तीन दिवसात तिसरा बिबट्या जेरबंद : वनविभागाला व बिबट रेस्क्यू टीमला यश

नारायणगाव : किरण वाजगे

गेली तीन दिवसांपासून वारुळवाडी मध्ये ठाण मांडून बसलेल्या बिबट्यांचा उपद्रव काही केल्या कमी होईना झालाय.
आज लागोपाठ तिसऱ्या दिवशी एक बिबट्या रात्री पावणे नऊच्या सुमारास गुरुवर्य सबनीस विद्यामंदिराच्या आवारात वसतिगृहाच्या समोरच जेरबंद झाला आहे.

दरम्यान काल पकडलेला एक ते दीड वर्षाचा बिबट्या व आज पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या हा सारखाच वयाचा असावा असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून आणखी एका बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज शाळेच्या कंपाउंड च्या बाजूला असलेल्या केळीच्या शेतातून येत असल्याचे तेथे निगराणी करणाऱ्या वनपाल नितीन विधाटे, वनरक्षक रामेश्वर फुलवाड व रेस्क्यू टीम चे सदस्य रमेश सोलाट यांनी सांगितले.

येथे काल रात्रीपासून वनरक्षक फुलवाड यांच्यासह वन कर्मचारी खंडू भुजबळ, विश्वास शिंदे करत बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

Previous articleलागोपाठ तिसऱ्या दिवशी बिबट्याच्या गुरगुरण्याच्या आवाजाने विद्यार्थी भयभीत
Next articleजखमी विद्यार्थिनीसाठी शिक्षिका शमा घोडके ठरल्या देवदूत