०२५ ची प्रक्रिया शनिवारी मनपा भवन येथील भा. वी. कांबळे पत्रकार कक्ष येथे पार पडली.

यामध्ये पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष प्रविण शिर्के, कार्याध्यक्ष अविनाश आदक, उपाध्यक्ष माधुरी कोराड, गणेश मोरे, अविनाश पर्बत, सरचिटणीस रोहित खगेँ, सहचिटणीस सोमनाथ नाडे, खजिनदार राम बनसोडे, समनवयक राकेश पगारे, प्रवक्ता झुबेर खान, कार्यकारीणी सदस्य तुळशीदास शिंदे, संतोष जाधव, सिताराम मोरे, प्रकाश जमाले, विशाल जाधव तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सदस्य अनिल भालेराव आणि जिल्हा प्रतिनिधी अनिल वडघुले यांची निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब ढसाळ यांनी जाहीर केले.

तसेच पिंपरी चिंचवड डिजिटल मिडियाचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, राजू वारभुवन, देवा भालके, विकास चौधरी, मुझफ्फर इनामदार, सरचिटणीस महाविर जाधव, खजिनदार विनायक गायकवाड आणि प्रवक्ता म्हणून अविनाश कांबिकर यांची निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब ढसाळ यांनी जाहीर केले.

पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष अर्चना मेंगडे, उपाध्यक्ष सिता जगताप, पत्रकार भवन समन्वयक गोपाळ मोटघरे, पत्रकार कॉलनी समन्वयक उत्तम कुटे, सहसमन्वयक दिनेश दुधाळे, पत्रकार महाविद्यालय समन्वयक विजय जगताप, सहसमन्वक प्रमोद गरड, पत्रकार प्रशिक्षण वर्ग समन्वयक गौरव साळुंखे, सहसमन्वयक अजय कुलकर्णी, पत्रकार डिजिटल स्टुडिओ समन्वयक सुरज कसबे यांचीही निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब ढसाळ यांनी जाहीर केले.

यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती पश्चिम महाराष्ट्र निमंत्रक गोविंद वाकडे, विभागीय सचिव- नाना कांबळे पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकार बंधू भगिनी आदी उपस्थित होते.
…………………………………….

Previous articleसीमा पोटे नारायणगावकर यांच्यासह दिग्गजांना राज्यस्तरीय विशेष सन्मान पुरस्कार
Next article१७ वर्षीय मुलाचे अपहरण नंतर हातपाय बांधून रेल्वेखाली टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न दौंड तालुक्यातील केडगाव येथील धक्कादायक प्रकार