Home Blog Page 143

चाकण आळंदी विभागीय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय मुऱ्हे ; सचिवपदी शरद भोसले

  चाकण आळंदी विभागीय पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी रविवारी (दि. ६ मार्च)  निवडण्यात आली. यामध्ये दैनिक लोकमतचे विजय मुऱ्हे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी पुणे लाईव्हचे प्रफुल्ल टंकसाळे व लोकमतचे भानुदास पऱ्हाड, सचिवपदी लोकमतचे शरद भोसले यांची निवड करण्यात आली.

अन्य कार्यकारणी पुढील प्रमाणे – सहसचिव अशोक टिळेकर , कार्याध्यक्ष आदेश टोपे, सह कार्याध्यक्ष अतुल कुऱ्हाडे, खजिनदार दत्ता बुट्टे, सहखजिनदार सतीश आगळे, संघटक- आयुष जाधव,  चाकण आळंदी विभाग पत्रकार परिषद प्रमुख म्हणून दैनिक सकाळचे रूपेश बुट्टे पाटील व गणेश फलके यांची निवड करण्यात आली. असून पत्रकार संघाचे सल्लागार म्हणून तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश दुधवडे व दैनिक पुढारीचे ए.पी.शेख यांची निवड करण्यात आली आहे.

यादरम्यान रुपेश बुट्टे पाटील यांची वराळे- आंबेठान- बोरदरा विविध कार्यकारी सोसायटीच्या  संचालकपदी निवड झाल्याने पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला

चाकण आळंदी विभागीय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय मुऱ्हे ; सचिवपदी शरद भोसले

   चाकण आळंदी विभागीय पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी रविवारी (दि. ६ मार्च)  निवडण्यात आली. यामध्ये दैनिक लोकमतचे विजय मुऱ्हे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी पुणे लाईव्हचे प्रफुल्ल टंकसाळे व लोकमतचे भानुदास पऱ्हाड यांची व लोकमतचे सचिवपदी शरद भोसले यांची निवड करण्यात आली.

अन्य कार्यकारणी पुढील प्रमाणे – सहसचिव अशोक टिळेकर , कार्याध्यक्ष आदेश टोपे, सह कार्याध्यक्ष अतुल कुऱ्हाडे, खजिनदार दत्ता बुट्टे, सहखजिनदार सतीश आगळे, संघटक- आयुष जाधव,  चाकण आळंदी विभाग पत्रकार परिषद प्रमुख म्हणून दैनिक सकाळचे रूपेश बुट्टे पाटील व गणेश फलके यांची निवड करण्यात आली. असून पत्रकार संघाचे सल्लागार म्हणून तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश दुधवडे व दैनिक पुढारीचे ए.पी.शेख यांची निवड करण्यात आली आहे.

यादरम्यान रुपेश बुट्टे पाटील यांची वराळे- आंबेठान- बोरदरा विविध कार्यकारी सोसायटीच्या  संचालकपदी निवड झाल्याने पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला

कवठे येमाई येथे महिला दिन ऊत्साहात साजरा

धनंजय साळवे – कवठे येमाई येथे आज महिलांमध्ये महिला दिनाचा विशेष असा ऊत्साह पाहिला भेटला. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी सरपंच मंगल रामदास सांडभोर,ग्रा. सदस्या सौ. मनिषा पांडुरंग भोर,ग्रा. सदस्या सौ. वर्षाराणी सचिन बोऱ्हाडे,ग्रा. सदस्या सौ. ज्योति बाळशीराम मुंजाळ,ग्रा. सदस्या सौ. शोभा किसन हिलाळ,ग्रा. सदस्या सौ. सुनीता बबन पोकळे,ग्रा.सदस्या सौ.साधना नीलेश पोकळे, मा. सरपंच सौ.संगीता रामदास रोहिले,संगणक कर्मचारी सौ. प्रतिमा अमोल काळे,सौ.रासकर ताई ,सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस,आशा वर्कर,स्थानिक महिला भगिनी उपस्थित होत्या.

या वेळी ग्रामपंचायततर्फे महिलांचे हक्क् व त्यांच्या साठी असणाऱ्या योजना याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.रामविजय फाऊंडेशनच्या मा. पं. सदस्या सौ. कल्पनाताई सुभाष पोकळे यांच्या तर्फे क्रांती माळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . ह्या कार्यक्रमाला महिला वर्गाने उस्फुर्थ असा प्रतिसाद दिला. माळेगावकरांनी या कार्यक्रमात भरपूर रंगत आणली. आजचा दिवस महिलांसाठी खासच ठरला. या निमित्त अनेक महिलांना बक्षीसांची भेट भेटली. महिलांना ह्या कार्यक्रमानिमित्त अनेक रंगतदार खेळ,नृत्य,रॅम्प वॉक,चित्रपटाचे डायलॉग,यांचा स्वतः अनुभव घेता आला.या कार्यक्रमाच्या वेळी माजी खासदार श्री. शिवाजीदादा आढळराव व त्यांच्या पत्नी सौ. कल्पनाताई आढळराव यांनी भेट दिली.

यावेळी कोवीड काळात काम करणार्या आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका मदतनीस,आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला.ह्या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी गर्दी केली होती.गावातून व वाडीवस्तीवरुन महिला ह्या कार्यक्रमाला आल्या होत्या.ग्रामीण महिला पण स्वता:बद्दल जागृत होताना दिसत आहेत. हा महिला दिवस खास स्वत:साठी आनंदमय करतना दिसल्या .या कार्यक्रमामुळे महिलांना चूल, मूल,संसार, घरकाम, शेतीकाम,यातून वेळ काढून स्वत:साठी देता आला. कार्यक्रमानंतर सर्व महिलांची जेवणाची व्यवस्था रामविजय फाऊंडेशन तर्फे करण्यात आली होती .

स्व. सचिनशेठ भंडलकर स्पर्धेत कडूस क्रिकेट अकॅडमी विजयी

राजगुरूनगर- योगेश धायबर क्रीडा संकुल कडूस येथे स्व. सचीनशेठ (पपा) सूर्यकांत भंडलकर ट्रॉफी 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन‌ करण्यात आले‌ होते . या स्पर्धेचे श्री वसंत धायबर, श्री ललित मुसळे व श्री दत्ता पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला आहे त्यातील आज पहिला सामना रामलिंग स्पोर्ट्स क्लब शिरूर विरुद्ध कडूस क्रिकेट अकॅडमी असा झाला. त्या मध्ये कडुस क्रिकेट अकॅडमी यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ह्या मध्ये कडुस क्रिकेट अकॅडमीने सर्वबाद 149 धावा केल्या ज्या मध्ये पार्थ पाटील याने 33 चेंडू मध्ये 31 द्यावा , वेदांत गोसावी 27 चेंडू 29 द्यावा तर गोलंदाजी मध्ये आदित्य वाळुंज याने 3.4 ओवर्स मध्ये 4 बळी घेतले ,पार्थ पाटील याने 4 ओव्हर मध्ये 2 बळी घेतल्या .ह्या धावांचा पाठला करताना रामलिंग स्पोर्ट्स क्लब शिरूर संघ अपूर्व बाद 142 धावा करू शकला. ज्या मध्ये लहू डांगे 43 चेंडू 30 धावा ,18 चेंडू 20 धावा. गोलंदाजी मध्ये सिद्धार्थ भांबरे 10 ओव्हर मध्ये 3 बळी ,ओम धात्रक 7.5 ओव्हर मध्ये 3 बळी मिळवल्या.

ह्या सामन्यात कडूस क्रिकेट अकॅडमी यांनी 8 धावांनी विजय मिळविला. सामनावीर म्हणून आदित्य वाळुंज याला गौरवण्यात आले

पत्रकार श्रावणी कामत यांचा ” तेजस्विनी कर्तृत्व ” पुरस्काराने गौरव

लोणावळा – जय मल्हार सामाजिक चॅरि. ट्रस्ट. महाराष्ट्र व शिवांगी नृत्य मल्हार रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने तेजस्विनी शिवमल्हार गौरव संमेलन आयोजित करण्यात आले होते

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्या शुभ हस्ते पत्रकार श्रावणी( चित्रा) धनंजय कामत यांना समाज सेवा, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रातील कार्याबद्दल ” तेजस्विनी कर्तृत्व पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी संमेलाध्यक्ष सौं. संगीता घाग. प्रा. डॉ. आनंद अहिरे ,प्रकाश गायकवाड, सौं रेखा महाजन, विलासराव सूर्यवंशी, डॉ. बी. एन. खरात, वैभव खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते

महिलांच्या कर्तृत्वास गिर्यारोहकांचा सलाम

राजगुरूनगर – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी साम्रद गाव सांदण दरी करोली घाट ते पुन्हा साम्रद गाव ही खडतर पदभ्रमंती मोहीम हाती घेत महिलांच्या कर्तृत्वास सलाम करीत केलेली ही मोहीम स्त्री शक्तीस समर्पित केली.

या मोहीमेची सुरवात साम्रद गाव, ता.अकोले, जि.नगर येथून झाली. अशिया खंडात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सांदण दरी मधील दोन अजस्त्र भिंतींमधून खडकाळ टप्यातून मार्गक्रम करावे लागते. काही टप्प्यात गुडघाभर ते अगदी छातीभर साचलेल्या थंडगार पाण्यातून मार्ग काढावा लागतो. त्यानंतर पहिला ७० फूटी टप्पा आणि त्यानंतरचा २० फूटी टप्पा रॅपलिंग करून खाली जावे लागते.

येथून पुढे उतार होऊन ज्या ठिकाणी दरी संपते तेथून पुढे उजव्या बाजूने गेल्यावर करोली घाट मार्ग सुरु होतो. घनदाट जंगलातील खड्या चढाईच्या अडीच तासांच्या मार्गांवर दोन ३० फूटी खडकाळ टप्पे पार करून पुन्हा साम्रद गावात पोहोचता येते.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारी खडतर मोहीम, सांदण दरीचा खडकाळ टप्पा आणि रॅपलिंगचा थरार, करोली घाटातील खड्या चढाईचा घनदाट जंगलातील मार्ग अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या चेतन शिंदे, जॅकी साळुंके, पूजा साळुंके, हर्षल पाटील, महेश जाधव, डॉ.संदीप भिंगारदिवे, अनुराग दांडेकर, दीपिका भांड, अनिल खैरनार, संतोष निकम, अरुणा राणे, अरुण पवार, प्रदीप बारी, रॉबिन हिंगणेकर, नितीन जाधव, जयराम हडस, सागर बांडे आणि डॉ.समीर भिसे यांनी मोहीम फत्ते केली.

जागतिक महिला दिनानिमित्त श्री.विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात सर्वोच्च काम करणाऱ्या आदिशक्ती रुपी महिलांचा सन्मान

नारायणगाव (किरण वाजगे)

श्रीक्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात सर्वोच्च काम करणाऱ्या आदिशक्ती रुपी महिलांचा सन्मान करण्यात आला.देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांच्या नियोजनाखाली भाविक भक्तांसाठी ट्रस्टने एका नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे.

आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी’ श्रीं’ची महाआरती करण्याचा संकल्प देवस्थान ट्रस्टचा आहे. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त श्री.विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र ओझर यांच्या वतीने विविध क्षेत्रात सर्वोच्च काम करणाऱ्या, आदिशक्ती महिलांचा सन्मान म्हणून आजच्या मंगळवारच्या महाआरतीचा मान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संचालिका पूर्वा दिलिप वळसे-पाटील, अहमदनगर जिल्हा तहसीलदार शीतल सैद, जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, रेंज फ़ॉरेस्ट ऑफिसर स्मिता राजहंस, व्हिसकॉन रबर प्रा.लि.च्या मॅनेजिंग डायरेक्टर नीलम कडलग या मान्यवर महिलांना देण्यात आला.


यावेळी मान्यवर महिलांचा श्री. विघ्नहर् गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने श्री. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे, विश्वस्त बी व्ही मांडे, मंगेश मांडे, किशोर कवडे यांनी सत्कार करून सन्मान केला. यावेळी महाआरतीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी उपस्थिती लावली व शासकीय नियमांचे पालन करत महाआरतीचा लाभ घेतला.

महिला शक्तीचा ओळख गौरव करून श्रीगणेशाची महाआरती करण्याचा योग घडवून आणल्याबद्दल उपस्थित सर्व सन्मानित महिलांनी श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे आभार व्यक्त केले.

शिनोली येथे लाखो रुपयांच्या सागाच्या झाडांची बेकायदा कत्तल

मोनीस काठेवाडी , घोडेगाव

आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथील शंकर बाबूराव बोऱ्हाडे यांनी यांच्यासह इतरांच्या सामायिक मालकीच्या क्षेत्रातील सागाची झाडे कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या तोडून विक्री केली आहे! या क्षेत्रात शेकडो सागाची आणि इतर झाडे असून सदर वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची देखील मोठी हानी झाली आहे.

याबाबत सौ उज्वला बारवे बोऱ्हाडे यांनी घोडेगाव पोलीस स्टेशन आणि घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात कायदेशीर तक्रार दिली आहे. घोडेगाव पोलिसांनी याबाबत माहिती घेऊन शंकर बाबुराव बोऱ्हाडे भा.द.वि. कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला असून वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र झाडे तोडणे नियमन १९६४ अंतर्गत कलम तीन तरतुदींचा भंग करून झाडे तोडल्यास वृक्ष अधिकारी चौकशी करून गुन्हा दाखल करू शकतात. स्वतंत्र वन गुन्ह्यांत दोन हजारांवरून पाच हजार रुपये शिक्षेची तरतूद केली आहे. तसेच, अवैध वाहतूक केल्यास १९२७ चे कलम ४२ नुसार एक वर्ष कारावास किंवा पाच हजार रुपये दंड किंवा दोन्ही, अशी शिक्षेची तरतूद आहे याबाबत आधी सूचीमधील झाडांची अवैध वृक्षतोड व वाहतूक करण्यासंदर्भात वनविभागाने अतिशय कठोर नियम केलेले आहेत शिक्षेत दुप्पट वाढ करून पाच हजार रुपये पर्यंत दंड व तसेच एक वर्षाची कैद अशा तरतुदी केल्या आहेत. शिनोली येथील अवैध वृक्षतोडी संदर्भात अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करून दोषींवर जरब बसवणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास आम्ही या प्रकरणात रस्त्यावर उतरून आंदोलन करू.

संदीप मेमाणे, वृक्षमित्र संघटना, महाराष्ट्र राज्य.

कुठलाही बेकायदा वृक्षतोड करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. शंकर बाबुराव बोऱ्हाडे यांनी कुठलीही परवानगी न घेता सदर वृक्षतोड केली असल्याची तक्रार प्राप्त झाली असून; आम्ही वनपालांना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कुठलाही पक्षपात न करता कारवाई करण्यात येईल.
सदर घटने बाबत चौकशी सुरू आहे पंचनामा केल्या नंतर सदर कृत्य करणाऱ्यास दोषी व्यक्तिवर कारवाई करू
महेश गारगोटे, वनपरिक्षेत्र अधिकारी घोडेगाव

बकोरी देवराई वनराई प्रकल्पातील झाडांवर पुन्हा एकदा कोसळले आगीचे संकट

गणेश सातव,वाघोली

बकोरी येथील सरकारी गायरान जमीन गट नंबर १६० मध्ये माहिती सेवा समिती,दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान,शिरूर हवेली वाॅकींग ग्रुप व इतर सहयोगी संस्था यांचे माध्यमातून २०१७ पासून सातत्याने वृक्षारोपण करण्यात येत आहे.त्याठिकाणी जवळपास २५००० देशी झाडे लावून पुढे त्यांचे संगोपन नियमित सुरू आहे.
परिसरात खाजगी प्लॉटिंग व्यवसाय जोरात असल्याने अनेक शेतीजमीनीमध्ये प्लॉट पाडून विक्री करण्यात आली आहे.त्या प्लॉटिंगमध्ये सांयकाळी अनेक मद्यपी मद्यपान करायला बसत असतात.साधारण महीनाभरापुर्वी त्याठिकाणी अज्ञातांकडून आग लावली होती. त्यावेळी लागलेल्या आगीत अनेक वृक्ष जळून खाक झाले होते.

त्या ठिकाणी अश्या आपत्तीतं वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे,वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, बकोरी गावातील तरुण कार्यकर्ते आग विझवण्यासाठी नेहमीचं प्रयत्न करत असतात.आजही त्याठिकाणी सकाळी ११ च्या दरम्यान डोंगराचे पायथ्याशी असलेल्या प्लाॅटींगमधील एका प्लॉटमध्ये वाळलेले गवत पेटवले होते.लक्ष न दिल्याने ती आग तशीच डोंगराकडे गेली.त्या आगीमुळे ५०० पेक्षा जास्त झाडे व झाडांना पाणी देण्यासाठी असणारा पाईप जळून खाक झाला.आगीची तिव्रता मोठी असल्याने अनेक पक्षी,सरपटणारे वन्यजीव हि अक्षरशः होरपळून मरण पावले.

वृक्ष मित्र,जेष्ठ पत्रकार शरदराव पाबळे यांनी भेट देऊन घडलेल्या घटनेबाबत माहिती घेतली.त्यानंतर शरद पाबळे व चंद्रकांत वारघडे यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल करण्यात आली.बकोरी वनराई परिसरात रोज सांयकाळी गस्त घालनेबाबत विनंती करण्यात आली असून,पोलीस निरीक्षक पवार यांनी तातडीने आपल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांना गस्त घालण्याबाबतच्या सुचना केल्या व संबंधित घटनेचा तपास करुन योग्य ती कारवाई करण्याबाबत सांगीतले.

तिरपाड , नाव्हेड , डोन नानवडे ग्रामस्थांची संयुक्त सभा पार पडली

आंबेगाव : तिरपाड , नाव्हेड , डोन नानवडे ग्रामस्थांची यांची संयुक्त सभा ( दि.५) रोजी पार पडली . यावेळी तिरपाड याठिकाणी सुरू असणाऱ्या फॉरेस्ट बांधकामाबाबत ग्रामस्थांनी वारंवार विरोध केला आहे . पेसा सभा व ग्रामसभा यामध्ये देखी वारंवार विरोध केला आहे . तरीदेखील ग्रामस्थांच्या ठरावाला न जुमानता वन अधिकारी यांनी हे काम ग्रामस्थांना धमकावून चालू ठेवले आहे . याबाबत डोण या ठिकाणी सभा घेण्यात आली सभेसाठी तरुण बहुसंख्येने उपस्थित होते .त्यावेळी सभेमध्ये या कामाला संविधानिक लढा देऊन बंद करायची ठरले . त्याचप्रमाणे वन हक्क दावे असतील महाराष्ट्र शासन खाजगी वन हे सर्व दावे निकाली काढून मूळ मालकाच्या नावावर परत जमिनी करण्यात याव्यात त्यासाठी यापूर्वी ग्रामसभेमध्ये ठराव झालेले आहेत व सरकार दरबारी त्याचा पाठपुरावा झाला आहे . सरकार ने पत्र काढून देखील या गोष्टी होत नाहीत याच्या पाठीमागे कोण आहे असा सवाल तरुणांनी केला .

आदिवासी भागातील लोकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी झगडावे लागत आहे ही खेदजनक बाब आंबेगाव तालुक्यामध्ये घडते आहे . असे अबु दाते यांनी नमूद केले . ज्यावेळी राजकीय कार्यक्रम असतात त्यावेळी लोकांना अमिष दाखवून गोळा करणारे राजकीय पुढारी सुद्धा या सभेकडे पाठ फिरवंतां ना दिसले त्यामुळे तरुणांमध्ये नाराजी आहे . याबाबत सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे फायद्याची असेल तर पुढारी असतात आणि अन्याय झाल्यावर पुढारी प्रशासनाची बाजू घेतात असा स्वर सभेत दिसला .

यापुढे आदिवासीला न्याय आणि हक्कासाठी झगडावे लागत आहे त्याचा कायद्याचा अवमान होत आहे ही बाब खेदजनक आहे असे बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण पारधी यांनी यावेळी नमूद केले .

यासाठी सर्वांनी आदिवासींच्या मागे उभे राहा असे आवाहन देखील केले . त्यानंतर सर्व सभा बांधकामाच्या ठिकाणी गेले असता तेथील वन अधिकाऱ्यांनी उद्या आपण काम बंद ठेवा असे सांगितले तोंडी सांगितले परंतु सकाळ पर्यंत दुसऱ्या दिवशी पोलीस फोर्स लावून काम चालू ठेवले . यावेळी जीवन माने यांनी सदर काम पेसा कायद्यामध्ये येत नाही आणि तुम्ही कायदा हातात धरायचा नाही असं ग्रामस्थांना सांगितले गरीब भोळाभाबडा आदिवासी या गोष्टीला घाबरून विरोध केला नाही . परंतु असा आदिवासींच्या बाबतीत किती दिवस पडणार अशी चर्चा आदिवासी भागांमध्ये आहे आदिवासींना कोणी वाली आहे का ? की आयुष्यभर त्यांनी दुसऱ्यांच्या आधारावर जगायचं असा सवाल उपस्थित होत आहे .

निवडणुकीपुरते पुढारी येतात आश्वासने देतात मात्र ज्यावेळी अन्याय होतो . त्यावेळेस मात्र आदिवासींना वाऱ्यावर सोडले जाते .
वनविभागाची मनमानी व पेसा कायदयाची पायमल्ली झाली आहे . सदर वन विभागाचे बांधकाम चालू राहिले तर येणाऱ्या सर्व निवडणुकी वर बहिष्कार टाकायचा असं ठरले आहे . असा ठराव यापुढील ग्रामसभेत ग्रामस्थ घेणार आहेत . या वेळी मोठ्या संख्येने चारही गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते .