लाला बँक ग्राहकांना अत्याधुनिक सेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध – अध्यक्ष युवराज बाणखेले

नारायणगाव, किरण वाजगे

गेली चार दशकांपासून लाला अर्बन सहकारी बँकेच्या वतीने ग्राहक व सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले असून यापुढे देखील बँकेच्या ग्राहकांना अत्याधुनिक सेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी केले .
लाला अर्बन बँकेचे संस्थापक लोकनेते खा.स्व. किसनराव बाणखेले यांच्या प्रतिमेचे पूजन करून लाला अर्बन बाजारपेठ शाखेचा ४३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना स्वर्गीय किसनराव बाणखेले (अण्णा) यांनी ४८ वर्षांपूर्वी १२ ऑगस्ट १९७४ रोजी लाला बँकेची स्थापना केली असून उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाला बरोबर घेऊन अण्णांचा वारसा समर्थपणे जपण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहे. बँकेच्या वतीने प्रत्येक वर्षी सभासदांचा दोन लाखाचा सभासद अपघात विमा उतरविला जातो. ग्राहकांना अत्याधुनिक सेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी सांगितले.

बँकेने कर्जदारांसाठी आकर्षक ‘रेटिंग सिस्टमची’ अंमलबजावणी करून रिबेट देण्याचे धोरण स्वीकारले आहे. दर्जेदार कर्ज व्यवहार वाढण्यासाठी अहमदनगर, ठाणे, सोलापूर, सातारा चार जिल्ह्यांमध्ये कार्य विस्तार वाढविण्यासाठी रिझर्व बँकेकडे प्रस्ताव पाठविला आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एन.सुरम यांनी दिली. नारायणगावचे सरपंच योगेश पाटील यांनी अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमास अध्यक्ष युवराज बाणखेले , उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संचालक अशोक गांधी, मंगेश बाणखेले, नारायण गाढवे, जे.के.थोरात, संदीप लेंडे, इंदुमती कवडे, सुनील भुजबळ, माजी संचालिका विमल थोरात, डॉ. पिंकी कथे, विकास दरेकर, दीपक वारुळे, उपसरपंच अरिफ आतार, संतोष वाजगे, आशिष माळवदकर, संतोष दांगट, संजय फलके, सुनील फुलसुंदर, अभय खैरे, निलेश गोरडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एन.सुरम, वरिष्ठ अधिकारी प्रमोद कांबळे, संतोष पटाडे, मनोहर गभाले, राहुल पांडे, सचिन गोसावी उपस्थित होते. सूत्रसंचालन सतीश जाधव व आभार मंगेश बाणखेले यांनी मानले.

Previous articleडॉ.वाल्हेकरांंच्या ग्रंथाची मुंबई विद्यापीठात संदर्भग्रंथ म्हणून निवड
Next articleशामराव होनराव यांची हरिश्चंद्र महादेव संस्थानच्या सचिवपदी यांची निवड