Home Blog Page 142

जयहिंद शैक्षणिक संकुलात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली

नारायणगांव : (किरण वाजगे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जयहिंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कुरण मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहण्यात आली.
दरम्यान जयहिंद औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने देखील जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर जयहिंद शैक्षणिक संकुलात कार्यरत असणाऱ्या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका अंजली गुंजाळ व इंदूमती गुंजाळ यांच्या हस्ते संस्थेत कार्यरत असणाऱ्या महिलांना टिफिन बॉक्स भेट म्हणून देण्यात आले. तसेच गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केले आटोकाट प्रयत्न व कष्ट यामुळे आज समाजात स्त्रियांनी आपल्या कार्यकर्तुत्वाच्या जोरावर एक वेगळी ओळख मिळवली असून सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या कार्यामुळेच खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर सुरू झाला व त्यामुळे आज येथे सर्व सावित्रीच्या लेकी येथे उपस्थित आहेत.

यावेळी सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामली अकोलकर व आभार प्रदर्शन डॉ. वैशाली धेंडे यांनी मानले.

बी.जे.एस.च्या वाघोली विद्यालयातील विद्यार्थिनींना मलाबार चॅरिटेबल ट्रस्टची दहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती

गणेश सातव,वाघोली

वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या विद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थीनींना मलाबार गोल्ड चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने सी.एस.आर फंडा अंतर्गत सुमारे दहा लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. विद्यालयातील आर्थिक दुर्बल घटक, हुशार व गरजू विद्यार्थिनींना याचा शैक्षणिक बाबीसाठी मोठा फायदा होणार आहे.

मालाबार गोल्ड चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थीनीं कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्या अर्जांची विविध निकषांच्या आधारे वेगवेगळ्या टप्प्यावर पडताळणी करून ऐंशी मुलींची यातून निवड करण्यात आली. लवकरच हि शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे असे फिनिक्स मॉल मलाबार गोल्ड अँड डायमंड शाखेचे मुख्य व्यवस्थापक मोहम्मद जेरीश यांनी सांगितले. सदर शिष्यवृत्ती प्रदानाचा कार्यक्रम भारतीय जैन संघटनेच्या विद्यालयात पार पाडला .

यावेळेस फिनिक्स मॉल मलाबार गोल्ड अँड डायमंड शाखेचे मुख्य व्यवस्थापक मोहम्मद जेरीश,श्रीमती शीतल डूबल,सुमन डेव्हिड व अशोक आढाव ,विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी,प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे,पर्यवेक्षक पांडुरंग पवार,उपप्राचार्य पोपटराव गेठे उपस्थित होते.सदर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विद्यालयातील विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य व सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले. यावेळेस प्राचार्य संतोष भंडारी यांनी विद्यालयाच्या वतीने मलाबार ट्रस्टचे आभार मानले.

आधार छाया फाऊंडेशनच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार

धनंजय साळवे

कवठे येमाई – शिरुर येथे आधार छाया फाऊंडेशनच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.यामध्ये सामाजिक कार्यात चांगले काम केल्याबद्दल कवठे ग्रा.सदस्या व राजमाता महिला गृपच्या सौ. वैशालीताई दिपक रत्नपारखी यांना पुरस्कार देण्यात आला.

वैशालीताई यांनी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणुन केक ,ब्युटीशयन कोर्स सुरु केले त्यामुळे आज अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.त्याचबरोबर मुलांच्या कलागुणांना वाव भेटावा म्हणून किल्ले बनवा स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या.तसेच महिलांच्या सहलींचे आयोजन करुन त्यांना विमानप्रवासाची संधी दिली.राजमाता महिला गृपच्या माध्यमातून राजे शिवशंभु व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम ते करतात.जागतिक महिला दिनाच्या दिवशी या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते शिरुर येथे करण्यात आले.

कवठे ग्रामंचायत कडून मोकळ्या जागेत वृक्षारोपण

धनंजय साळवे

कवठे येमाई येथे झाडांचे महत्व ओळखुन कवठे ग्रामंचायत कडुन मोकळ्या जागेत व स्मशानभुमीत वृक्षारोपन करण्यात आले.पाचशे झाडांचे वृक्षारोपन पंचायत कडुन करण्यात आले, नुसती झाडे न लावता त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी घेण्यात आली.याकामी सरपंच रामदासशेठ सांडभोर व ग्रामसेवक श्री.संतोष गायकवाड साहेब यांनी पुढाकार घेतला.नागरीकांना वाढत्या प्रदुषनामुळे श्वसनाचे अनेकआजार होत आहे नैसर्गिक आॕक्सिजन ची कमतरता जाणवते.आॕक्सिजनचे महत्त्व सर्वांना कोविडच्या काळात सर्वांनाच समजले आहे.तसेच नागरीकांना नारळसारखे फळे मुबलकप्रमाणात गावातच नाममात्र दरात भेटावे असे नियोजन करण्यात आले आहे.स्मशानभुमी परीसरात विविध प्रकारची झाडे लावल्यामुळे तेथील परीसर रमणीय झाला आहे. झाडांना रोज पाणी देण्याचे काम ग्रामपंचायत कर्मचारी बबननाना शिंदे,हौसामामा शिंदे,कांतादादा पंचरास,गोटुभाऊ शिंदे,दळवी,उघडे,पंचरास हे नित्यनियमाने करत असतात.त्यांना ग्रा.सदस्य मधुकर रोकडे व सरपंच रामदास सांडभोर यांची मोलाची मदत होत असते.ते स्वतः जातीने लक्ष देत असतात.

ग्रा.सदस्य प्रविणशेठ बाफना,उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,ग्रा.सदस्य निखिल घोडे पाटील ,ग्रा.सदस्य ईचके ग्रा. सदस्या सौ. मनिषा पांडुरंग भोर,ग्रा. सदस्या सौ. वर्षाराणी सचिन बोऱ्हाडे,ग्रा. सदस्या सौ. ज्योति बाळशीराम मुंजाळ,ग्रा. सदस्या सौ. शोभा किसन हिलाळ,ग्रा. सदस्या सौ. सुनीता बबन पोकळे,ग्रा.सदस्या सौ.साधना नीलेश पोकळे,ग्रा.सदस्या मिनाताई डांगे,ग्रा.सदस्या सौ.दिपाली रत्नपारखी मा. सरपंच ,संगणक कर्मचारी सौ. प्रतिमा अमोल काळे,ग्रा.सदस्य गणेश उघडे,ग्रा.सदस्य उत्तम जाधव हे ही वारंवार भेट देत असतात.भावी काळात गावचा सर्व परीसर हिरवागार करण्याचा मानस ग्रामपंचायतीचा आहे.

अष्टापूर ग्रामपंचायतवतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा

उरुळी कांचन

आपल्या हक्कांबाबत स्त्रिया जागृत असणे आवश्यक आहे. स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ असणे आवश्यक आहे. महिलांनी एकत्रित येऊन बचत गटांच्या माध्यमातून तसेच रोजगार निर्मिती संदर्भात व शासकीय स्तरावरील अनेक योजनेचा लाभ घ्यावा असे मत अष्टापूरच्या सरपंच कविता जगताप यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने महिलांंन करीता विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, उपसरपंच सुभाष कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल, गणेश कोतवाल, योगेश जगताप, शिरिष मोरे, ताई कोतवाल, ग्रामविकास अधिकारी ज्योत्स्ना बगाटे, कृषी आधिकारी निलम कासारे, अंगणवाडी शिक्षिका, आदी ग्रामपंचायत सदस्य आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

पद्मश्री  मणिभाई देसाई महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन संपन्न

उरुळी कांचन

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन येथे सांस्कृतिक विभाग व महिला कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांचा १२५ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. अडसूळ होते.

या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. निलेश शितोळे व महिला कक्ष समन्वयक प्रा.गायकवाड एस.जे यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.आर के अडसूळ यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. ‘विद्यार्थ्यानी त्यांचा आदर्श घेऊन जीवनाची वाटचाल करावी व आपले ध्येय गाठावे.’असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. निलेश शितोळे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा. शुभांगी रानवडे यांनी केले. यावेळी प्रा. सुजाता गायकवाड, प्रा. अनुप्रीता भोर, प्रा. शुभांगी रानवडे, प्रा. प्रणिता फडके, प्रा. वैशाली चौधरी, प्रा. अमोल बोत्रे, प्रा. प्रवीण नागवडे, प्रा. विद्या लाळगे यांनी केले. प्रा. सुजाता गायकवाड, प्रा. बंडू उगाडे, प्रा.अंजली शिंदे, प्रा.डॉ. समीर आबनावे, प्रा. विजय कानकाटे, प्रदीप रजपूत, मोरेश्वर बगाडे कार्यक्रमाला उपस्थित होते.

महिलांच्या विविध प्रश्नांबाबत जागतिक महिला दिनी निदर्शने

सुरेश बागल,कुरकुंभ

भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा मध्ये ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संघटित व असंघीटत महिला कामगारांच्या विविध प्रश्नां संदर्भात लक्षवेधी निदर्शने करून महिला दिनाची जागृती निर्माण करण्यात आली.

महाराष्ट्र राज्यात २ लाख ५६ हजार बिडी ऊद्योगातील महिला कामगार कार्यरत असून सरकारच्या नियम व कायदे मुळे बिडी रोजगार संपुष्टात येत आहे पण पर्यायी रोजगार ऊपलब्ध नसल्याने बिडी महिला कामगारांना मोठ्या प्रमाणात बेरोजगारीला सामोरं जावं लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने १०/११/२०१४ रोजी च्या अधिसूचना नुसार निश्चीत केलेले किमान वेतन ही अद्याप मिळत नाही. सध्या कायदाप्रमाणे ३२४ रू .७३ पैसे प्रति हजार रू. मिळणे आवश्यक असताना सध्या १८८ रू. १५ पैसे च मिळत आहे. किमान वेतनच्या अंमलबजावणी करिता भारतीय मजदूर संघ संघाने शासना सोबत वारंवार संर्पक, आंदोलन करूनही शासन ने पुर्ण पणे दुर्लक्ष केले आहे. म्हणून जागतीक महिला दिनाच्या दिवशी रोजगार रक्षणासाठी, किमान वेतना करिता साबळे वाघिरे कारखाना भवानी पेठ पुणे येथे महाराष्ट्र राज्य विडी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) वतीने निदर्शने करून महिला वरील अन्याय दुर करण्या साठी संकल्प महिला दिनी करण्यात आला.

या वेळी अखिल भारतीय बिडी कामगार महासंघाचे सरचिटणीस उमेश विस्वाद, बाळासाहेब भुजबळ सेक्रेटरी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा, वासंती तुम्मा, गिता नागुल, सुरेखा गुंदेटी, वैशाली शिरापुरी, महिला आघाडी प्रमुख वंदना कामठे, बेबीराणी डे ,यांनी मार्गदर्शन केले .
तसेच विज ऊद्योगातील महाराष्ट्र विज कामगार महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ च्या वतीने रास्ता पेठ, गणेश खिंड सर्कल आॅफीस, पिंपरी महावितरण कार्यालय येथे महिला कामगारांच्या खालील प्रश्नांची बाबतीत गेट मिटींग घेवून मागण्या करण्यात आले.
प्रमुख मागण्या-
१)मृत कामगारांच्या महिला वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, अन्यथा मासिक निर्वाह भत्ता मिळवा.
२) महिला लाईन स्टाफ ला बील वसुली करिता ग्राहकां कडून मिळणारे धमक्या, शिवीगाळ, मारहाण, विज प्रशासनाने कडक कायदे करून विशेष सुरक्षा पुरविण्यात यावी.
३) अधिकारी कडून महिला कामगारांना अपमानास्पद वागणूक, असभ्य भाषा वापरली जाते या बाबतीत त्वरित प्रतिबंध करून संबंधित व्यक्ती वर कारवाई करण्यात यावी.
४) महिला कामगारांना रात्र पाळीत सुरक्षा व प्रवासाची हमी प्रशासन ने द्यावी.
अशी मागणी पत्राचे निवेदन मा मुख्य अभियंता सचिन तालेराव यांना देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र विज कामगार महासंघाचे श्री सुरेश जाधव, रोहिणी पाटसकर, जयश्री शेलोकर, धनश्री कुंभार, भक्ती जोशी, भरत अभंग, ज्ञानेश्वर माने, शेखर मारणे , आदी महासंघाचे पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

महिला दिनचे औचित्य साधून वाचनवेड संस्थेच्या वतीने पुस्तकांचे वाटप

चाकण- पुणे येथील वाचनवेड संस्थेच्या माध्यमातून व देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या पुढाकारातून खेड मधील १९ जिल्हा परिषद शाळांना वाचनाची पुस्तके देण्यात आली.

पिंपरी बु ॥ जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ह.भ.प.सुप्रिया ताई ठाकूर,जि.प.सदस्य श्री. बबाजी काळे,सभापती सौ.वैशालीताई जाधव, श्री.कैलास गाळव,श्री.मंगेश सावंत गटशिक्षण अधिकारी अभंग प्रतिष्ठानचे श्री.सागर मोरे,श्री.सचिन कुंभार,प्रा.विकास कंद,श्री.सचिन काळोखे,श्री.अमोल काळोखे,श्री.लकी काळोखे इ.मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत केली जातात.परंतू अवांतर वाचनासाठी वाचनसाहित्य उपलब्ध होत नाही.वाचनवेड संस्थेचे प्रमुख किरीट मोरे,मयूर सेठ यांच्या माध्यमातून हर्षद सुराणा,सांभव भाटिया,दिपेन जैन तसेच संतोषी मित्र मंडळ,पुणे यांच्या सहकार्यातून सदर पुस्तके सर्व शाळांसाठी उपलब्ध करुन दिली.

चरित्रात्मक पुस्तके वाचल्याने व्यक्ती चारित्र्यवान बनतो.संस्कार ही काळाची गरज असून पुस्तकांचे मानवी जीवनातील योगदान हे अनन्यसाधारण आहे,असे मत जि.प.सदस्य श्री. बबाजी काळे, यांनी व्यक्त केले. माणूस परिपूर्ण बनतो.चारित्र्य व समाजकार्य हीच माणसाची खरी संपत्ती असून त्यासाठी सातत्याने वाचन केले पाहिजे असे विचार प्रा.विकास कंद यांनी व्यक्त केले.

ग्रंथ वाचन करणाऱ्या ग्रंथाच्या माध्यमातून विश्वाची अनोखी सफर ही करू शकतो. पुस्तकाच्या या जगाचे वर्णन करताना प्रसिद्ध समीक्षक शंकर सारडा लिहितात,” पुस्तकांशी कधी तरी आपली मैत्री जुळते आणि मग पुस्तके जन्मभर आपली साथ-संगत करीत राहतात. पुस्तकाचे जग किती विशाल, किती अथांग….. जगातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाचे आपलं नातं जोडणारा आणि भूत, वर्तमान, भविष्यकाळाचे वेध घेणारे ‘ हे विश्वची माझे घर’ याचा साक्षात्कार घडवणारे आहे.असे मत सुप्रिया ताई यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक विकास दादा ठाकुर यांनी केले. तर सुत्रसंचालन श्री.दिलीप ढमाले यांनी केले. आभार सौ.खोडदे यांनी मानले.

कस्तुरबा मातृमंडळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्त आदर्श नारी पुरस्काराने महिलांचा गौरव

उरुळी कांचन

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येथील कस्तुरबा मातृमंडळ यांच्या वतीने आयोजित आदर्श नारी पुरस्कार व वेशभूषा स्पर्धा आयोजित करुन एक आगळा वेगळा उपक्रम साजरा करण्यात आला. कस्तुरबा मातृमंडळाची स्थापना १४ मार्च १९८५ रोजी उरुळी कांचनचे भाग्यविधाते डॉ मणिभाई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक शैक्षणिक सामाजिक महिला व बालकांचा सर्वागीण विकासासाठी मातृमंडळ काम करत असते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन यांनी भूषविले. या कार्यक्रमात आदर्श नारी पुरस्कार पुष्पाताई पद्वाड, युमनाताई कांचन पाटील, श्रीमती विजया फुलफगर यांना देण्यात आला. वेशभूषा पुरस्कार अश्विनी जगताप, उषा गायकवाड, मिना मेटे यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशिला मेटे व कस्तुरबा मातृमंडळाच्या अध्यक्षा सुरेखा भन्साळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी कुलकर्णी यांनी केले.

या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, माजी सभापती योगिनी कांचन, मा.उपसरपंच संचिता कांचन, जेष्ठ सदस्या जयश्री बेदरे, मनिल फुलफगर, प्रिया बलदोटा, आशा कांचन, छाया नहार, अरुणा हेंद्रे, राजश्री शितोळे, साळुंखे ताई, आदी महिला उपस्थितीत होत्या. आभार संगिता भालके यांनी केले.

दुबईतील शिवरायांच्या मावळ्यांनी शिवजयंती घराघरात केली साजरी

दुबई- या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर व पुणे च्य दुबईतील शिवराय च्या मावळेनी शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ शिवजयंती साजरी करण्यात आली होती.

शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ हा कार्यक्रम दुबई मधे आयोजन केले प्रत्येकाने घरोघरी मावळेनी व शिवभक्तांनी आनंदाने शिवजयंती साजरी केली.

यामध्ये साईनाथ मांजरे, संदीप कड, अमोल थिगळे , रघुनाथ संगळे पाटील, अनवर खान, हरीश दौडकर ,दादा पवळे, संतोष होले, सचिन साले,संदीप निमसे ,अभिनंदन टावरे, आजु चोरघे ,विशाल मसुरकर आदी सहभागी झाले होते.