श्री आदिशक्ती महिला प्रतिष्ठान, इनरव्हील क्लबच्या वतीने महिला दिन साजरा

नारायणगाव : (किरण वाजगे)
श्री आदिशक्ती महीला प्रतिष्ठान आणि इनरव्हील ग्रूप नारायणगावच्या संयुक्त विद्यमाने महिलादिन सोहळ्याचे नुकतेच उत्साहात आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ब्रह्माकुमारी संगिता बहेनजी, राजश्रीताई बेनके या होत्या. यावेळी मनिषा कोठे, ज्योती संते, स्नेहा बारवे, गायत्री रोकडे, आदी मान्यवर उपस्थित होते. मुक्ताई समाज मंदिर कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जेष्ठ महीलांसाठी विविध कलागुण दर्शन स्पर्धा – आणि फॅन्सी ड्रेस फॅशन वॉक स्पर्धा घेण्यात आली. जवळ जवळ दोन्ही स्पर्धा मिळून ५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. तसेच महीला दिनाचे औचित्य साधून काही महीलांना यशस्वी उद्योगिनी हा पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये. गितांजली पाटे, सोनल भोंग, वर्षा तांबे, स्मिता विटे, जयश्री कोल्हे,
रत्ना तांबे आणि जोत्स्ना गाढवे या ७ महीलांना ट्रॉफी, शाल, श्रीफळ आणि गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी मिस नविमुंबई आरती पानसरे व नेहा नांगरे यांनी परिक्षण घेतले.
आजी स्पर्धेत प्रथम क्रमांक – ज्योती सोमवंशी (सो. नथ+साडी) द्वितिय = अनघा साने प्रसन्ना कुलकर्णी (चांदीचा दिवा+साडी) तृतीय = नंदीनी घाडगे, ईरा (डीनर सेट)
उत्तेजनार्थ = ज्योती गांधी, हेमा लोढा (पैठणी) निर्मला गायकवाड (पर्स), रिया पटेल = (गिफ्ट)

तर फॅन्सी ड्रेस मध्ये प्रथम- अर्चना विक्रम कोल्हे, द्वितीय सरस्वती जाधव, तृतीय- हर्षाली को-हाळे, प्रतिभा गावडे, उत्तेजनार्थ- तृप्ती दळवी, तेजश्री शेळके, प्रांजल भाटे, स्नेहल आवटी, शितल वामन यांनी बक्षिसे पटकावली. कार्यक्रमासाठी सुमारे ५०० महीला उपस्थित होत्या. यावेळी २५ गिफ्ट लकी ड्रॉ द्वारे देण्यात आली.
कार्यक्रमासाठी सर्व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते. यामध्ये नंदा मुत्था प्रिती शहा (इनरव्हील अध्यक्षा), वर्षा तांबे, कुंदा इचके, रोहीणी जगदाळे, राखी शेळके, एड. सुनिता चासकर शितल जठार, रुपाली शहाणे, सविता खैरे, नंदीनी घाडगे, सुजाता भुजबळ, रश्मी थोरवे, कल्याणी पोखराणा, चैताली वखारीया, गीता गुगळे, ज्योती सोमवंशी, स्वाती मुदगल, निता वखारीया, प्राजन्न भुतडा, रीया पटेल, रुचिता वाघ, समृद्धी वाजगे, सुनिता कोल्हे, तसेच सुषमा थोरात, विशाखा दातखिळे, मालती थोरात, कमाल खेडकर, उज्वला ,वर्षा सोनावणे.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजन संस्थापिका अंजली खैरे यांनी केले. दरवर्षी हा महीलादिन कार्यक्रम याच उत्साहात पार पाडला जाईल. महीलांच्या कलागुणांना वाव मिळावा या साठी भव्य व्यासपिठ आम्ही महीलांसाठी उपलब्ध करून देऊ असे अंजली खैरे यावेळी महणाल्या.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन आदिशक्ती प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा अंजली खैरे नंदा मुथ्था, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रिती शहा यांनी केले.

Previous articleउरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात ‘संभाषण कौशल्य’ कार्यशाळा उत्साहात संपन्न
Next articleबी. डी. काळे महाविद्यालयात नियतकालिकाचे प्रकाशन