Home Blog Page 121

वाकी बुद्रुक सोसायटीच्या अध्यक्षपदी सोमनाथ टोपे तर उपाध्यपदी धनंजय कड पाटील यांची बिनविरोध निवड

चाकण- वाकी बुद्रुक( ता.खेड) भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सोमनाथ टोपे तर उपाध्यपदी धनंजय कड पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत विनोद उर्फ पप्पू दादा टोपे यांच्या नेतृत्वाखालील पॕनलने १३/० असा दणदणीत विजय मिळवला होता.

काल (दि.२९) रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी सोमनाथ टोपे तर उपाध्यक्षपदी धनंजय कड पाटील यांची निवड करण्यात आली.

संचालक मंडळाच्या वतीने या दोन्ही उमेदवारांना कामाची प्रथम संधी दिली.सोमनाथ टोपे यांनी या आधी विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर अनेक वर्ष काम केले आहे तर धनंजय कड हे देखील इंजिनिअर असून सुशिक्षित आहे. सहकारी सोसायटीवर पहिल्यांदाच तरुणांना काम करण्याची संधी मिळाली आहे.

विनोद उर्फ पप्पूदादा टोपे, ज्ञानेश्वर टोपे, बापू गारगोटे, माऊली टोपे, रामचंद्र गारगोटे, मारुती गायकवाड, रामदास चव्हाण, चंद्रभागा गारगोटे, सविता गारगोटे, काळुराम टोपे, दत्तात्रय टोपे तसेच सभापती विनायक घुमटकर, राष्ट्रवादीचे युवा नेते मयुर मोहिते पाटील , युवा नेते रोहन मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

मुळशीत तालुक्यात पुन्हा मुळशी पॅटर्नचा थरथराट

पिरंगुट- वेगरे (ता.मुळशी) येथील ग्रामसभा चालू असताना  विद्यमान सरपंच मिनाथ मारुती कानगुडे यांच्यासह ४ ते ५ जणांनी येथील माजी सरपंच भाऊ मरगळे यांच्यावर कोयता ,सुरी व दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला .

 

मरगळे यांच्या डोक्यात ,मानेवर व पाठीवर खांद्यावर ५ ते ६ वार करून जीवे मारण्याचा केला याबाबत पौड पोलिस स्टेशन ला फिर्याद दिली असून पौड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार घेतलेनंतर पुढील उपचार खासगी दवाखान्यात सुरू आहेत‌.पुढिल तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ करीत आहेत.

कृषीभूषण आदर्श प्रगतशील शेतकरी दौलतराव गाडे यांचा ७५ वा वाढदिवस सिद्धेगव्हाण येथे दिमाखात संपन्न

सिद्धेगव्हाण – येथील आदर्श प्रगतीशील शेतकरी गाडे परिवाराचे आधारस्तंभ प्रेरणास्थान दौलतराव मारुती गाडे (तात्या) यांचा ७५ वा वाढदिवस अमृतमहोत्सव सोहळा त्यांचे थोरले चिरंजीव भैरवनाथ विद्यालयात असणारे प्रा.राजेंद्र गाडे ,धाकटे चिरंजीव आदर्श युवा शेतकरी आत्माराम गाडे एक कन्या सुनिता लोखंडे पुतणे प्रगतीशील शेतकरी शिवाजी गाडे यांच्या संकल्पना व सुंदर नियोजनातून थाटामाटात संपन्न झाला.

तात्यांनी संपूर्ण जीवनात सत्य न्याय नीतीने संसार आणि आदर्श पद्धतीने शेती केली प्रामाणिक कष्ट .जिद्द चिकाटी संयम आणि कामाचे योग्य नियोजन ही त्यांच्या यशस्वी जीवनाची व सुखी संपन्न कुटुंबाची चतुःसुत्री आहे.

आयुष्यभर काळ्या आईची सेवा करुन तिला हिरवा शालू नेसवण्याचे काम तात्यांनी केले.प्रचंड काबाडकष्ट करून तिनही मुलांना उत्तम शिक्षण व संस्कार दिले.शेतीच्या पैशातून जमीन जागा खरेदी करत भौतिक प्रगती केली.हा संसाराचा गाडा चालवताना त्यांची धर्मपत्नी दौपदाबाई गाडे ( नानीनी ) त्यांना कामात सुख दुःखात भक्कम साथ दिली.

७ वी शिकलेल्या तात्यांनी शिक्षणाचा पाया भक्कम केलाच त्याचबरोबर आपली मुले नातवंडे पुतणे यांना विचारांची संस्काराची शिदोरी दिली त्यांचा मुलगा पुतण्या व एक नातु शिक्षक म्हणून काम करत आहे तर दोन नातू बी ए एम एस चे शिक्षण घेत आहेत उत्तम माणुस म्हणून जगायला शिकविले.

तात्यांचा गावातील काकड आरती भजन सप्ताह यामध्ये सक्रिय सहभाग असतो. शाळेसाठी सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी आर्थिक मदत करुन दातृत्व भावना जोपासली.वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले व नवीन हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दिली.

तात्यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व सिद्धेगव्हाण ग्रामस्थ पंचक्रोशीतील शैक्षणिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांनी शुभेच्छा व सदिच्छा दिल्या. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे  युवा नेते मयुर मोहिते पाटील, सिद्धेगव्हाण लोकनियुक्त आदर्श सरपंच साधनाताई चौधरी उपसरपंच मोनिकाताई गाडे मा.आदर्श सरपंच शशिकांत मोरे मा.उपसरपंच सत्यवान काळे सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व पंचक्रोशीतील गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच चेअरमन संचालक उपस्थित होते.रोहन मोहिते ,पठाणराव वाडेकर ,डाॅ.आहेर मॅडम ,सत्यवान काळे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रवचनकार ह.भ.प निलमताई पोतले वडघुले यांनी तात्यांच्या संपूर्ण जीवन कार्याचा परिचय करून आध्यात्मिक दाखले देऊन गौरवोद्गार काढले.ज्यांच्या नावातच दौलत आहे असे प्रेमळ कष्टाळू आदर्श व्यक्ती मत्व म्हणजे तात्या. ज्यांच्या कडे धन आहे मोठे मन आहे विचारांची संस्काराची संपत्ती आहे.

पांडुरंग दंग झाला
हा सोहळा पाहून
जणू तुका आला वाटे
पुन्हा वैकुंठाहून

असा आनंदी आदर्श सोहळा थाटामाटात स्नेहभोजनाने संपन्न झाला झाला . संपूर्ण गाडे परिवार सर्व सिद्धेगव्हाण ग्रामस्थ नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित होते

कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन स्वागत प्रास्ताविक पुतणे आदर्श शिक्षक कवी महेंद्र गाडे यांनी केले .आभार चिरंजीव प्रा.राजेंद्र गाडे यांनी मानले.

बोरघर ग्रामस्थांकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवतांचा गौरव

घोडेगाव- आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील बोरघर या गावामध्ये सुमारे 650 नोकरदार व व्यावसायिक वर्गाने एकत्र मिळून काळभैरवनाथ ग्रामविकास संघ व बोरघर ग्रामस्थांतर्फे गावचे नाव उज्वल करणाऱ्या सामाजिक राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे अधिकारी, डॉक्टर, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारीव विद्यार्थी यांचा मानपत्र देऊन गौरविण्यात आले .त्याचबरोबर बोरघर गावात वाचनायल व बचत गट कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले एकात्मिकआदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी बळवंतराव गायकवाड यांच्या हस्ते उदघाटन झाले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ दिलीप बांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राहुल जोशी,डॉ संतोष सुपे,डॉ प्रमिला बांबळे ,संजय शेळके उपसभापती कृषि उत्पन्न बाजार समिती,सरपंच सीताबाई बांबळे,किसनराव खामकर,राजू नंदकर उपजिल्हाधिकारी मुंबई,राजू घोडे,ग्रामसेवक जितेंद्र वाकडे,उपसरपंच दादू उंडे हे उपस्थित होते

यावेळी गावातील नोकरदार, पेन्शनर,व्यावसायिक यांच्या प्रयत्नातून गोरगरीब,वाडीवस्तीतील रुग्णांसाठी एकमताने गावासाठी रुग्णवाहिका लवकरच गावात कार्यरत करू असे काळभैरवनाथ ग्रामविकास संघाचे अध्यक्ष राजू वाळकोली यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय जंगले यांनी केले तर सूत्रसंचालन राजू नंदकर यांनी केले क बोरघर ग्रामस्थांनी सण २०२०-२०२१ आणि सन २०२१-२०२२ या कालावधीत उत्कृष्ट काम करून आपल्या बोरघर गावचे नाव राज्य आणि देश पातळीवर झळकावले आशा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
१.डॉ.दिलीप विठ्ठल बांबळे (मा.सर्वोच्च न्यायालय येथे अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना न्याय मिळणेसाठी याचिका दाखल केली तिची दखल विधानसभा अधिवेशनात घेण्यात आली)

२.श्री.संदीप चंद्रकांत पोटे ( बँक ऑफ महाराष्ट्र च्या सहाय्यक महा प्रबंधक (Assistant General Manager) या पदावर पदोन्नतीने निवड झाली आहे.)
३.डॉ.धीरज गोविंदराव जंगले( कोव्हीड काळात कामकाज आणि रुग्णांना आधार दिला)

४.डॉ.प्रदीप प्रकाश दगडे (कोव्हीड काळात कामकाज आणि रुग्णांना आधार दिला)

५.डॉ. हरीश किसन खामकर(सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम,राजकीय क्षेत्रात मजबूत पकड,कोव्हीड काळात काम आणि रुग्णांना आधार दिला)

५.श्री.रवींद्र सूर्याजी बांबळे ( पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती)

६.श्री.रमेश सिताराम घोडे ( पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती)

७. वर्षा रमेश घोडे( उत्पादन शुल्क विभागात आधिकारी पदावर महाराष्ट्र राज्य सेवा परिक्षेतुन निवड)

८.सौ .डॉ. सरिता दत्तात्रय बांबळे ( कोवीड काळामध्ये चांगले काम केल्याबद्दल माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले)

राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने पोलिसांची आरोग्य तपासणी

घोडेगाव – पोलीस स्टेशन येथे आंबेगांव तालुका राष्ट्रवादी क्राॅंग्रेस डाॅक्टर सेलच्या वतीने घोडेगाव पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, तसेच गृहरक्षक दलाचे जवान यांची आरोग्य तपासणी करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस डॉ हरीश खामकर यांनी दिली .

सदर शिबीरामध्ये मंचर येथील डाॅ. प्रतिक गायकवाड, डाॅ. प्रताप वळसे, दंतरोग तज्ञ डाॅ. हरीश खामकर, तसेच घोडेगाव येथील डाॅ.प्रवीण पोखरकर यांनी सहभाग घेतला होता तसेच पुणे येथील एटोन रेमेडिस या फार्मा वतीने रक्ताच्या चाचण्या केल्या. सर्व वैदयकीय टीम यांनी पोलीस स्टेशनमधील 3 अधिकारी, 30 कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे 5 जवान यांची तपासणी केली.

मधुमेह, उच्च रक्तदाब, जुने आजार, तसेच ईसीजी व दातांचे आजार या सर्व तपासण्या केल्या. डाॅ.प्रवीण पोखरकर घोडेगाव यांनी मंचर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांचेसाठी कॅल्शियमचे, रक्तवाढीचे, व इतर आजारावरील गोळया औषधे आणि फस्ट येड किट उपलब्ध करून दिले. त्याबाबत सर्व डाॅक्टरांचे घोडेगाव पोलीस स्टेशनच्यावतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन आभार व्यक्त करण्यात आले त्यावेळी डाॅक्टरां चे वतीने बोलताना डाॅ. प्रतिक गायकवाड यांनी शिबिरासंदर्भात माहिती दिली.तर डॉ प्रताप वळसे यांनी राष्ट्रवादी डॉ सेलच्या माध्यमातून अशा प्रकारचे आरोग्य विषयी शिबीराचे आयोजन करून कोणाला काही गंभीर आजार असल्यास त्याचे निराकरण करणेकामी मागदर्शन करणार असलेबाबत सांगितले. त्यानंतर उपस्थित सर्वांचे घोडेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री.जीवन माने यांनी आभार मानले

उरुळी कांचनमध्ये श्रीकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

उरुळी कांचन

परमेश्वर श्रीचक्रधर स्वामीच्या काळात स्वामीच्या सन्नीधानी जे भक्त जण होते ते सर्व भिक्षा मागुन यायचे त्या भिक्षेतील पदार्थ बाईसा स्वामींना आरोगणेसाठी देत असत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या पदार्थांचा स्वीकार करत असत व स्वामीचा राहिलेला प्रसाद बाईसा भक्तांना देत असत. तसाच सोहळा सर्व भक्त जणाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला यानिमित्ताने भक्त जणांना अतिशय आनंद झाला. उरुळी कांचन येथील श्रीकृष्ण मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने सार्वजनिक पंचावतार उपहार महोत्सव मोठ्या उत्साहात भक्तांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी सुबोधमुनी धाराशिवकर, रविराज पंजाबी, अनिल बाबा, माऊली कांचन, दत्तात्रय कांचन, आबासाहेब कांचन, राजेंद्र टिळेकर, शरद वनारसे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, सरपंच राजेंद्र कांचन, संजय कांचन, संचिता कांचन, भाऊसाहेब कांंचन, अमित कांचन, कोंडीराम चौधरी, शिवाजी भोसले, उत्तम चौधरी, संजय वनारसे, मोहन कदम, बाबासाहेब चौधरी, राजु कांचन, बापु कांचन, लाला कांचन, अतुल सावंंत आदी सदभक्त महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवीचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन

नारायणगाव : किरण वाजगे

पुणे जिल्ह्यात सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नारायणगाव चे ग्रामदेवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवाच्या यात्रेनिमित्त मागील तीन दिवसात सुमारे दीड लाख भाविकांनी यात्रेला उपस्थिती लावली. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी श्री मुक्ताबाई देवीच्या दर्शनासाठी अनेक आबालवृद्ध महिलांनी दर्शन घेतले. तसेच गुरुवारी (दि.२८ ) रोजी रात्री आयोजित करण्यात आलेल्या शोभेच्या दारूकामाचा हजारो भाविकांनी आनंद लुटला. यावेळी रघुवीर खेडकर यांच्या तमाशा च्या व्यासपीठावरून शोभेच्या दारूकामाचे थेट समालोचन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले.

यादरम्यान येत्या २० मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या “तिरसाट” या चित्रपटाचे प्रमोशन देखील करण्यात आले. याप्रसंगी फडमालक रघुवीर खेडकर, लेखक व निर्माता दिनेश किरवे, दिग्दर्शक प्रदिप टोणगे, मंगेश शेंडगे, अभिनेता निरज सुर्यकांत, अभिनेत्री तेजस्वीनी शिर्के, यात्रा कमिटीचे सदस्य, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, नारायणगाव विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन किरण वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते.

गेली पन्नास पेक्षा जास्त वर्षांपासून नारायणगावातील मुस्लिम बांधव शोभेचे दारूकाम मुक्ताई देवीच्या यात्रेनिमित्त मोफत करीत असतात. यामुळेच नारायणगावात हिंदू-मुस्लीम एकोप्याचे दर्शन नेहमी पाहायला मिळते.

दरम्यान यात्रेमध्ये असलेल्या आकर्षक गगनचुंबी आकाश पाळण्यात, तसेच झुक झुक गाडी, वेगवेगळे आकर्षक झुलते पाळणे, खाद्यपदार्थ, विविध वस्तू, आकर्षक महिलांच्या गृहोपयोगी, शोभिवंत, मेकअपच्या वस्तूंच्या तसेच खेळण्यांच्या सजलेल्या दुकानांमध्ये अनेकांनी मोठी गर्दी केली होती.गुरुवारी रात्री अकरा वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांच्या लोकनाट्य तमाशाला देखील हजारो तमाशा रसिक उपस्थित होते.

पहाटे तीन वाजेपर्यंत चाललेल्या लोकनाट्य तमाशा कार्यक्रमाला नारायणगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

डॉ. सुनील पवार यांचा महाराष्ट्र शासनाच्या आदर्श कार्यक्षम अधिकारी पुरस्काराने गौरव

पुणे

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांचा राष्ट्रीय सेवा योजना ( NSS ) विभागाचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट प्रोग्राम ऑफिसर (आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्कार) म्हणून डॉ. सुनील गणपतराव पवार यांना महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते सोमवार दि. 25 एप्रिल रोजी मुंबई येथील शासकीय सोहळ्यात पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत सौ. डॉ. सुषमा सुनील पवार उपस्थित होत्या. डॉ. सुनील गणपतराव पवार हे भारती विद्यापीठातील यशवंतराव मोहिते महाविद्यालय पुणे येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आहेत.

डॉ. अमोल मोहन पाटील यांनी माहीती देताना असे सांगितले की डॉ. सुनील गणपतराव पवार हे गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजनेच्या तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यात सहभागी असतात. त्यांचे वनस्पतीशास्त्र विषयावर व्याख्याने होतात. डॉ. पवार यांचे वनस्पतीशास्त्र विषयावर जागतिक पातळीवर एकुण 27 रिसर्च पेपर व विविध शोध निबंध प्रकाशित केले आहेत. या शासकीय पुरस्कार वितरण सोहळ्यास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे सर उपस्थित होते. महाविद्यालयास आदर्श महाविद्यालय म्हणून गौरविण्यात आले. विद्यार्थी सत्यम जयवंत देवकर यांस आदर्श स्वयंसेवक पुरस्कार,डॉ. एस. आर. पाटील (भूगोल विभाग) यांना प्रसंशा पत्र देवून गौरविण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत मान्यवरांसह सर्वानीच सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, सेवकवर्ग व योग्य प्रशासकीय कामकाजाचे कौतुक केले.
मुबई मध्ये झालेल्या कार्यक्रमात राज्यांचे उच्च व तत्रशिक्षण मंत्री मा. उदयजी सामंत साहेब यांनी 6 जून रोजी होत असणारा शिवस्वराज्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करावा असं मत व्यक्त्त केलं. हा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री डॉ. विश्वजीत कदम साहेब भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम सर, सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव सर, आमदार श्री. मोहनराव कदम दादा व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

माहिती आधिकार कार्यकर्ते नंदकुमार बोऱ्हाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी जेरबंद

मोसीन काठेवाडी,घोडेगाव

माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे जेरबंद” घोडेगाव येथे राहणारे श्री. नंदकुमार उर्फ भाऊसाहेब बोराडे हे माहिती अधिकार कार्यकर्ते असून त्यांच्यावर हल्लेखोरांनी दि. १०/०३/२०२२ रोजी कोयत्याने हल्ला करून त्यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यात त्यांच्या डाव्या हाताची करंगळी तुटली होती त्याबाबत घोडेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर ५२/२०२२ भा. दं. वी. कलम ३०७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हयातील आरोपी हे नंदकुमार बोराडे यांना अनोळखी असल्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता मोठ्या अडचणी येत होत्या.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री मितेश घट्टे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील सो यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पो. हवा, विक्रम तापकीर, दीपक सावळे, राजू मोमीन, गुरू जाधव, अतुल डेरे, पो ना संदीप वारे, पो.कॉ. अक्षय नवले. निलेश सुपेकर, स. फो. मुकुंद कदम, घोडेगाव पो.स्टे. चे सपोनि श्री जीवन माने व पो. स.ई. श्री. किशोर वागज, सतीश डोले, अनिल चव्हाण यांचे पथक नेमलेले होते.

नमूद पथकाचे आधारे तपास करीत असताना नमुद पथकास तांत्रिक विश्लेषणावरून व गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जितेंद्र प्रभाकर काळे याचे आडोसा नावाने नंदकुमार बोराडे यांच्या घराशेजारी परमिट रूम आणि बियर बार आहे. सदर बियर बार बंद करण्याबाबत नंदकुमार बोराडे यांनी वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग व ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या तसेच जितंद्र काळे यांनी बांधलेल्या रहिवाशी सोसायटीमधील सांडपाणी कॅनलमध्ये सोडले जाते याबाबत नंदकुमार बोराडे यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याचा राग मनात धरून जितेंद्र प्रभाकर काळे याने सदरचा गुन्हा केलेला आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने जितेंद्र काळे यास ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याचा मुंबई येथील राहणारा त्याचा लहानपणीचा मित्र योगेश पवार व त्याचे इतर साथिदार यांनी मिळून नंदकुमार बोराडे याला मारण्याची योजना आखली त्यानुसार इसम नामे जाफर शमीम अहमद, वय २४ वर्षे, रा मुंब्रा, मुंबई व शबाझ मेमन यांनी १ चारचाकी व १ दुचाकी गाडीतून येवून त्यांनी नंदकुमार बोराडे यांचेवर हल्ला केला असल्याचे निष्पन्न झाले असुन सदर गुन्हयामध्ये १) जितेंद्र प्रभाकर काळे, २) योगेश मोहन पवार, वय ४० वर्षे, रा घाटकोपर, मुंबई, ३) जाफर शमीम अहमद, वय २४ वर्षे, रा मुंब्रा, मुंबई यांना ताब्यात घेण्यात आले आहे सदर गुहयामध्ये आणखी १ आरोपी फरार असून त्याचा शोध चालु आहे गुन्हयाचा अधिक तपास घोडेगाव पोलीस स्टेशन येथे चालु आहे.

आरटीआय नंदकुमार बोऱ्हाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी अखेर जेरबंद

मोसीन काठेवाडी,घोडेगाव

माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे जेरबंद” घोडेगाव येथे राहणारे श्री. नंदकुमार उर्फ भाऊसाहेब बोराडे हे माहिती अधिकार कार्यकर्ते असून त्यांच्यावर हल्लेखोरांनी दि. १०/०३/२०२२ रोजी कोयत्याने हल्ला करून त्यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यात त्यांच्या डाव्या हाताची करंगळी तुटली होती त्याबाबत घोडेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर ५२/२०२२ भा. दं. वी. कलम ३०७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हयातील आरोपी हे नंदकुमार बोराडे यांना अनोळखी असल्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता मोठ्या अडचणी येत होत्या.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री मितेश घट्टे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील सो यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पो. हवा, विक्रम तापकीर, दीपक सावळे, राजू मोमीन, गुरू जाधव, अतुल डेरे, पो ना संदीप वारे, पो.कॉ. अक्षय नवले. निलेश सुपेकर, स. फो. मुकुंद कदम, घोडेगाव पो.स्टे. चे सपोनि श्री जीवन माने व पो. स.ई. श्री. किशोर वागज, सतीश डोले, अनिल चव्हाण यांचे पथक नेमलेले होते.

नमूद पथकाचे आधारे तपास करीत असताना नमुद पथकास तांत्रिक विश्लेषणावरून व गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जितेंद्र प्रभाकर काळे याचे आडोसा नावाने नंदकुमार बोराडे यांच्या घराशेजारी परमिट रूम आणि बियर बार आहे. सदर बियर बार बंद करण्याबाबत नंदकुमार बोराडे यांनी वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग व ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या तसेच जितंद्र काळे यांनी बांधलेल्या रहिवाशी सोसायटीमधील सांडपाणी कॅनलमध्ये सोडले जाते याबाबत नंदकुमार बोराडे यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याचा राग मनात धरून जितेंद्र प्रभाकर काळे याने सदरचा गुन्हा केलेला आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने जितेंद्र काळे यास ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याचा मुंबई येथील राहणारा त्याचा लहानपणीचा मित्र योगेश पवार व त्याचे इतर साथिदार यांनी मिळून नंदकुमार बोराडे याला मारण्याची योजना आखली त्यानुसार इसम नामे जाफर शमीम अहमद, वय २४ वर्षे, रा मुंब्रा, मुंबई व शबाझ मेमन यांनी १ चारचाकी व १ दुचाकी गाडीतून येवून त्यांनी नंदकुमार बोराडे यांचेवर हल्ला केला असल्याचे निष्पन्न झाले असुन सदर गुन्हयामध्ये १) जितेंद्र प्रभाकर काळे, २) योगेश मोहन पवार, वय ४० वर्षे, रा घाटकोपर, मुंबई, ३) जाफर शमीम अहमद, वय २४ वर्षे, रा मुंब्रा, मुंबई यांना ताब्यात घेण्यात आले आहे सदर गुहयामध्ये आणखी १ आरोपी फरार असून त्याचा शोध चालु आहे गुन्हयाचा अधिक तपास घोडेगाव पोलीस स्टेशन येथे चालु आहे.