यशवंतराव चव्हाण यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

मोसीन काठेवाडी

आंबेगाव वसाहत

मा.गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब संस्थापक अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या आंबेगाव वसाहत येथील यशवंतराव चव्हाण माध्य.विद्यालयात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

जयंतीच्या निमित्ताने यशवंतरावांच्या प्रतिमेची मिरवणूक ढोल व लेझिम च्या गजरात विद्यालयातील लेझिम पथक तसेच जि.प.शाळा आंबेगाव वसाहत मधील लेझिम पथक , विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या सहभागाने भव्य प्रभातफेरी व शोभायात्रा काढण्यात आली .विद्यालयाच्या प्रांगणात दिप प्रज्वलन व प्रतिमा पूजन मा सभापती प्रकाशराव घोलप सरपंच प्रमिला घोलप, उपसरपंच परविन पानसरे ग्रामपंचायत सदस्य पुनम घोलप,अनिता विरणक ,मिलिंद भांगरे , विजय घोलप राजाभाऊ घोलप व ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते करण्यात आले .

प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अविनाश ठाकूर यांनी विद्यालयात घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची माहिती दिली .
जयंतीचे औचित्य साधुन बालआनंद मेळावा,वेशभुषा स्पर्धा, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन, आंतरशालेय यशवंत प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली . नारोडी केंद्रातील सर्व प्राथ. शाळांतील २८० विद्यार्थी व यशवंतराव चव्हाण विदयालयातील 275 विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत सहभाग घेतला.
आंतरशालेय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये नारोडी केंद्रात विराज भाऊसाहेब सोमवंशी जि.प.शाळा आंबेगाव वसाहत (प्रथम क्रमांक ). उमेश गणेश गुंजाळ जि.प.प्राथ.शाळा घोडेगाव ( द्वितीय क्रमांक), आराध्या सुरंजन घोडेकर जि.प प्राथ शाळा परांडा(तृतीय क्रमांक ),गुंजन कारकून जंबुकर जि.प.शाळा माळवाडी.(चतुर्थ क्रमांक) यांनी मिळविले.तर शालांतर्गत सामान्य ज्ञान स्पर्धेत लहान गटात प्रथम- स्नेहल असवले, द्वितीय -निरंजन काळे, तृतीय -दिक्षा घोडेकर, उत्तेजनार्थ अनुष्का मते.तर मोठया गटात प्रथम -सोहम घोडेकर, द्वितीय – ध्रुव कापडणीस,तृतीय- कृष्णा सोमवंशी,उत्तेजनार्थ -अथर्व बुरुड.यांनी क्रमांक मिळविले.
वेशभूषा स्पर्धेत प्रथम- ईश्वरी विठ्ठल मोरे, अर्णव इंगवले, द्वितीय -सोहम भवारी,स्नेहल असवले,तृतीय -मनस्वी लकडे, मुग्धा चपटे.यांनी क्रमांक मिळविले. वेशभुषा स्पर्धेचे परीक्षण सौ.माणिक हुले ,सौ.शर्मिला कोकणे मुख्याध्यापिका जि. प शाळा आंबेगाव.यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय वळसे यांनी केले.तर नियोजन सौ.वैशाली काळे, सौ.वंदना मंडलिक,सौ. लक्ष्मी वाघ, श्री.वैभव गायकवाड,सौ. गौरी विसावे, श्रीम.नीलम लोहकरे, श्री.संतोष पिंगळे, श्री गुलाब बांगर,श्री. लक्ष्मण फलके यांनी केले.सर्व उपस्थीतांचे आभार सौ.माणिक हुले यांनी मानले.

Previous articleबी. डी. काळे महाविद्यालयात नियतकालिकाचे प्रकाशन
Next articleअजय मुळूक यांची राज्यस्तरीय शिबिरासाठी निवड