ओमकार भालेराव दिग्दर्शित “इपरित” लघुपटात ग्रामिण भागातील कलाकारांचा सहभाग

नारायणगाव (विशेष प्रतिनिधी)

ड्रीम वर्क ग्रुप ऑफ कंपनी प्रस्तुत, शिवाजी भालेराव व शरद भालेराव निर्मित ओंकार शिवाजी भालेराव लिखित/दिग्दर्शित “इपरित”
ह्या लघुचित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी गावात उत्साहात संपन्न झाले.एका संवेदनशील सामजिक ज्वलंत प्रश्नावर ह्या चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक ओंकार शिवाजी भालेराव यांनी केला आहे.


चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेते अभय रंगनाथ वाव्हळ व अभिनेत्री प्राची बोरसे आहेत.तर मध्यवर्ती भूमिकेत बालकलाकार रुद्रा सतिश कासार ही आहे.या लघुचित्रपटाचे प्रमुख सहाय्यक दिग्दर्शन वैभव बडे व ऐश्वर्या वाघमारे ह्यांनी केले असून चित्रपटाचे कला दिग्दर्शन यश खेबडे यांनी केले आहे.चित्रपटाची रंगभूषा, वेशभूषा व केशभूषा मयुरी कासार यांनी केली आहे.

तसेच या चित्रपटात अभिनेते तथा पत्रकार किरण वाजगे, सागर भालेराव,ऋषभ घोडके, दीपक चिखले, सुनीता चिखले आदी कलाकारांनी छोट्या परंतू महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
लवकरच “इपरित” हा ज्वलंत सामजिक लघुचित्रपट आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात दाखल होणार असून तेथे दैदिप्यमान यश व नावलौकिक मिळवेल असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक ओंकार भालेराव व अभिनेते अभय वाव्हळ यांनी व्यक्त केला आहे.

Previous articleमोरोशीच्या भैरवगडावरून अहिल्यादेवींना वंदन
Next articleकावळ पिंपरी येथील रोहिदास पाबळे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक