नारायणगाव येथे संविधान दिन उत्साहात साजरा : आयुष प्रसाद यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन

नारायणगाव : किरण वाजगे

नारायणगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभाग, विश्रामगृह या ऐतिहासीक वास्तूमध्ये संविधान दिंन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले, तसेच संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे, उपसरपंच आरिफ आतार, वारूळवाडी चे सरपंच राजेंद्र मेहेर, गणेश जनार्दन वाव्हळ, गिरीराज वाव्हळ, जुबेर शेख, गणेश सोनवणे, अशोक खरात, विनायक रणदिवे, संदेश वाव्हळ,पंकज खरात, मिथिलेश शिंदे, रविंद्र भोजने, अशोक भोजने, सतिश वाव्हळ, बी.एम.थोरात, गायकवाड सर, ग्रा.प.सदस्य गणेश पाटे, संतोष पाटे, अजय डोंगरदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

संविधान उद्देशीकेचे वाचन ग्रामविकास अधिकारी नाईकडे भाऊसाहेब यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक गणेश वाव्हळ यांनी केले, तर जुबेर शेख यांनी आभार व्यक्त केले.

जगातील सर्वोत्तम संविधानाचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी….!!!

आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.
भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम असे संविधान आहे, त्याचे जतन कारणे ही सर्वच भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले, जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या आयुष प्रसाद यांनी नारायणगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभाग येथील संविधान दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे जिल्ह्याची पहिली बहिष्कृत हितकारीनी परिषद २३ व २४ मे १९३१ रोजी नारायणगाव येथील विश्रामगृह येथे घेतली होती. त्यामुळे या वास्तूला ऐतिहासीक महत्त्व आहे.

२०१८ सालापासून साजरा केला जातो संविधान दिन…!!

नारायणगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात सन २६ नोव्हेंबर २०१८ पासून संविधान दिन साजरा करण्यात येतो. दरवर्षी संविधान ग्रंथ पूजन, संविधान उद्देशिका वाचन, संविधन ग्रंथ व प्रास्ताविक वाटप, मान्यवर मनोगत, तसेच ईतर सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची परंपरा आहे.

Previous articleवीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न सरकार दरबारी
Next articleउरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळवला सेपक टकरा खेळात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक