हिंदुहृदसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामपंचायत नारायणगाव, शिवसेना शाखा नारायणगाव – वारूळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन

नारायणगाव : किरण वाजगे

हिंदुहृदसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने ग्रामपंचायत नारायणगाव, शिवसेना शाखा नारायणगाव – वारूळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सकाळी १० वा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आले.सकाळी १०.३० वा. आयुष्यमान भारत कार्डाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.

सुमारे ४५० आयुष्यमान कार्ड या मार्फत वाटप होणार आहे.
सकाळी १०.४५ वाजता नारायणगाव आणि वारूळवाडीतील ग्रामस्थांसाठी शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिकांचे प्राथमिक सदस्य नोंदणी फॉर्म भरून घेऊन याचा प्रारंभ करण्यात आला असून सुमारे ६ ते ७ दिवसांमध्ये संपूर्ण गावातून २००० ते ३००० प्राथमिक सदस्य नोंदणी करून घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.
यावेळी शिवसेना जुन्नर तालुका संघटक बाबू पाटे यांनी शिवसेना हा संघर्षाचा पक्ष आहे, संघर्षामधून या पक्षाची स्थापना करण्यात आली संघर्ष काय नवीन नाही, आपल्याच लोकांनी पक्षाचा घात केला, आज पक्षाला सर्वसामान्य लोकांची गरज आहे आपण पक्षासोबत भक्कम उभे राहीले पाहिजे, त्यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी आवश्यकता आहे मला गावातील लोकांवर विश्वास आहे ते नक्कीच पक्षासोबत एकनिष्ठ आहे व पुढे ही राहतील असा विश्वास आहे.पुढील काळात शिवसेना पक्षाचे काम अधिक जोमाने होईल असे मनोगत यावेळी व्यक्त केले.यावेळी जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब पाटे, अनिल तात्या दिवटे यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब पाटे, दिनकर कोल्हे, रोहिदास तांबे, अनिल दळवी, बाळू तांबे विलास दळवी, सुनील ढवळे, सलीम मोमीन, संतोष वाजगे, महेंद्र खेबडे, राजेंद्र विटे, ज्ञानेश्वर औटी, अमर वाजगे, निसार कुरेशी, अवचट गुरुजी, संतोष बाळसराफ, पिंटू दिवटे, सचिन जूद्रे, सुनील मेहेर, वसंत वाजगे, मुकुंद वामन, अजित पवार, अजीम शेख, मारुती चव्हाण, अनिल खैरे, अनिल दळवी, विकास तोडकरी, आरिफ आतार, संतोष दांगट, संतोष पाटे, गणेश पाटे, अक्षय वाव्हल, राणी जाधव, दीपक वारुळे, विकास बाळसराफ, चेतन पडघम, आकाश कानसकर, पप्पू भूमकर, ईश्वर पाटे, राहुल लोखंडे इत्यादी मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत कोल्हे यांनी केले.

Previous articleलिटिल जंक्शन स्कुल मध्ये विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleमॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय बालदिन अविस्मरणीय