Home Blog Page 79

उमाजी राजांचा इतिहास सर्वसामांन्य पर्यत गेला पाहिजे- संपतराव गारगोटे

राजगुरूनगर – उमाजी राजे नाईक यांचा इतिहास जर येथील सर्वसामांन्य वाचला तर त्यांच्या मनामध्ये मनामध्ये देशप्रेम, अन्यायाविरुद्ध लढण्याची क्षमता आणि लढाऊ बाणा नक्कीच तयार होईल उमाजी राजांचे चरित्र हे संघर्षमय आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी प्रेरणा देणार आहे उमाजीराजे नाईकांनी ब्रिटिशांना सळोकीपळो करून सोडले त्याचबरोबर येथील जुलमी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला आणि म्हणूनच इंग्रजांनी त्यांना फाशी शिक्षा जरी दिली असली तरी इथल्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांनी निर्माण केली आणि हीच प्रेरणा पुढे स्वातंत्र्याचा जन आंदोलन होऊन भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून गेली . म्हणुन उमाजी राजांचा इतिहास हा विद्यार्थ्यांपासुन सर्वसामान्य पर्यंत जाणे गरजेचे आहे त्यातून आदर्श पिढी, आदर्श राज्यकर्ता आणि आदर्श शासन व्यवस्था निर्माण होण्यासाठी मदत होईल आणि छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घेऊन उमाजी राजांनी उभा केलेलं केलेला लढा हजारो वर्षासाठी प्रेरणा देऊन जाईल.असे संपतराव गारगोटे यांनी सांगुन उमाजी राजांचा जिवनपट त्यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून उलगडून दाखवला

यावेळी कनेरसर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. बाळासाहेब गावडे,कनेरसर जि.प.प्राथमिक शाळा शिक्षक श्री.नानाभाऊ गावडे, शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम.अंजली शितोळे,श्रीम. सारिका राक्षे,श्रीम.शुभांगी जाधव, अंबिका विद्यालय कनेरसर मुख्याध्यापक श्री. मनोहर वाघमारे,संजय भालारे,संजय गारगोटे,श्रीम.वैशाली गुंजाळ,श्रीम.पूजा बोरकर,श्रीम.वासंती रसाळ,अजय पोंदे, राहूल खोरे,बाबाजी मोरे,चंद्रकांत ताजणे, दिलीप माशेरे( भाजपा तालूका माजी अध्यक्ष)बापूसाहेब दौंडकर (माजी ग्रामपंचायत सदस्य)सौ.सुनिता केदारी, सौ.रेश्मा म्हसुडगे (ग्रामपंचायत सदस्या) सत्यवान दौंडकर (सरचिटणीस राष्ट्रवादी खेड तालुका)मच्छिंद्र दौंडकर (विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन)काळूराम दौंडकर (विविध कार्यकारी सोसायटी संचालक) सागर म्हसुडगे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अंबिका विद्यालय कनेरसर,चंद्रकांत दौंडकर (शाळा व्यवस्थापन समिती सदस्य जि.प.प्राथमिक शाळा कनेरसर) पालक ग्रामस्थ गणेश माशेरे,अशोक म्हसुडगे,सुभाष म्हसुडगे,कचरू सोनवणे,विनायक दौंडकर, अनिल दौंडकर,प्रशांत म्हसुडगे(सामाजिककार्यकर्ते),संदिप म्हसुडगे (उपाध्यक्ष पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा)

नारायणगाव येथे रक्तदान शिबिरात २२१ जणांनी केले रक्तदान

नारायणगाव : (किरण वाजगे)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री गणेशोत्सव व विक्रांत क्रीडा मंडळ, वाजगे आळी यांच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे नारायणगाव येथे नुकतेच आयोजन करण्यात आले.याप्रसंगी २२१ रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.

शिबिर प्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, सरपंच योगेश पाटे, डॉ. संदीप डोळे, विक्रांत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाजगे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, नारायणगाव विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोटरी क्लब नारायणगाव चे अध्यक्ष डॉ हनुमंत भोसले, जितेंद्र गुंजाळ, अभय वाव्हळ, जयेश कोकणे, गणेश वाजगे, तसेच माजी सैनिक यावेळी उपस्थित होते.

रक्तदान शिबिराच्या निमित्ताने माजी सैनिकांचा यावेळी मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संतोष वाजगे, निलेश गोरडे, अध्यक्ष मुकेश वाजगे, जितेंद्र वाजगे, श्रीकांत पाटील, हर्षल वाजगे, तेजस वाजगे, विघ्नहर वाजगे, निलेश रसाळ, भूषण शिवले, करण परदेशी, अनिकेत वाजगे तसेच मंडळाचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

गौरीगणपतीचे निमित्त पारंपरिक आरस व सांस्कृतिक दर्शन

उरुळी कांचन

बाप्पा गणेशाच्या आगमनानंतर गौरी गणपतीचेही घराघरांत मोठ्या थाटामाटात स्वागत होते. यांना गौरी, गौराई, लक्ष्मी आणि महालक्ष्मी अशा नावांनी ओळखतात. या पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमात आता आधुनिकता सुद्धा आली आहे.परंतु आपली ग्रामीण संस्कृती आजच्या पिढीला माहीत होण्यासाठी हा देखावा सादर केला आहे.

१)छप्पराचे घर- त्या घरासमोरील अंगणात बसून चाललेली नित्य कामे
उदा- धान्य पाकडणे- म्हणजे एक सुपात धान्य घेऊन ते पाकडत असताना त्यातील निष्फळ गोष्टी बाहेर घालवून शुद्ध चांगल्या गोष्टी आतमध्ये घ्यायच्या ही शिकवण एक गौरी देत आहे. तर
२) घराच्या अंगणात जमिनीवर लावलेल्या जात्यावर बायका पीठ दळायच्या.ते करत असताना शरीराचा व्यायाम व्ह्यायचा तसेच त्या सात्विक पिठाबरोबर मुखातून माहेरच्या आणि ससारच्या गुणांच्या ओव्या ऐकायला यायच्या हे दुसरी गौरी सांगत आहे.
अशाप्रकारे ग्रामीण संस्कृतीतील घरासमोरील सडा सारवण, रांगोळी, तुळस ,केरसुणी आणि ओव्या अशा मंगल प्रसंगाचे दर्शन घडविण्याचा सौ.अर्चना अष्टुळ आणि कु.श्रुती अष्टुळ यांनी प्रयत्न केला आहे.

मांडवगण फराटा येथे तेरा ठिकाणी घरफोडी करणारे अट्टल चोराना पुन्हा दरोड्याच्या तयारीत असतानाच केडगाव पोलीसांनी केले जेरबंद : यवत पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी!

योगेश राऊत,पाटस

मांडवगण फराटा येथील मध्यरात्री घरफोडी करणारे चोरटे.. पुन्हा एकदा दरोड्याच्या तयारीत असताना केडगाव चौफुला येथे केडगाव रात्रीगस्त दरम्यान केडगाव पोलीसांनी चोरटयानां मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

दिनांक ०६/०८/२०२२ रोजी रात्रौ ०३:०० वा.चे सुमारास पो.ना सोनवणे व पो.ना.कापरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,काही इसम दरोड्याच्या तयारीत केडगाव चौफुला येथे जमलेले आहेत.अशी खात्रीशीर बातमी मिळाली असता सदरची माहिती पो.नि.नारायण पवार सो व पोसई नागरगोजे यांना कळविले व केडगाव चौफुला येथे जाऊन व्युहरचना आखुण आरोपी दरोडयाचे तयारीत असताना पोलीसांनी जागेवर पकडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातील ०७ पैकी १ पळुन गेला ६ जणांना जागेवरच पकडण्यात पोलिसांना यश आले आहे त्यावेळी त्यांचे ताब्यात 1) अॅक्टीव्हा मोटार सायंकल नंबर एम.एच.१४ जी.के११७८ च्या डिकीमध्ये एक कोयता,एक लोखंडी काटावणी,एक पक्कड,एक मिरची पावडरची पुड,एक बॅटरी,असे साहित्य मिळुन आले 2)एक हिरो कंपनीची स्पेल्डंर प्लस मोटार सायकल नंबर एम.एच.३८ ए.सी.४६०३तसेच चार मोबाईल वेगवेगळे किंमतीचे व कंपनीचे असे एकुन १,१५,३१०/- रूपयेचे मुददेमाल मिळुन आला तसेच त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता 1) सुनिल मारूती लोणी वय 22 वर्षे 2)सौरभ दत्तात्रय शिंदे वय 24 वर्षे दोनळी रा चिंचवड बालाजीनगर ता हवेली जि.पुणे 3)राहुल राधाकिसन आगम वय 21 वर्षे रा दिद्यी आळंदी खेड जि.पुणे 4) अभिषेक सुनील चौधरी वय 22 वर्षे 5) राहुल रमेश चव्हाण दोन्ही रा केडगाव ता.दौंड.जि.पुणे 6)विकास नारायण सानप वय 19 वर्षे रा फरंडेनगर दिद्यी ता खेड जि.पुणे असे सांगितले त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी मांडवगण फाराटा ता शिरूर जि.पुणे यांनी ता 31/08/2022 रोजी रात्रौ घरफोडया केल्याचे कबुली दिली आहे.

सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख ,आप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई नागरगोजे.पोलीस नाईक सोनवणे ब.नं.1045,पोलीस नाईक कापरे ब.नं.2344,पो.कॉ.भापकर ब.नं.2485,पो.कॉ.गडदे ब.नं.68,पोलीस मित्र राजेद्र अडागळे,रामा पवार, यांनी केलेली आहे. तरी सदरचा तपास पोसई नागरगोजे हे करीत आहेत.

सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतरण दिनाच्या निमित्ताने कार्यगौरव पुरस्काराचे वितरण पुणे जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्ष प.पु.प.म.मुकुंदराज बाबाजी कपाटे

उरुळी कांचन

पुणे जिल्हा महानुभाव परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अष्टशताब्दी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेमार्फत कार्य गौरव पुरस्कार पुणे जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्ष प.पु.प.म.मुकुंदराज बाबाजी कपाटे तसेच पुणे जिल्हा महानुभाव परिषद प्रचारमंत्री तथा पत्रकार अमोल बाबासाहेब भोसले यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, अ.भा.म.प.अध्यक्ष महंत विद्वांस बाबा शास्त्री यांच्या अध्यक्षते खाली धर्मसभा संपन्न झाली. या सभेत महंत नागराज बाबा, महंत राहेरकर बाबा, महंत श्रीबाळापुरकर बाबा, महंत श्रीसातारकर बाबा, महंत कृष्णराज शास्त्री बाबा, महंत संतोषमुनी शास्त्री, राष्ट्रीय अध्यक्ष खंडुदेव भगवानराव कठारे, राष्ट्रीय निरिक्षक रामदास खोत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभाषजी रूपचंजी कोठारी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, पुणे जिल्हा मानवाधिकार अध्यक्ष ओमकार शेरे, जनसंपर्क अधिकारी पुणे जिल्हा आशिष गायकवाड, पुणे जिल्हा महानुभाव परिषद महामंत्री संजय वनारसे आदी संत, महंत, आचार्य, तपस्वीनी, सदभक्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नारायणगाव महाविद्यालयाची गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात: डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी विराजमान व स्थापन केलेल्या गणपती बाप्पाचे आज उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.

यावेळी डीजेच्या तालावर विद्यार्थी विद्यार्थिनींनी नृत्य करत आनंदाची लयलूट केली. याप्रसंगी जुन्नर तालुका औद्योगिक केंद्राचे प्रमुख युवा नेते अमित बेनके, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुजित खैरे, नियोजन मंडळाचे सदस्य विकास दरेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे, प्रा. सुभाष कुडेकर, प्रा ओंकार मेहेर, अतुल आहेर, जयेश कोकणे, अक्षय खैरे, गणेश वाजगे, शेखर शेटे, आकाश खैरे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नारायणगाव शाखेमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

नारायणगाव : (किरण वाजगे)

पुणे जिल्ह्य मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०५ वा वर्धापन दिन जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात आला. नारायणगाव शाखेत देखील आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणामध्ये बँकेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

बँकेचा वर्धापन दिन साजरा करत असताना नारायणगाव शाखेच्या परिसरातील प्रगतशील शेतकरी राहुल बनकर, नितीन भोर, प्रकाश माने, चंद्रकांत बनकर, अशोक पाटे,सचिन पवार, बबन खैरे, पंकज पाटे, सचिन शेलोत, विघ्नहर सह साखर कारखान्याचे तज्ञ संचालक धनेश पडवळ, नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन व सदस्य आणि सभासद तसेच सचिव गणेश गाडेकर उपस्थित होते.

यावेळी नारायणगाव शाखेच्या शाखाप्रमुख जयमाला काळे यांनी मा. संचालक संजयराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची आजपर्यंतची वाटचाल आणि ग्राहकांसाठी राबवलेल्या विविध योजना व मोबाईल बँकिंग एप्लिकेशन्स सह इतर माहिती उपस्थितांना दिली.

या वर्धापन दिनाचे आयोजन झोनल ऑफिसर बाळासाहेब मुरादे, सुभाषराव कवडे, वसुली अधिकारी सुनील ताजणे, विकास अधिकारी प्रसाद कोल्हे यांच्या सह नारायणगाव शाखेतील सेवक वृंद यांनी केले.

सोरतापवाडी गणेश फेस्टिव्हलचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन

उरुळी कांचन

सोरतापवाडी परिसरातील सुदर्शन चौधरी यांचे कुटुंबातील अनेक सदस्यांनी गावाचे नेतृत्व केले आहे. तोच समाजकारणाचा वसा आणि वारसा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी पुढे चालवत आहे. सोरतापवाडी हे गाव फुलांच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. या भागातील ज्या काही समस्या मांडल्या आहेत त्या निश्चितच सोडण्यास प्राधान्य देणार असल्याचे मत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सोरतापवाडी गणेश फेस्टिव्हलच्या उदघाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन.

यावेळी आमदार राहुल कुल, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रदिप कंद, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहिदास उंद्रे, तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, मा.सरपंच प्रियंका सुदर्शन चौधरी, प्रविण काळभोर, राहुल पाचार्णे, गणेश कुटे, महादेव कांचन, गणेश चौधरी, सुहास चौधरी, पुजा थिगळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त ‘कला उत्सवाचे’ आयोजन

उरुळी कांचन

उरुळी कांचन येथील ‘पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘कला उत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश अडसूळ यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ.रमेश अडसूळ म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कला व गुणांना वाव मिळावा व भविष्यात यातूनच व्यावसायिक निर्माण व्हावेत असे मार्गदर्शन केले. या स्पर्धेत एकूण ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत स्पर्धेच्या समन्वयक प्रा. शुभांगी रानवडे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अमोल बोत्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप्रिता भोर यांनी केले.

या कार्यक्रमास IQAC समन्वयक प्रा.नंदकिशोर मेटे , वाणिज्य विभाग प्रमुख सुजाता गायकवाड, प्रा.विजय कानकाटे, प्रा.नवनाथ कांचन उपस्थित होते. कार्यक्रमाला पुढील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले प्रा.रोहित बारवकर, प्रा.संतोष पवार, प्रा. अनुजा झाटे, प्रा. स्वाती मासाळकर, प्रा.सारिका डोणगे, प्रा.दिपाली चौधरी, प्रा.नंदिनी सोनवणे, प्रा.निलजा देशमुख, प्रा. रोहिणी शिंदे, प्रा.अंजली शिंदे, प्रा.कमरुन्निसा शेख, प्रा. आप्पासाहेब जगदाळे, प्रा. भाऊसो तोरवे उपस्थित होते.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे परीक्षण डॉ.समीर आबनावे, प्रा.वैशाली चौधरी, ग्रंथपाल प्रा.सौरभ साबळे यांनी केले. या उपक्रमात प्रदीप राजपूत, विशाल महाडिक व प्राध्यापक वर्ग, व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

19 व 20 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे अधिवेशन नक्की: मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांची ग्वाही

श्रावणी कामत , लोणावळा

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ रोजी पिंपरी – चिंचवड येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी आज येथे केली.मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने कृषी महाविद्यालयात आज एस.एम. देशमुख यांच्या हस्ते शरद पाबळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी एस.एम देशमुख बोलत होते.कार्यक्रमास राज्यभरातून तसेच जिल्ह्यातून पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सलग दोन वेळा काही अपरिहार्य कारणास्तव अधिवेशन रद्द करावे लागले होते त्यामुळे राज्यातील पत्रकारांची जी गैरसोय झाली त्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी दिलगीरी व्यक्त केली. पिंपरी – चिंचवडचे अधिवेशन ठरलेल्या तारखेला होईल आणि त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत बदल होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. २०१५ मध्ये पिपरी चिंचवड मध्ये झालेले अधिवेशन अविस्मरणीय झाले. त्याच पद्धतीचे अधिवेशन यावेळेस देखील होईल असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

पत्रकारांसमोरील विविध आव्हानांचा उल्लेख करून शरद पाबळे यांच्या अध्यक्षपदाच्या काळात हे सर्व विषय मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.. शरद पाबळे यांच्या रूपाने एक खंबीर, संस्थेवर निष्ठा असणारा पत्रकारांच्या प्रश्नांची तळमळ असणारा पत्रकार अध्यक्ष म्हणून लाभल्याने त्यांच्या काळात संस्थेची भरभराट होईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली .त्यांनी शरद पाबळे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या..

शरद पाबळे यांनी सत्काराला उत्तर देताना परिषदेने आपल्या दाखविलेला विश्वास व्यर्थ जाऊ देणार नाही, राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण तन, मन, धनाने प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना विश्वस्त किरण नाईक यांनी शरद पाबळे यांना शुभेच्छा दिल्या. परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी, माजी कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, मुंबई जिल्हा अध्यक्ष राजा आदाटे, डी. के. वळसे पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष शरद लोणकर, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, सुभाष भारद्वाज आदिंची भाषणं झाली.पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी अरूण उर्फ नाना कांबळे यांची पुणे विभागीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

उपाध्यक्षपदी सातारा येथील पत्रकार शरद काटकर यांची नियुक्ती केली गेली.विश्वस्त किरण नाईक यांनी त्याची घोषणा केली.मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांनी नाना कांबळे यांचा सत्कार केला.यावेळी नाना कांबळे यांनी देखील सत्काराला उत्तर देणारे भाषण केले.