Home Blog Page 144

आहुपे येथील भैरवनाथ क्रिकेट क्लब ने पटकाविला आदीवासी चषक

घोडेगाव – कोंढवळ गवांदेवाडी येथील अप्पा कारोटे स्टेडियम येथे कट्टर आदिवासी युवा प्रतिष्ठान ने क्रांतिकारक भागोजी येदे आदिवासी चषक भरविला होता.

यावेळी बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ट्रायबल फोरम चे अध्यक्ष डॉ हरिश खामकर,आहुपे मा सरपंच शंकर लांघी, पोखरी उपसरपंच सचिन भागीत,गोहे सरपंच सोमनाथ गेंगजे,ट्रायबल फोरम महासचिव विशाल दगडे,कोंढवळ पोलीस पाटील सुभाष कारोटे,कोंढवळ सरपंच दीपक चिमटे उपस्थित होते.प्रथम क्रमांक भैरवनाथ क्रिकेट क्लब आहुपे यांनी पटकाविला तर द्वितीय क्रमांक त्रिमूर्ती क्रिकेट क्लब सोनवळे,जुन्नर यांनी मिळविला त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक कामळजादेवी क्रिकेट क्लब माळीण यांनी तर चतुर्थ क्रमांक काळभैरवनाथ क्रिकेट क्लब ,न्हावेड यांनी मिळविला.या क्रिकेट स्पर्धेसाठी आदिवासी भागातील 40 संघांनी भाग घेतला .

यावेळी बोलताना डॉ हरीश खामकर म्हणाले की आदिवासी भागात क्रीडापटू तयार व्हावेत यासाठी आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम विभागात क्रीडा संकुल व्हावे अशी मागणी क्रीडाप्रेमीकडून जोर धरत आहे त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री मा दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार आहोत सूत्रसंचालन दीपक चिमटे यांनी केले तर मान्यवरांचे आभार सुभाष कारोटे यांनी मानले कार्यक्रमाचे आयोजन शांताराम कारोटे, महेंद्र कारोटे. विश्वास भवारी, प्रशांत भवारी,प्रशांत डामसे,राम डामसे,शांताराम कारोटे, यांनी केले तर समालोचक म्हणून संजय सातपुते यांनी काम पाहिले अशी माहिती कट्टर आदिवासी प्रतिष्ठान चे अजित कवठे यांनी दिली.

न्हावेड येथील भैरवनाथ टेनिस क्रिकेट स्पर्धेत लायन हार्टेड प्रथम

घोडेगाव

स्वर्गीय सुधीरभाऊ वडेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित भैरवनाथ चषक न्हावेड आंबेगाव तालुक्यात पश्चिम भागात न्हावेड या गावात या भव्य फुलपिच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम् क्रमांक:- 41,000 रुपये
व्दितीय क्रमांक:- 31,000 रुपये
तृतीय क्रमांक:-21,000 रुपये
चतुर्थ क्रमांक:-11,000 रुपये

या स्पर्धेचे वैशिट्य म्हणजे कोव्हीड चे सर्व नियम पाळून, एक उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन म्हणजे न्हावेड चषक ही स्पर्धा 25/02/2022 ते 1/02/2022 या कालावधीत पार पडली.

या स्पर्धेमध्ये रायगड जिल्हा, नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातून एकुन ४० संघानी आपला सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट खेळीने खेळाडूंने प्रक्षेकांची मने जिकंली.

१) प्रथम् क्रमांक:- लायन हार्टेड ११ जांभोरी या संघाने 41 हजार रूपये व भव्य चषक मिळवून प्रथम क्रमांक पटकविला. या संघाचे संघ मालक मनोहर केंगले गुरूजी, सुरज प्रकाशराव घोलप याचे सहकार्ये मोलाचे राहिले.

सर्वोत्कृष्ट खेळ करुन स्पर्धेतील मॅन ऑफ दि सिरीज चा मानकरी
दत्ता गिरंगे, मॅन ऑफ दि मॅच बबन केंगले

जांभोरी गावचे पोलीस पाटील श्री. नवनाथ दत्तात्रय केंगले, सरपंच विलास केंगले, मनोहर केंगले गुरुजी,मारुतीदादा केंगले युवानेते हे मान्यवर उपस्थित होते*

खालुम्ब्रे येथील ह्युंदाई कंपनी ते ह्युंदाई चौक रस्त्याच्या नूतनीकरणाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

चाकण- खालुम्ब्रे (ता. खेड) येथील ह्युंदाई कंपनी ते ह्युंदाई चौक या रस्त्याच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन समारंभ ह्युंदाई चौक खालुंब्रे येथे पार पडला. या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी चाळीस लाखांची मंजुरी गणेश बोत्रे यांच्या पुढाकाराने आणि आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या मदतीने औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत देण्यात आली.

 चाकण-तळेगाव महामार्ग म्हटले की वाहतूक कोंडी हा शब्द जोडूनच येतो. अरुंद महामार्ग आणि त्यामध्ये चाकण औद्योगिक वसाहती चा भाग, अवजड वाहनांची वर्दळ, कामगारांच्या बसची गर्दी या सर्व गोष्टींमुळे खालुंब्रे ते चाकण एमआयडीसीत वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. औद्योगिक वसाहतीतील कंपन्या सुटतेवेळी ह्युंडाई कंपनीकडून चाकण रस्त्यावर येणाऱ्या वाहनांमुळे तळेगावकडून चाकणकडे जाणारी रहदारी ठप्प होते. खालुम्ब्रे ते हुंडाई कडे जाणारा रस्ता खराब असल्यामुळे वाहनांची गती मंदावते त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडीत भर पडते त्यामुळे खालुंब्रेत नेहमी वाहतुक कोंडी होते. याचा त्रास प्रवाशांबरोबर स्थानिकांनाच जास्त होतो. रस्त्याच्या नुतनीकरणानंतर कोंडी निश्चितच कमी होण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी खालुंब्रे गावचे विद्यमान सरपंच सोनल बोत्रे, उपसरपंच सुनीता पोपट पवार, शोभा संजय गाडे,  रामभाऊ मोरे, भास्कर तुळवे, बाबाबी बोत्रे, कांताराम बोत्रे,  कैलास बोत्रे, अनिल बोत्रे, मनोज बोत्रे, दिलीप बोत्रे, संदीप बोत्रे, लखन भाऊ पवार, संजय भाऊ बोत्रे, विशाल तुळवे, दशरथ बोत्रे, सुधिर गाडे, किरण गाडे, नितीन गाडे , नितीन बोत्रे, किरण गाडे , ग्रामस्थ उपस्थित होते.

कवठे येमाई विविध कार्यकारी सोसायटीवर भगवा फडकला

धनंजय साळवे

कवठे यमाई – येथील कवठे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पुरस्कृत जगदंबा सहकार पॕनलने बाजी मारली .अतिशय चुरशीच्या उत्कंठावर्धक लढतीत जगदंबा सहकार पॕनलने बाजी मारली.या पॕनलचे आठ उमेदवार निवडुन आले व राष्टवादी पुरस्कृत जगदंबा सहकार परीवर्तन पॕनलचे पाच उमेदवार निवडुन आले .या विजयामुळे शिवसेने च्या गोटात आनंदाचे वातावरण तयार झाले.विजयी उमेदवारांची घोषणा जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.विजयी उमेदवारांची मिरवणुक काढुन गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

या पॕनलची मुख्य धुरा पं.समिती सदस्य डाॕ.सुभाष पोकळे ,सरपंच रामदासशेठ सांडभोर,मा.सरपंच बबनराव पोकळे,उपसरपंच विठ्ठलशेठ मुंजाळ यांसह असंख्य  शिवसेना कार्यकर्त्यांवर होती.दोन्ही पक्षाकडुन निवडणुक हि अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती.गावातील मुंजाळवाडीची सत्ता राष्ट्रवादी कडे गेल्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने काम करुन विजयश्री खेचुन आणली.

डाॕ.पोकळेंनी ह्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना हा विजय कार्यकर्त्यांचा असल्याचा सांगितले . कार्यकर्त्यांनी निष्टेने व एकदिलाने कामकेल्यामुळेच हा विजय झालाअसल्याचा सांगितले. सर्व कार्यकर्ते व मतदारांचे त्यांनी आभार मानले.

 

शिवसेना पुरस्कृत जगदंबा सहकार पॕनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – १) श्री.विक्रम मळीभाऊ ईचके २)श्री.पडवळ दत्तात्रय गोविंद ३) श्री.मुखेकर हौशीराम धोंडीबा ४) श्री .शहा रितेश शशीकांत ५)श्री . सांडभोर एकनाथ बाबुराव ६)श्री.वागदरे बबन गंगाराम ७) सौ.ईचके विजया बाळासाहेब ८) श्री.पोकळे  बबनराव मारूती राष्ट्रवादी पुरस्कृत जगदंबा सहकार परीवर्तन पॕनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – १)श्री.बच्चे कैलास रामदास २)श्री.उघडे बाजीराव लक्ष्मण ३)श्री.गायकवाड भरत मारुती ४) सौ.ईचके लीलाबाई बबन ५)श्री.ईचके प्रकाश गणाजी

 

येरवडा जेलमधून फरार झालेल्या आरोपीला दौंड पोलिसांनी केले जेरबंद

दिनेश पवार : दौंड

महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमचे कलम व इतर गुन्ह्यात येरवडा जेलमध्ये असलेला आरोपी दोन वर्षांपूर्वी येरवडा जेलमधून पळून गेला होता त्यास दौंड पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.

मोक्का या गुन्ह्यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात अटकेत असलेले देवगण अजिनाथ चव्हाण ,गणेश अजिनाथ चव्हाण ( रा.बोरावके नगर दौंड) ,अकश्या उर्फ अक्षय कोंडक्या चव्हाण (माळवाडी, दौंड) हे येरवडा मध्यवर्ती कारागृहातून दोन वर्षांपूर्वी पळून गेले होते,यातील देवगण चव्हाण व गणेश चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली होती,आरोपी अकश्या उर्फ अक्षय कोंडके त्यांचे घरी जात येत असल्याबाबत गोपनीय माहिती दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना समजताच त्यांनी पथके तयार करून त्यास शिताफीने अटक केली,.

ही कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड,पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी,सुशील लोंढे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला

हवेली तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा भोरडे यांचा वाढदिवस स्तुत्य उपक्रमांनी साजरा

उरुळी कांचन

बोल्हाई माता मंदिर वाडेबोल्हाई येथे हवेली तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखाताई शिवाजी भोरडे यांच्या वाढदिवसा निमित्त बोल्हाई माता महिला नागरी सह पत संस्था, यशस्विनी सामाजिक अभियान, आई संस्था, हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आयोजनाने पवार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीर शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉ. संतोष ननवरे, डॉ. तमन्ना शेख, लक्ष्मण ढेबे, प्राथमिक आरोग्य केंद्र वाडे बोल्हाई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणीही करण्यात आली. डॉ. नियती पात्रा, आरोग्य सहाय्यक दयानंद वाघमारे, आशा वर्कर्स मनीषा भालेकर, वैशाली बनसोडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मोहिनी महामुनी यांनी केली.

इश्रम कार्ड : (ज्ञानशिल्प कॉम्प्युटर )अनिता इंगळे, भाऊसाहेब जाधव यांनी फार्म भरुन घेतले. विश्वराज हॉस्पिटल (तर्पण ब्लड बँक पुणे ) : जनसंपर्क अधिकारी प्रवीण नवले, निर्मला पोतदार, पायल राऊत, हुमेरा मोमीन, श्रीकांत, अजय गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा भारतीताई शेवाळे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी संचालक माणिकराव गोते, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रदीप वसंत कंद, हवेली तालुका उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे, रा. सरचिटणीस मंगेश सातव, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष प्रभावती सुरवसे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी ड्रॉक्टर सेल सरचिटणीस शिवांजली वाळके, हवेली तालुका महिला रा. कॉ.उपाध्यक्ष कल्याणीताई खटाटे, कार्याध्यक्ष हवेली तालूका अश्विनी चोरघडे, सरचिटणीस ज्योती थोरात, हवेली महिला उपाध्यक्ष सीमाताई गावडे, माजी सरपंच कुशाबा गावडे, माजी उपसरपंच संजय भोरडे, साहित्य परिषद जिल्हा अध्यक्ष संतोष जवळकर, मुंबई महापौर केसरी दत्तात्रय काळे, शिवाजीराव वाळके, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष शिवाजी भोरडे, बोल्हाई देवस्थान अध्यक्ष आण्णासाहेब शिंदे, उपाध्यक्ष बाळासाहेब केसवड, माजी चेअरमन विठ्ठल गावडे, वाडेबोल्हाई सरपंच दिपक गावडे, माजी उपसरपंच राजेश वारघडे, आव्हाळवाडीचे माजी सरपंच संदेश आव्हाळे, माजी उपसपंच सुरज भोरडे, जि.प.बोल्हाई शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गणेश भोरडे, माजी उपसरपंच महेश शिंदे, सरचिटणीस संतोष गावडे, नीरज खोकराळे, गणेश शिंदे, तानाजी सुक्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य रोहिणी गावडे, हवेली महिला सरचिटणीस धनश्री शितोळे, ड्रॉ पल्लवी मेहरे, विद्याताई भोरडे उपस्थित होत्या.

तसेच अध्यक्षा हवेली तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस सुरेखा शिवाजी भोरडे यांनी बकोरी माहेर संस्था येथे आनाथ मुलांना भेट दिली.

या प्रसंगी पुणे जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष शिवदास उबाळे, वाघोलीच्या सरपंच वसुंधराताई उबाळे, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेस अध्यक्ष सागर कांचन, हवेली महिला सरचिटणीस सुप्रियाताई घावटे, शकुंतला भोरडे, तानाजी भोरडे, समिर घावटे, सुचित्रा वारघडे, प्रदीप नागवडे, भामाबाई भोरडे, सूर्यकांत सर आदी मान्यवार उपस्थित होते.

हरिभाऊ आडकर यांचा तहसीलदार मधूसुदन बर्गे यांच्या हस्ते गौरव

पवनानगर – मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भडवली शाळेचे शिक्षक हरिभाऊ दशरथ आडकर यांनी कोरोना काळामध्ये ऑनलाईन पद्धतीचे काम करत असताना गरुडा ॲपच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रकारचे काम व मतदान केंद्रावरील शून्य टक्के पेंडिंग काम केल्याबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पुणे यांच्या वतीने उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (मावळ तालुका)म्हणून हा पुरस्कार मावळचे तहसीलदार मधूसुदन बर्गे यांच्या हस्ते देण्यात आला आहे.

मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या हस्ते वडगांव मावळ कार्यालयात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

हरिभाऊ आडकर हे गेली पंधरा वर्षे तालुक्यातील B.L.O.चे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर पणाने भूमिका मांडतात .त्यांना तालुक्यात बीएलओ हृदयसम्राट म्हणून देखील ओळखले जाते . शिक्षकांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका संघटनेच्या माध्यमातून आडकर यांनी कायमच ठेवलेली आहेत.अशा मावळ तालुक्यातील भडवली गावच्या या आदर्श शिक्षकाना पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यामधील शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

पुरस्कार प्रदान कार्यक्रमा प्रसंगी मावळ तालुका शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष नितीन वाघमारे,वस्तीशाळा शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोरख जांभूळकर,महसूल चे उत्तम लोंढे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

येलवाडी येथे मोफत इ श्रम कार्डचे वाटप

चाकण- खेड तालुक्यातील येलवाडी येथे मोफत ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दल (संत तुकाराम नगर) यांच्या वतीने करण्यात आले होते.

इ-श्रम कार्ड मुळे असंघटित कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भिसे, भगवान वैराट यांची प्रमुख उपस्थिती होती. 

गोरगरीब जनतेला शासनाची मदत सहज रित्या मिळावी हा प्रामाणिक उद्देश लक्षात घेऊन सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर ई श्रम कार्ड हे विज बिल सब्सिडी, शैक्षणिक मदत, मुली साठी सुविधा, स्वास्थ्य सुविधा, बेरोजगार भत्ता यासाठी उपयोगात येते. सदर शिबिराचा लाभ अनेक गरीब गरजू नागरिकांनी घेतला सदर कार्यक्रमाच्या वेळी येलवाडी येथे शाखाप्रमुख म्हणून हनुमंत पवार यांना नियुक्ती देण्यात आली.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सामाजिक अंतर ठेवून नागरिकांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानव अधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन समिती खेड, व दत्तात्रय क्षीरसागर, वरिष्ठ अधिकारी सुभाष गलांडे, अक्षय जाधव यांनी परिश्रम घेतले

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा गुलाब वाघमोडे तर स्वागताध्यक्षपदी दत्तात्रय कड यांची निवड

उरुळी कांचन

तेरावे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गुलाब वाघमोडे यांची तर स्वागताध्यक्षपदी दत्तात्रय कड यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सासवड येथे शनिवार दि १२ मार्च २०२२ रोजी संमेलन होणार आहे. संमेलनाच्या संयोजन बैठकीला डॉ भालचंद्र सुपेकर, राजाभाऊ जगताप, प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे, सुनील लोणकर, श्यामकुमार मेमाणे, गंगाराम जाधव, नंदकुमार दिवसे, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, रवींद्र फुले, अमोल बनकर, दत्ता होले, श्री खेनट, अरविंद जगताप, प्रवीण कदम आदी उपस्थित होते.

श्री वाघमोडे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात गेली तीस वर्षे काम करीत आहेत. रानभैरी या त्यांच्या आत्मकथन ग्रंथाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. भटके विमुक्त जागृती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सामाजिक प्रश्नावर सहभाग घेतला होता. मुंबई विद्यापीठात महिलांच्या समस्या वर आयोजित चर्चा सत्रात वीस देशातील प्रतिनिधी मध्ये त्यांचा समावेश होता. परिवर्तन चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. कलंक, माणूस शोधताना या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले असून नियतकालिके, वृत्तपत्र मध्ये त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे. भारिप बहुजन महासंघाचे ते पुणे लोकसभेचे २००९ चे उमेदवार होते. यापूर्वी प्रा नामदेवराव जाधव, भा.ल. ठाणगे. रा. आ. कदम. अनंत दा रवटकर, डॉ ताकवले, बाबासाहेब सौदागर, आकाश सोनवणे, श्रीराम पचींद्रे छिन्द चींद्रे, शरद गोरे, डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.

श्री कड हे सामाजिक क्षेत्रात गेली वीस वर्षे काम करीत असून ग्रंथालय चळवळ रुजविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पुरंदर तालुका संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष म्हणूनही ते काम करीत आहेत . ते सिव्हील इंजिनिअर असून पुणे जिल्हा ग्रंथालय संघावर पदाधिकारी आहेत.

श्री कड म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीत राज्यातून येणाऱ्या साहित्यिकांचे स्वागत आहे. संमेलन यशस्वी होण्याचा आम्ही प्रयत्न करु. दरवर्षी जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. संमेलनात राज्यभरातून लेखक, कवी सहभागी होतात. क-हा नदीच्या काठावर रंगणा-या या साहित्य संमेलनात पुस्तकांचे प्रकाशन, पुरस्कार वितरण, कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद असे कार्यक्रम होणार आहेत.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार  प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांना जाहीर

उरुळी कांचन

रौप्य महोत्सवात पदार्पण केलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे १३ वा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार ब्रेथलेस गायनामुळे प्रसिद्धीस आलेले लोकप्रिय गायक व संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन आणि कै. वसंतराव देशपांडे यांचा वारसा समृद्ध करणारे युवा शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना दिला जाणार असून पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे निमंत्रक व संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार, दि. १० मार्च २०२२ रोजी बालगंधर्व रंगमंदिरात होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील असणार आहेत.

ज्येष्ठ उद्योगपती विठ्ठलशेठ मणियार, शिरूर नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल, सुहाना-प्रवीण मसाला उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल चोरडीया यांची विशेष उपस्थिती असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त स्व. राम कदम यांनी संगीत दिलेल्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता होणार असून पुरस्कार वितरण सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास स्व. राम कदम यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

मराठी चित्रपट गीतांचे जादूगार आणि लावणी गीतांचे शहेनशहा मानल्या जाणार्‍या श्रेष्ठ संगीतकार राम कदम यांच्या नावाने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे २००६ पासून राम कदम कलागौरव पुरस्काराने संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांना गौरविण्यात आले आहे. यात जगदीश खेबुडकर, भास्कर चंदावरकर, इनॉक डॅनियल्स, सुलोचना चव्हाण, चंद्रशेखर गाडगीळ, अजय-अतुल गोगावले, उषा मंगेशकर, अशोक पत्की, सुरेश वाडकर, यशवंत देव, अरुण दाते, अनुराधा पौडवाल यांचा समावेश आहे. शरद पवार यांच्या सूचनेनुसार या वर्षीपासून हा पुरस्कार दोन कलावंतांना देण्यात येणार आहे, असे लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले.

प्रतिष्ठानचा २०२२ चा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार विवेक थिटे यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी होणार्‍या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात कार्तिकी गायकवाड, सुरंजन खंडाळकर, शुभम खंडाळकर, सावनी सावरकर आणि ऐवंत सुराणा गीते सादर करणार आहेत. सचिन इंगळे, राजू दूरकर, समीर शिवगार, केदार मोरे, अर्शद अहमद, राजा साळुंके, अभय इंगळे, अमृता केदार, निलेश देशपांडे साथसंगत करणार असून निवेदन रवींद्र खरे यांचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.