जाहिरात
जाहिरात
Home Blog Page 141

गोपीचंद पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी-दिलीप वाल्हेकर

अमोल भोसले, उरुळी कांचन — प्रतिनिधी

भाजपनं गोपीचंद पडळकर यांना आमदार का केले याचं उत्तर आज राज्याला समजले. परंतु भाजपच्या दारात गळ्यात पट्टा घालून साखळी घातलेल्या भूकणाऱ्याला महाराष्ट्र दाद देणार नाही. दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी पवारसाहेबांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात फिरु देणार नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकनेते शरद पवार यांच्या विषयी केलेल्या विधाना बद्दल जाहीर निषेध नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणून हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांना निवेदन देण्यात आले.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकनेते शरद पवार यांच्या विषयी केलेल्या विधानाचा जाहीर निषेध करतो त्यांनी यापुढे आपली योग्यता – आपली क्षमता पाहून बोलावे असे शिंदवणे गावचे सरपंच आण्णासाहेब महाडिक यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत गवळी, हवेली तालुका पंचायत समितीचे उपसभापती सनि काळभोर, चित्रपट साहित्य कला सांस्कृतिक विभागाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय तुपे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नंदकुमार काळभोर, जेष्ठ नागरिक सेलचे रा.कॉ.पुणे जिल्हा अध्यक्ष सोनबा चौधरी, सोरतापवाडी ग्रामपंचायतचे सदस्य राजेंद्र चौधरी, आप्पासाहेब काळभोर, तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन, युवा नेते सागर कांचन विद्यार्थी तालुका अध्यक्ष सनि चौधरी, सांस्कृतिक तालुका अध्यक्ष विशाल भोसले, स्मिता नॉर्टन, रामभाऊ तुपे, ऋषीकेश काळभोर, संजय चौधरी आदि उपस्थित होते.

धामणेतील कंपनीला भीषण आग

चाकण : खेड तालुक्यातील धामणे येथील वेफर्स कंपनीला बुधवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. दरम्यान, ही आग कशी लागली, हे अद्यापपर्यंत समजू शकले नाही.

धामणे येथील बटाटा वेफर्स तयार करणाऱ्या कच्छ अँग्रो कंपनीला शुक्रवारी सकाळी १०.३० ला अचानक आग लागली. त्यामुळे कंपनीत आलेल्या कामगारांची धावाधाव सुरू झाली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीचे व धुराचे लोळ पाच किमी अंतरावरुनही दिसत होते. घटनास्थळी तत्काळ राजगुरुनगर परिषद, चाकण एमआयडीसी व बजाज कंपनीचे अग्निशमन दल दाखल झाले. दरम्यान, ज्या ठिकाणी तेलाचा साठा होता त्या विभागाचा या आगीशी सुदैवाने संपर्क झाला नाही. आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नकमान द्याले आहे

जेष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल यांची भेट

सुनील जगताप, ऊरळी कांचन प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने काल राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन त्यांच्याशी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य या विषयावर चर्चा केली व यामध्ये पत्रकारांचा प्रतिनिधी असावा या मागणीचे निवेदन दिले.

  राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. राज्यपाल विधान परिषदेवर १२ सदस्य नियुक्त करणार आहेत.. घटनेतील कलम १७१ (५) नुसार राज्यपालांच्या कोट्यातून साहित्य, विज्ञान, कला, पत्रकारिता, सामाजिक कार्य आदि क्षेतातील लोकांचीच नियुक्ती करावी असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. राज्यपाल महोदयांनी नियुक्त्या करताना घटनेतील या तरतुदींचा आग्रह धरावा अशी विनंती देशमुख यांनी राज्यपालांना केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील पत्रकार होते.. त्यामुळे त्यांनी पत्रकारितेतील सध्याच्या बदलांची माहिती जाणून घेतली. राज्यात पत्रकारांना पेन्शन मिळवून देण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेनं केलेल्या संघर्षाची माहिती त्यांना देण्यात आली. “महाराष्ट्र हे देशातील असे एकमेव आणि पहिले राज्य आहे की, जेथे पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळालेले आहे” हे ऐकून राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. मात्र   “कायदा झाला असला तरी या कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे होत नसल्यानं पत्रकारांवरील हल्ले थांबत नसल्याचे देशमुख यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले, पत्रकार संरक्षण कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली.

पत्रकारांचा प्रतिनिधी विधान परिषदेत असावा” अशी विनंती किरण नाईक यांनी राज्यपाल महोदयांकडे केली, त्यासाठी पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते एस.एम.देशमुख यांना संधी मिळावी अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली त्यावर राज्यपालांनी पत्रकारांचा प्रतिनिधी सभागृहात असला पाहिजे यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. सुमारे पंधरा मिनिटे ही भेट व चर्चा चालली “मराठी पत्रकार परिषद ही राज्यातील पत्रकारांची सर्वात जुनी आणि ८२ वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेली संस्था असून राज्यातील ८ हजार पत्रकार परिषदेशी जोडलेले आहेत” अशी माहिती यावेळी शरद पाबळे आणि बापुसाहेब गोरे यांनी राज्यपाल महोदयांना दिली त्यावर राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, मिडिया सेलचे राज्य निमंत्रक बापुसाहेब गोरे, स्वप्निल नाईक आदिंचा समावेश होता.

उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाऊसाहेब कांचन

अमोल भोसले, उरुळी कांचन — प्रतिनिधी

पूर्व हवेली तालुक्यातील उरुळी कांचन मोठी बाजारपेठ असणारी ग्रामपंचायत येथील राजकारणाचा अद्यापही कोणालाही अंदाज आलेला नाही. येथील ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीने अचानक वेगळे वळण घेत झालेल्या गुप्तमतदानात ९ विरुद्ध ४ अशा मताच्या फरकाने भाऊसाहेब कांचन विजयी झाले. तर सूचकाने मतदान न करण्याचा प्रकार घडल्याने हा सर्वांच्या चर्चेचा विषय झाला. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या २०१५ ते २०२० या पंचवार्षिक निवडणुकीत एकाच पॅनेल मधून निवडून आलेल्या ७ , दुसऱ्या पॅनेलमधून निवडून आलेल्या ५ व अपक्ष ५ अशा १७ सदस्यांनी सत्तेचा सारीपाट वाटून घेण्याचा चांगला पायंडा संगनमताने राबविला पण यातही एकमेकाविरुद्धचा गैरविश्वास दाखविणे शेवटपर्यंत काही थांबले नाही.आजही सदस्यांत उपसरपंचपदासाठीचा संघर्ष उघड झाल्याने तीन सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरले व शेवटपर्यंत मागे न घेतल्याने गुप्त मतदान होऊन भाऊसाहेब कांचन यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राजेंद्र जगताप व सारिका मुरकुटे यांचा ९ मते मिळवीत उपसरपंचपद खेचून घेतले. या प्रकाराने उरुळी कांचन मधील स्थानिक राजकारणातील सुंदोपसुंदी व कुरघोडीचे खेळ यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

सरपंच राजश्री वनारसे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (दि.२३) रोजी झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीच्या ठरलेल्या निर्धारित वेळेत कोणीही अर्ज माघारी न घेतल्याने उपसरपंचपदासाठी तिरंगी लढत झाली. एकुण १५ सदस्यांनी या निवडणुकीत गुप्त मतदान पध्दतीने मतदानात सहभाग घेतला पैकी विजयी उमेदवाराला ९ मते, एका उमेदवाराला ३ तर एका महिला उमेदवाराला फक्त स्वतःचेच मत पडल्याने ९ मते मिळवणारा उमेदवार विजयी झाल्याचे सहायक पिठासीन अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी के.जी.कोळी यांनी घोषित केले. विशेष म्हणजे या प्रक्रियेत २ मते बाद झाली.

साप चावलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वळती (ता.आंबेगाव) येथील महिलेचा हाताला साप चावल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची घटना घडली.याबाबत संतोष म्हातारबा आजाब यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार (दि. २३) रोजी भामाबाई बबन आजाब (वर्ष ५५ रा.वळती ता.आंबेगाव जि. पुणे) या गावातीलच रवींद्र भानुदास लोखंडे यांच्या शेतात भुईमूग काढण्यासाठी गेल्या होत्या त्या वेळी भुईमूग काढत असताना सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या हाताला साप चावल्याने रवींद्र लोखंडे यांनी याबाबत त्यांच्या कुटुंबियांना कळवून त्यांना मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.भामाबाई आजाब यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.याबाबत संतोष आजाब यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ईश्वर कदम करत आहे.

प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना पोलीस सेवेत घ्या

राजगुरुनगर-महाराष्ट्र राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने पोलीसांवर कामाचा ताण असून शासनाने 2018 च्या पोलीस भरतीतील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना प्राधान्यक्रमाने सेवेत सामील करून घ्यावे अशी मागणी होत आहे. याबाबत आगामी अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडून शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले जावे अशी मागणी भाजप विधानभवन सेक्रेटरी राजु खंडीझोड ,भाजप युवा मोर्चाचे माजी खेड ता.अध्यक्ष अशोकराव टाव्हरे, प्रतिक्षा यादीतील उमेदवार आनंद तनपुरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यात 2018 ची पोलीस भरती झाल्यानंतर नव्याने पोलीस भरती झाली नाही.अनेक पोलीस कर्मचारी,अधिकारी निवृत्त होत आहेत, कोरोना समस्येतून पोलिसांना कर्तव्य बजावताना आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. 50वर्षावरील व मधुमेह,रक्तदाब,ह्रदयविकार हे आजार असलेल्यांना मर्यादा येत आहेत.

राज्य सरकारने सर्व पदांची भरती एक वर्ष पुढे ढकलली आहे. आरोग्य खात्याला त्यातून वगळले आहे. पोलीस सेवा ही सध्याच्या काळात अत्यावश्यक झाली असून नवीन भरती प्रक्रीया राबविण्याऐवजी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना तातडीने भरती केले जावे अशी मागणी राज्यभरातून विविध पक्षांचे नेते ,संघटना यांच्याकडून होत आहे.

सध्याच्या पोलीसांना असलेला ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शासनादेश काढून तरूणांना दिलासा दिला जावा अशी मागणी जोर धरत आहे.नवीन पोलीस भरती प्रक्रीया करण्यात वेळ जाणार आहे, त्यापेक्षा लेखी परीक्षा,शारिरीक चाचणी व इतर प्रक्रीया पुर्ण केलेल्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना तातडीने सेवेत घेणे उचित ठरेल. पोलिसांचे संख्याबळ अपुरे आहे,त्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना जादा काम करावे लागत आहे,अनेक पोलिसांना राज्यात कोरोना आजार झाला असून काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. शासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करावा व प्राधान्यक्रमाने प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना पोलीस सेवेत घ्यावे अशी मागणी होत आहे.

कोरोना प्रादुर्भावाने पोलीसांवर कामाचा अतिरिक्त ताण असून 2018च्या पोलीस भरती प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने तातडीने कार्यवाही करावी.
– राजू खंडीझोड
सेक्रेटरी-महाराष्ट्र भाजप विधानभवन

पूर्व हवेली तालुक्यात कोरणा संसर्ग करतोय जोमाने वाटचाल ! उरुळी कांचनमध्ये सापडला नव्याने रुग्ण

अमोल भोसले, उरुळी कांचन —प्रतिनिधी

उरुळी कांचन येथे डाळिंब रोडला राहणाऱ्या एका २५ वर्षीय युवकाचा  कोरोना संसर्ग तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ.सूचिता कदम यांनी दिली, या रुग्णाला पुण्याला पाठविण्यात आले आहे, हा रुग्ण कुरकुंभ येथील एका खाजगी कंपनीत कामाला होता पण लॉंकडाऊनमुळे सध्या तो मित्राच्या रूमवर उरुळीत राहत होता त्याला त्याच्या गावाला बेंगलोरला जायचे होते म्हणून कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली  तर त्याच्या संपर्कात आलेल्या लोणी काळभोर येथील नागरिकांची माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली आहे तसेच हडपसर येथील एका मोठ्या खाजगी कंपनीत कामाला असलेल्या कोरेगावमूळ येथील मुळ रहिवासी असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीला गेल्या महिन्यापूर्वी कोरोणा संसर्ग झाला होता , तो बरा होऊन घरी १४ दिवस कोरंटाईन राहिला होता मात्र कामावर जाण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेटसाठी पुन्हा त्याची कोरोना टेस्ट केली असता तो तपासणी अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने कोरेगावमुळच्या नागरिकात चांगलीच घबराट उडाली आहे तसेच  येथीलच एका ३६ वर्षीय महिलेचा व तिच्या १४ वर्षीय मुलाची  तपासणी पॉझिटिव्ह आल्याने कोरेगांवमूळ येथील कोरोनाग्रस्त रुग्णाची  संख्या ३ झाली आहे, ही महिला लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात कामाला आहे,

     उरुळी कांचन आणि परिसरामध्ये गेल्या सुमारे १५ ते २० दिवसात कुठल्याही पद्धतीने रुग्णांमध्ये वाढ झाली नव्हती परंतु आज सापडलेल्या डाळिंब रोडच्या रुग्णामुले व कोरेगावमुळ मध्ये नव्याने बाधीत झालेल्या २  रुग्णामुळे परिसरावर कोरोणाचे संकट पुन्हा गडद होताना दिसत आहे,  कोरोना संसर्ग होण्याची साखळी वाढत चालली आहे त्यामुळे पुणे सोलापूर रोड वरील महत्त्वाच्या गावांना कोरोना संसर्गाने पुन्हा घट्ट विळखा घातला असल्याची परिस्थिती उद्भवलेली असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महावितरणने जादा दराचे व जादा युनिटचे विज देयक ग्राहकाच्या मानगुटीवर लादलेले वीज बील कमी करण्याची उरुळी कांचन भाजपकडून मागणी

अमोल भोसले,उरुळी कांचन—प्रतिनिधी

महावितरणने जादा दराचे व जादा युनिटचे विज देयक ग्राहकाच्या मानगुटीवर लादले आहे ते कमी करण्याची उरुळी कांचन भाजपकडून मागणी. लॉक डाऊन काळात महावितरण कडून घरगुती मीटर रिडींगचे काम बंद असताना व लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महावितरणने रिडींग घेऊनही जादा युनिटचे विज देयक ग्राहकाच्या मानगुटीवर लादले आहे. यावाढीव देयकांमुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड बसणार असुन महावितरणने तात्काळ वीज बिले दुरुस्त करण्याची मागणी उरुळी कांचन भाजपच्या वतीने उरूळीकांचन उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता प्रदिप सुरवसे यांना निवेदन देऊन केली आहे

भाजपच्या वतीने युवा नेते अजिंक्य कांचन ,सुनिल गायकवाड , भिमराव चौधरी , सर्जेराव चौधरी, म्हस्कु चौधरी , महेश गायकवाड व विठ्ठल मारणे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले आहे. या निवेदनात मुखत्वे उरुळी कांचन उपविभागांतर्गत गावातील जनतेला वाढीव विज बिलाचा झटका बसला आहे. कोरोना काळात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर या परिसरात वीज ग्राहकांची मिटर रिडींग घेताना खाजगी एजन्सी कडून चुकीचे रिडींग घेतले आहे किंवा मीटर रिडींगचे प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तींनी ते काम केले असण्याची श्यक्यता नाकारता येत नसल्याने जादा आकारणी झाली असावी अथवा जागेवर बसून रिडींग देण्याचा प्रकार झाल्यामुळे हा वाढीव वीजेच्या बिलांचा बोजा ग्राहकांवर पडला आहे. सद्यस्थितीत ग्राहकांना वीज बिले भरणे शक्य नसल्याने वाढीव बिले दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी युवा नेते अजिंक्य कांचन, सुनिल गायकवाड व गणेश चौधरी यांनी उपअभियंता प्रदिप सुरवसे यांच्याकडे केली आहे.

वीज बिला संदर्भात तक्रारी आल्या आहेत…. येणार आहेत, परंतु एप्रिल मध्ये विजेच्या दरात वाढ झाली असून त्यामुळे ती जादा वाटत आहेत, ग्राहकांना लॉकडाऊन काळात प्रत्यक्ष मीटर रिडींग घेतले नसताना सरासरी वापर गृहीत धरून वीज बिले दिली होती परंतु आता प्रत्यक्षात मीटर रिडींग घेऊन वापर केलेल्या युनिटचे बिल नेहमीप्रमाणे देण्यात येणारे लाभ देऊन दिली आहेत तरीही ज्या कोणा ग्राहकाला बिल चुकीचे आहे असे वाटत असेल त्याच्या बिलाची तपासणी करून चुकीचे असेल तर ते दुरुस्त करून दिले जाईल असे अश्वासन प्रदीप सुरवसे यांनी यावेळी दिले.

शिवसैनिकांच्या वतीने शिवसेनेचा वर्धापनदिन सामाजिक जाणिवेतून साजरा

अतुल पवळे पुणे
१९ जून बाळासाहेबांनी रोवलेल्या “शिवसेना” नावाच्या वटवृक्षाला ५४ वर्षे पूर्ण होत आहेत. या ५४ वर्षांच्या कालावधीत आपल्या शिवसेनेने अनेक चढ-उतार पाहिले. शिवसेना या चार अक्षरासाठी अहोरात्र झटणाऱ्या तमाम शिवसैनिकांना ५४ व्या शिवसेना वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आज शिवसेनेचे५४ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड दक्षिण चे प्रमुख व भारतीय कामगार सेना आयटीचे प्रमुख दीपकभाऊ शेडे व खडकवासला विधानसभा समन्वयक भावनाताई थोरात यांच्या हस्ते शिवणे उत्तम नगर कोंडवे धावडे, कोपरे, येथील वीज वितरण कंपनी मधील अधिकारी सर्व कर्मचारी याना सॅनिटीझर आणि मास्क वाटप करण्यात आले

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अविनाश सरोदे,उपविभाग प्रमुख संजय नायर, खडकवासला शिवसेना संघटक शांताराम पठार, सुरेश मोकाशी, शिवसैनिक शिवकुमार कोणालिकर, शाखाप्रमुख तेजस साळुंके, शिवाजी कुंभार,सतीश खोपडे, अभिजीत मोकाशी,कौस्तुभ उदास, रुपेश पवाल,अमोल गुंजाळ प्रकाशआप्पा पवार,सर्व शिवसैनिक उपस्थित होते.यांनी आभार मानले. विद्युत महावितरणच्या वतीने अभियंता किंबवने साहेब यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसैनिक संतोषदादा शेलार यांनी केले होते.

20,829FansLike
0FollowersFollow
68,557FollowersFollow
0SubscribersSubscribe