अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा जणांचा मृत्यू; अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल

नारायणगाव, (किरण वाजगे)

कांदळी (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत मोटर सायकलला अज्ञात वाहनाची धडक बसून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१) रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत येथील गुळाचे गुऱ्हाळ चालक सुहास जगन्नाथ घाडगे (रा.कांदळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कांदळी गावच्या हद्दीतील कांदळी फाट्याकडून जुल्फीकार दिलशाद मालिक (वय २२ राहणार चुडीवाला मोहनपुर, ता.रुडकी.जि. हरिद्वार उत्तराखंड ) व इस्तकार मालिका (राहणार.खातखेडा. ता.रुडकी.जि.हरिद्वार उत्तराखंड) हे दोघे बजाज कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच १२ बी झेड ६८६ वरून कांदळी फाट्याकडून सर्विस रोडने १४ नंबर बाजूकडे जात होते. अज्ञात वाहन चालक पाठीमागून भरधाव वेगाने येऊन रस्त्यांच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत मोटर सायकलला धडक देऊन निघून गेला. झालेल्या अपघातात मोटर सायकलवरील दोघे मृत्युमुखी पडले. पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे करीत आहे.

Previous articleम्हाळुंगे तर्फे आंबेगाव येथे डोळे तपासणी व वाचनाचे चष्मे मोफत वाटप 
Next articleबंद सदनिकेच्या दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून अज्ञात इसमाने पाऊण लाख रुपये ऐवजाची केली चोरी