Home Blog Page 140

मुंजाळवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी पा़ंडुरंग मुंजाळ

धनंजय साळवे

कवठे येमाई – बापूसाहेब गावडे विविध कार्यकारी सोसायटी मुंजाळवाडी चेअरमन पदी राष्ट्रवादीचे श्री. पांडुरंग गोविंद मुंजाळ व व्हा.चेअरमन पदी श्री.सोपान मारुती देवकर यांची निवड झाली.अतिशय उत्सुकता असलेल्या मुंजाळवाडी सोसायटी ची निवडणुक पार पडली.यावेळी काहिसा तणाव जाणवत होता.कोणत्या पक्षांच्या उमेदवारांच्या गळ्यात पडेल या बद्दल उत्सुकता होती. परंतु राष्ट्रवादीने आपल्या बाजुने विजय मिळवला. फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला.

विजयी उमेदवारांचे मा.श्री.आमदार पोपटराव गावडे ,घोडगंगा कारखान्याचे संचालक श्री.राजुशेठ गावडे.मा.पं.सदस्य श्री. सुदामभाऊ गावडे,युवानेते श्री.बाळासाहेब डांगे यांनी अभिनंदन केले.निवडणुक अधिकारी म्हणून श्री.के.डी.मोरे व सचिव श्री. अर्जन बुधाजी शिंदे यांनी काम पाहीले.

अकरावीत शिकणाऱ्या आदित्यचा भन्नाट प्रयोग

धनंजय साळवे

कवठे येमाई – सविंदणे येथे अकरावीत सविंदणे येथे अकरावीत शिकणारऱ्या कु.आदित्य संदिप कदम या शालेय विद्यार्थ्याने जुन्या हिरो होंडा सी.डी.१०० एस.एस.या गाडीच्या इंजिनमध्ये थोडा बदल करुन गाडी पायाने किक न मारता हाताने बटनावर चालु करण्याची किमया केली आहे. या साठी त्याला कान्हुर मेसाई येथील तरुण सचिन पुंडे या तरुणाने मदत केली.आदित्य याच्या वडीलांचे कवठे येमाई येथे गुरुकृपा ऑटो हे दुकान आहे.

शाळा शिकुन तो वडीलांना गाडया दुरुस्तीला मदत करत असतो.त्याने विज्ञान प्रदर्शनात अनेक ठिकाणी बक्षिसे मिळवली आहेत. या प्रयोगासाठी त्याने एक अल्टरनेटर मिळविला व जुन्या होंडा एस एस च्या इंजिनमध्ये थोडा फार बदल करुन प्रयोग यशस्वीरित्या पुर्ण केला.या प्रयोगामुळे वयस्क व ज्यांना पायाच्या दुखण्याचा त्रास आहे त्यांना निश्चित फायदा होईल. तसेच जे नविन गाडी खरेदी करु शकत नाही परंतु त्यांना बटन स्टार्ट गाडी पाहिजे त्यांना हा प्रयोग फायदेशीर आहे.

तालुकास्तरीय इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धेत नारायणगाव नंबर दोन शाळेची उल्लेखनीय कामगिरी


नारायणगाव : (किरण वाजगे)
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील दहा कलमी उपक्रमांतर्गत झालेल्या तालुकास्तरीय इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायणगाव नंबर २ शाळेचा conversation(संभाषण) प्रथम क्रमांक- अर्पिता वाकोडे आणि स्वरा फदाले, Dramatization (नाट्यीकरण) द्वितीय क्रमांक आणि poem/rhymes singing तृतीय क्रमांक-हर्षदा शिंगोटे, प्रणिता भोर, आदिती धोंगडे, प्राजक्ता बागुल, पूर्वा लाडके, स्वरा फदाले, त्रिशा पिंपळे, नम्रता पायाळ, सूनैना राजभर, लक्ष्मी बिष्ट या स्पर्धकांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

यामध्ये conversation(संभाषण) याप्रकारासाठी अर्पिता वाकोडे आणि स्वरा फदाले, यांची जिल्हा स्तरावर निवड झाली या स्पर्धेसाठी वर्षा हांडे, आशा झोडगे, सुनिता डुंबरे, मोनाली गायकवाड, वर्षा पवार यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, सरपंच योगेश पाटे, केंद्रप्रमुख माधुरी शेलार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले. अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका आशा झोडगे यांनी दिली.

पीएमपीएलची बस सेवा घोडेगाव पर्यंत सुरू ; कुंदन काळे यांच्या प्रयत्नांना यश

घोडेगाव-

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पर्यंत आता पीएमपीएलची बस सेवा सुरू झाली असून या बससेवेचा शुभारंभ ढोल -ताशाच्या गजरात वाजतगात तसेच फटाक्याच्या अति बाजीने संपुर्ण बाजारपेठेत मोठया आनंदाने मिरवणुक काढत, संपन्न झालाय. तसेच चौकत ठिक ठिकाणी पेढे देखिल वाटण्यात आले.

भोसरी ते घोडेगाव व घोडेगाव ते मंचर अशी पीएमपीएल ची बससेवा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी नागरिकांना कमी खर्चात कमी वेळात आता पुणे पिंपरी-चिंचवड शहरा पर्यंतचा प्रवास करता येणार आहे. भोसरीचे दमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शना खाली घोडेगावचे कुंदन काळे ज्यांच्या विषेश प्रयत्नांतुन हि बस सेवा सुरु झाली आहे.ग्रामीण भागापर्यंत ही बससेवा सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे सोबत शालेय विद्यार्थ्यांनाही याचा आता मोठा फायदा होणार असून पैशासोबत वेळेचीही आता बचत होणार असल्याने नागरिकांमध्ये हि मोठा उत्साह पाहायला मिळला.

यावेळी महिलांनी रागोळी काढुन बसचे स्वागत केले. या बसच्या स्वागतासाठी घोडेगांव पंचक्रोशीतील अनेक नागरिक व महिला भगिणी उपस्थित होत्या. तसेच विविध पक्षातील नेते ,पदाधिकारी ,कार्यकर्ते एकत्र आलेले पहावयास मिळाले.

या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती कैलासबुवा काळे ,सामाजिक कार्यकर्ते कुंदन काळे,घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे,उपसरपंच सोमनाथ काळे,ताराचंद कराळे, जयसिंग येंरडे,
भानुदासनाना काळे, तुकाराम काळे ,
सखाराम काळे,अशोक आप्पा काळे,जयसिंग काका काळे, विजयराव पवार, शामशेठ होणराव,माऊली अप्पा घोडेकर, किरणशेठ घोडेकर, गोविंद भास्कर , सुषांत थोरात , गणेश बाणखेले ,स्वप्निल घोडेकर,सागर झोडगे,गणेश घोडेकर,गणेश वाघमारे,प्रशांत काळे, राजेश काळे ,मुकुंद काळे, संतोष बोऱ्हाडे ,अँड वैभव काळे ,गोरक्ष मंडलिक, शिवदास काळे,अजित काळे, दशरथ काळे,बाळासाहेब गुळवे,धनंजय फलके,वैभव शिंदे,भास्कर घोलप,सचिन घोडेकर, महेश बोऱ्हाडे , साईनाथ बोऱ्हाडे ,गणेश कसबे , राम फलके , विनायक काळे ,वैभव मंडलिक, संतोष काळे , दिपक घोडेकर , रुपेश काळे
अलका घोडेकर,माधवी कर्पे,जोती घोडेकर,रुपाली झोडगे,राजेश्वरी काळे,रत्ना गाडे,मृणाल काळे ,मंगल जैद आदि मान्यवर उपस्थित होते.

या बसच्या भोसरी ते घोडेगांव दिवसभरात ६ फेर्‍या असणार असुन अधिकृत असणार्‍या प्रत्येक बसथांब्यावर हि बस थांबणार आहे. सर्वसाधारन नागरिकांसाठी दैनिक पास ७० रुपये तर जेष्ठांसाठी ४० रुपये ह्या सवलतीच्या दरात प्रवासी पास उपलब्ध असणार आहे.

या कार्यक्रम प्रसंगी पि.एम.पि.एम.एल.चे सुनिल चव्हाण,निलेश शेलार,दिपक गायकवाड,अमोल गावडे,सखाराम भोईर भोसरी आगराचे अधिकारी व कर्मचारी वाहक व चालक यांचा घोडेगाव ग्रामस्त, घोडेगाव ग्रामपंचायत,हरिश्चंद्र देवस्थान यांच्या वतीने फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.

बचत गटाच्या महिलांनी संघटनातून स्वतःच्या आरोग्यासाठी जास्त वेळ दिला पाहिजे -माजी सभापती उषाताई कानडे

घोडेगाव

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी योगा प्रशिक्षणाचे आयोजन कळंब येथील महिला बचत गटांनी केले होते. महिला कुटुंबातील आर्थिक प्रश्न सोडवून सक्षम होत आहेत.परंतु स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महिलांनी बचत गटाच्या संघटनातून स्वतःच्या आरोग्यासाठी जास्त वेळ दिला पाहिजे असे प्रतिपादन पंचायत समिती आंबेगावच्या माजी सभापती उषाताई कानडे यांनी केले. महिलांनी आरोग्य विषयक जाणीवजागृती साठी शिवार फेरीचे आयोजन केले होते.

यावेळी महिलांना जाणवणाऱ्या आजार व व्यायाम या विषयावर आर्ट ऑफ लिव्हिंग च्या प्रशिक्षक संगीता ढमाले व सुवर्णा मुळे यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून घेतले.यशवर्धिनी संघाच्या मार्गदर्शनाने कळंब भागात 500 महिलांचे संघटन करून बचत गटांचे कार्य सुरू आहे.

संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार घोलप यांनी महिलांना बचत गट ते महिला उद्योजकता विकास या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी सविता मुंढे, मदिना पटेल,मीना गव्हाणे, ललिता वरपे,शांता थोरात, रुपाली कानडे,सानिया शेख या उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कल्पना एरंडे, सुहास वाघ, सीमा कानडे, हरिभाऊ गेंगजे,सारिका भालेराव यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन रंजना आंग्रे यांनी तर आभार सविता चिखले यांनी मानले.

स्व.माणिकराव देशमुख यांच्या स्मरणार्थ कृषी,सामाजिक कार्य आणि पत्रकारितेतील व्यक्तीस पुरस्काराने सन्मानित करणार – एस एम देशमुख यांची घोषणा

उरुळी कांचन

वडवणी तालुक्यातील देवडी येथील माजी सरपंच स्व. माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बीड जिल्ह्यातील एक पत्रकार एक समाजिक कार्यकर्ता आणि एका प्रगतीशील शेतकरयास पत्र भूषण, समाज भूषण आणि कृषी भूषण पुरस्कार देऊन “माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या” वतीने दरवर्षी सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा ज्येष्ठ पत्रकार तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी केली.

देवडी गावचे भाग्यविधाते, माजी सरपंच माणिकराव देशमुख याचं नुकतंच निधन झालं. माणिकराव देशमुख हे स्वतः शेतकरी होते. शेतीत नवे प्रयोग करणारया तरूण शेतकर्यांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले होते.गावातील काही प्रगतीशील शेतकरयांचा त्यांनी सत्कारही केला होता. स्वतः सामाजिक कार्यकर्ते असलेल्या माणिकराव देशमुख यांनी देवडी गावात विविध सामाजिक उपक्रम राबविले.

सकाळच्या माध्यमातून बंधारा बांधून गावातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर केली, गरीब आणि गरजू मुलांना सायकलचे वाटप करून त्यांची पायपीट थांबविली, जिल्हा परिषदेत शाळेत इ-लर्निंगची व्यवस्था करून गावातील मुलांसाठी आधुनिक शिक्षणाचे दरवाजे खुले केले. स्वतःच्या शेतात चारशेवर झाडं लावून वृक्षारोपणाचा संदेश दिला. कृषी आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम अजोड असलयाने त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळत राहावी यासाठी कृषी, सामाजिक क्षेत्रातील आणि पत्रकारितेतील एका मानयवरास दरवर्षी २००१ रूपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देउन सन्मानित करण्यात येणार आहे. दरवर्षी २६ फेब्रुवारी रोजी देवडी येथील “माणिक बागेत” मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा होईल अशी माहिती ही एस. एम. देशमुख यांनी दिले.

मल्लखांबचे राष्ट्रीय खेळाडू प्रा.डॉ. भिमराव केंगले यांना सन २०२१ चा युवा व क्रीडा मंत्रालयाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, मल्लखांबचे राष्ट्रीय खेळाडू प्रा.डॉ. भिमराव दूंदा केंगले यांना सन २०२१ चा युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार संलग्नित शारीरिक शिक्षण क्रीडा क्षेत्रात काम करणारी संघटना (PEFI)दिल्ली यांनी राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दि.११मार्च २०२२ रोजी नगरपालिका भवन,संसद मार्ग, नवी दिल्ली येथे स्पोर्ट्स अॕथॉरिटी ऑफ इंडियाचे संचालक संदीप प्रधान यांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित केले आहे.

या पुरस्कारासाठी भारताच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात व गोवा या पाच राज्यातुन या पुरस्कारासाठी दोन व्यक्तींची निवड करण्यात येते. प्रा.डॉ. भिमराव केंगले यांना या वर्षी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. प्रा. डॉ. भिमराव केंगले हे आंबेगाव तालुक्यातील जांभोरी या गावचे रहिवासी आहेत, त्यांच्या या यशस्वी कामगिरी बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.सुरेश काळे,उपाध्यक्ष श्री.तुकाराम काळे,कार्याध्यक्ष श्री.शिवाजीराव घोडेकर,सचिव अॕड.मुकुंद काळे,खजिनदार श्री.शिवदास काळे,महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड. संजय आर्विकर,प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव,उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.भाऊसाहेब थोरात,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कोरोना योद्धांना सेवेत कायम करावे,न केल्यास भारतीय मजदूर संघ उतरणार रस्ता वर- भारतीय मजदूर संघाचा इशारा

सुरेश बागल,कुरकुंभ

कोरोना योद्धांना सेवेत कायम करावे, न केल्यास भारतीय मजदूर संघ उतरणार रस्ता वर, भारतीय मजदूर संघाचा इशारा
कोरोना महामारी वर मात करण्यासाठी सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या आरोग्य विभागात हजारो जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर कोरोना महामारी वर मात करण्यासाठी जीवावर उदार होऊन काम केलेल्या कामगार, कर्मचारानांचे समावेशन करावे व कोणत्या ही कामगारांना कामावरून कमी करू नये अशी मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) ने शासनाकडे केली आहे.

या मागणी चा सकारात्मक निर्णय न झाल्यास महाराष्ट्रातील विविध जिल्हा मध्ये रस्ता वर उतरून त्रिव आंदोलन करावे लागेल असा ईशारा संघटनेचे सरचिटणीस श्री दिपक कुलकर्णी यांनी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा कार्यालय विश्वकर्मा भवन शनिवार पेठ पुणे येथे झालेल्या कामगारांच्या मेळावा मध्ये दिला आहे

मार्च २०२० पासून कोरोना महामारी ने ऊद्योग धंदे, व्यापार , वाहतूक, लाॅकडाऊन मध्ये ठप्प झाले होते. या अझात विषाणू च्या फैलावा मुळे शहरी, ग्रामीण भागातील लाखो व्यक्ती नागरिक भयभीत झाले होते. या महामारी वर मात करण्यासाठी प्रशासन पातळीवर मनुष्यबळ कमी पडल्याने प्रशासनाने महामारी वर नियंत्रण करण्या साठी जाहिराती व्दारे विहीत मार्गाने नर्सेस, प्रयोग शाळा तंत्रज्ञ ,सहाय्यक प्रयोग शाळा तंत्रज्ञ ,फार्मासिस्ट , चतुर्थ श्रेणी कामगार, वैद्यकीय अधिकारी ई नेमणूका केल्या होत्या. महामारी वर मात करण्यासाठी या सर्व कामगारांनी, कर्मचारींनी आपला जिव धोक्यात घालून स्वःताहाची, कुटुंबाची काळजी न करता समाज हिताचे महत्वपूर्ण काम केले आहे. याची जाणीव समाजाला नक्की च आहे. पण प्रशासन, शासनाला नाही. या कामगारांना कामगार कायद्या नुसार समान काम समान वेतन मिळणे आवश्यक असताना बहुतांश कामगारांना किमान वेतना पासून ही वंचित रहावे लागते आहे. शासनाच्या निर्णयानुसार या कामगारांना कोव्हीड भत्ता मिळणे आवश्यकअसताना ही तो अद्याप पर्यंत मिळालेला नाही. बहुतांश कामगारांना साप्ताहिक सुट्टी वा या बदली सुट्टी, ओव्हरटाईम वेतन भत्ता ही मिळाला नाही. कायदा नुसार भविष्य निर्वाह निधी चे अंशदान वजावट करणे आवश्यक असतानाही अंशदान रक्कम वजावट केली नाही. या मध्ये कार्यरत सेवेत असताना ज्या कामगारांचा कोरोना मुळे मृत्यू झाला त्यांच्या वारसांना अद्याप पर्यंत पर्यंत शासनाच्या लाल फीत कारभारा मुळे कायदेशीर संपुर्ण रक्कम मिळाली नाही, व मयत कामगारांच्या वारसास शासकीय नोकरीत देण्या बाबतीत ची घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. ज्या सेवकांना कामावर असताना अपघात झाला त्यांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. महिला कामगारांना प्रस्तुस्ती रजांचा लाभ मिळालेला नाही.

या सर्व समस्या ना वाचा फोडण्यासाठी सर्व कामगारांनी न्याय हक्कांसाठी राज्य, केंद्रीय स्तरावर आंदोलन करण्या साठी सज्ज रहावे असे आवहान अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) राष्ट्रीय सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी मेळावा मध्ये मार्गदर्शन करताना केले आहे.

या बाबतीत राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) ने केंद सरकार व राज्य सरकार च्या प्रलंबित विषयांवर पत्र व्यवहार, पाठपुरावा बाबतीत सविस्तर माहिती श्री चंद्रकांत धुमाळ व रविंद्र देशपांडे यांनी सांगितले.
मेळावा चे अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा हे होते. श्री चव्हाण यांनी मेळावा चा समारोप केला.
या मेळाव्यात संघटनेचे सरचिटणीस दीपक कुलकर्णी, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, भारतीय मजदूर संघ केंद्रीय सदस्य चंद्रकांत धुमाळ, रविंद्र देशपांडे, महासंघाचे अध्यक्ष श्री संजय कांबळे, भागश्री बोरकर, अनिता पवार, मनिषा जरांडे ई मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन श्री संजय कांबळे महासंघाचे अध्यक्ष यांनी केले.

भानोबानगरच्या शाळेला कुरकुंभ एमआडीसीतील कंपनीकडून पाणी शुद्धीकरण उपकरण भेट

योगेश राऊत,पाटस

पाटस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भानोबानगर ( ता.दौंड ,जि.पुणे )येथे या शाळेत कुरकुंभ एमआयडीसीला एका कंपनीमार्फत पाणी शुद्धीकरण उपकरण भेट देण्यात आले.ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व सेवा सुविधा चांगल्या प्रतीच्या मिळाव्या यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोतच. अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत उपसरपंच छगन म्हस्के यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माणिकराव भागवत, ग्रामपंचायत उपसरपंच छगन मस्के , सामाजिक कार्यकर्ते अभिजित शितोळे ,ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल भागवत ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल शितोळे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल भागवत, सामाजिक कार्यकर्ते भरत जाधव, तसेच मुख्याध्यापिका वर्षा शितोळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधुकरनगर मुख्याध्यापक भोंगाळे सर उपस्थित होते .या सर्वांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांची विचारपूस केली.

पत्रकार प्रतिक गंगणे यांना ‘सत्यशोधक दिनकरराव जवळकर आदर्श पत्रकारिता’ पुरस्कार प्रदान

उरुळी कांचन

पुणे येथील पत्रकार प्रतिक गंगणे यांना सासवड येथे झालेल्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात ‘सत्यशोधक दिनकरराव जवळकर आदर्श पत्रकारिता’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जगद्गुरु संत तुकोबाराय साहित्य परषद आयोजित राज्यस्तरीय १३ वे छत्रपती साहित्य संमेलन पार पडले. यामध्ये प्रतिक गंगणे यांना ‘सत्यशोधक दिनकरराव जवळकर आदर्श पत्रकारिता’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गुलाब वाघमोडे व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक कार्यक्रमाचे संयोजक दशरथ यादव, भा.ल.ठाणगे, पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर, युवा नेते गौरव कोलते, हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विजय तुपे, पत्रकार दत्तानाना भोंगळे, अमोल बनकर, राजाभाऊ जगताप, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचेसह अनेक साहित्यिक, लेखक, कवी, व नागरिक उपस्थित होते.