Home Blog Page 105

चौफूला येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन संपन्न , भीमथडीला साहित्याचा महापूर यावा; संमेलनाध्यक्ष दशरथ यादव यांचे प्रतिपादन

उरुळी कांचन

साहित्याची मूळ बीजे ग्रामीण भागात असून गावागावातील सांस्कृतिक ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती शब्दबद्ध करून भीमथडीच्या सांस्कृतिक इतिहासाचे जतन व्हावे. असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष दशरथ यादव यांनी केले. मराठी साहित्य संशोधन परिषद आयोजित पहिले राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन दौंड तालुक्यातील चौफुला बोरमलनाथ मंदिर येथे (दि.१७ व १८) जून रोजी उत्साहात संपन्न झाले. यावेळी संमेलन अध्यक्ष पदावरून दशरथ यादव बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले यांचे तेरावे वंशज युवराज संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते झाले.

यावेळी स्वागताध्यक्ष राजाभाऊ तांबे, निमंत्रक तानाजी केकाण, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपा किसन मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस माऊली शेळके, अभिनेते रमाकांत सुतार, सूरज पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, पोलीस निरीक्षक नारायण पवार, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय डाडर यासह आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी यादव बोलताना म्हणाले, दौंड तालुक्याची भूमी भीमा नदीच्या पाण्यामुळे हिरवीगार असली तरी भीमथडीच्या तटावर साहित्याचा मळा फुलवण्यासाठी साहित्य संमेलनाची गरज आहे. कविता, कथा, गीत, पोवाडे, नाटक, लावणी, कादंबरी सारख्या साहित्यांचा महापूर भीमथडीवर यावा त्यातून समाज सशक्त होईल. अटकेपार दौड करणार्‍या घोड्यांची पैदास या परिसरात होत होती. हेच घोडे छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाईत वापरले होते. साहित्याचा मूळ गाभा ग्रामीण भागात शेण मातीत आहे, तो शोधण्याची गरज आहे. संमेलनाचे उद्घाटक युवराज संभाजीराजे म्हणाले, मराठी साहित्यांचा महाराष्ट्राचा वारसा तंजावर तामिळनाडू येथे जपला जातो. सरफोजी राजे यांनी भरत नाट्यम या नृत्य प्रकारचा शोध लावला. मराठी भाषेचा प्रचार प्रसार करताना सांस्कृतिक परंपराची देवाण घेवाण होत असते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणा नवीन पिढीने घ्यावा आणि साहित्य निर्मिती करावी असे ते म्हणाले. यावेळी स्वागताध्यक्ष राजाभाऊ तांबे यांनी भीमथडी साहित्य संमेलन दरवर्षी भरवण्याचे अश्वासन दिले.

यावेळी अभिनेते सुरज पवार, रमाकांत सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दिग्विजय जेधे, डॉ. अशोक जाधव, संजय सोनवणे,दिपक पवार, रवींद्र खोरकर, कैलास शेलार, रामचंद्र नातू, सचिन रुपनवर, बाळासाहेब मुळीक, संजय गायकवाड, हरीभाऊ बळी, सुशांत जगताप, आनंदा बारवकर, विनायक कांबळे, सचिन आटोळे, चंद्रकांत अहिरकर, सुमित रणधीर, विनोद गायकवाड, सुमित सोनवणे, जीवन शेंडकर, बाळकृष्ण काकडे, विजय तुपे, प्रा सुरेश वाळेकर, नामदेव भोसले यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्ताने कासुडी॔ ते कवडीपाट टोलनाक्यापर्यंत एक्स्प्रेस हायवेवरील दोन वर्षांपासून दुर्लक्षित कामे ३-४ दिवसांत पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करणार – सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे

कुरकुंभ ,सुरेश बागल

दौंड तालुक्यातील कासुडी॔ टोलनाका ते हवेली तालुक्यातील कवडीपाट टोलनाक्यापर्यंतच्या एक्स्प्रेस हायवेवरील दुभाजकावर- लोखंडी संरक्षण कठड्यावर भरपूर प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असल्याने दिवसा एक्स्प्रेस हायवेवरील लोकांना गाड्या दिसत नाही आणि शेतकरी लोक रस्ता क्रॉस करताना काटेरी झुडपामुळे गाड्यांचा अंदाज न आल्यामुळे शेतकरी लोकांचं अपघात झालेले आहेत,साईडपटयावर माती भरपूर प्रमाणात साचली आहे एक्स्प्रेस रस्त्यावर टप्याटप्यावर मोठेमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे सहजपूर, कुंजीरवाडी येथे मोठ्या अपघातात लोकांना जीव गमवावा लागला आहे .

तसेच काही ठिकाणी कॅनालवरील – ओढयावरील पुलांची संरक्षण कठडे तुटली असल्याने रात्रीच्या वेळी पुलावरून गाड्या कॅनालमध्ये – ओढ्यामध्ये पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे वारंवार एक्स्प्रेस रस्त्यावर डांबर टाकून टाकून मध्यभागातील दुभाजकाची उंची कमी झाली आहे त्यामुळे या लेनवरून त्या लेनवर वाहणे जाऊन सारखेच मोठे मोठे अपघात घडून भरपूर लोकांचा जीव गेला आहे तर काही लोकांना कायमचेच अपंगत्व आले आहे संरक्षण कठड्याचया लोखंडी जाळ्या काही ठिकाणी तुटल्याने – वाकलेल्या अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी त्या दिसत नसल्याने मोठा अपघात होऊन निष्पाप लोकांचा जीव जाण्याची भिती आम्हाला वाटत आहे कासुडी॔ व कवडीपाट टोलनाक्यावर तर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे सम्पूर्ण रस्त्यांवर कचरा पडलेला आहे दोन्ही टोलनाक्यावर पत्राशेड तसेच असल्याने छोटे मोठे अपघात घडत आहेत .

तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकारी प्रशासनाने प्रलंबित असलेली कामे लवकरात लवकर एक्स्प्रेस हायवेवरील छोटी मोठी कामे ४-५ दिवसांत पूर्ण करावीत कारण ८-९ दिवसांनी या एक्स्प्रेस हायवेवरून राष्ट्रसंत तुकाराम महाराजांची पालखी जाणार आहे तरीही प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्यावरील दुर्लक्षित कामासाठी कोणी वाली आहे का नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे तरीही लवकर ही कामे पूर्ण करावीत नाहीतर ४-५ दिवसांत कासुडी॔ टोलनाका येथे सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे आमरण उपोषण करणार आहे.

कवठे येमाई येथे डॉ. उचाळे यांच्या जिवनज्योत हाॅस्पिटलमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स चे उद्घाटन

कवठे येमाई (प्रतिनिधि धनंजय साळवे) – अष्टविनायक मार्गावरील एक महत्वाचे गाव म्हणुन कवठे येमाईला ओळखले जाते. अष्टविनायक हा मार्ग अतिजलद झाल्यामुळे रहदारीही वाढु लागली आहे अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे.रुग्णांना जास्त प्रमाणात लागले तर त्या रुग्णाला शिरुर शिक्रापुर पुणे नगर अशा ठिकाणी न्यावे लागत असे.या दरम्यान बराच वेळ जात असल्यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतत असे.तसेच काही लहान मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना बाहेरगावी जावे लागत असे.रुग्णांची ही गरज ओळखुन डॉ. संतोष उचाळे व त्यांच्या पत्नी डॉ.आरती उचाळे यांनी रुग्नांची गरजओळखुन त्यांच्या दवाखान्यातच हि महत्वाची सेवा चालु केली आहे.
डॉ. उचाळे दांपत्य मुळचे पारनेर तालुक्यातील शिरापुर ह्या गावचे परंतु समाजसेवा व रुग्ण सेवेची आवड असल्यामुळे कवठे येमाई येथे दहा वर्षापुर्वी दवाखाना सुरु केला.रुग्नांना सर्व उपचार एकाच ठिकाण मिळावेत हि सतत धडपड त्यांची चालु असते.ह्या ऑपरेशन थिएटरमुळे महिलांच्या प्रसुती,सिझर, रुग्नांचे हार्निया,अपेंडिस,मुळव्याध, फॅक्चर,ई.शस्त्रक्रिया येथेच उपलब्ध होणार आहेत. ह्या नविन ऑपरेशन थिएटर च्या उद्घाटन प्रसंगी पं.स.सदस्य डॉ. सुभाष पोकळे,मा.सरपंच बबनराव पोकळे,सा.कार्यकर्ते रामदास सांडभोर,जि.प.चे माजी सी.ई.ओ.प्रभाकर गावडे,माजी सरपंच दिपक रत्नपारखी,उपसरपंच संदीप वागदरे,पुणे जिल्हा सहकारी बँकेचे शाखाधिकारी राजेंद्र चाटे,कवठे प्रा.आ.केंद्राचे डॉ. पानगे,सो.संचालक डॉ. हेमंत पवार, उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, येस क्लबचे अध्यक्ष नवनाथ सांडभोर,रोहिदास हिलाळ,भिमाजि कांदळकर,श्री दत्त मंदीराचे पुजारी गणेश काका जोशी,सो.संचालक रितेश शहा,ग्रा.सदस्य निखिल घोडे,पांडुरंग भोर,निलेश पोकळे,किसन हिलाळ सचिन बोर्हाडे,सा.कार्यकर्ते विठ्ठल घोडे,सोपान वागदरे,एल आय सीचे संपत कांदळकरगुरु,दुडे गुरुजी के.के.पोकळे,प्रशांत सांगडे,रामदास पोकळे ई.मान्यवर उपस्थित होते.

कवठे येमाई येथे डॉ. उचाळे यांच्या जिवनज्योत हाॅस्पिटलमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्सचे उद्घाटन

कवठे येमाई ( धनंजय साळवे) – अष्टविनायक मार्गावरील एक महत्वाचे गाव म्हणुन कवठे येमाईला ओळखले जाते. अष्टविनायक हा मार्ग अतिजलद झाल्यामुळे रहदारीही वाढु लागली आहे अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे.रुग्णांना जास्त प्रमाणात लागले तर त्या रुग्णाला शिरुर शिक्रापुर पुणे नगर अशा ठिकाणी न्यावे लागत असे.या दरम्यान बराच वेळ जात असल्यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतत असे.तसेच काही लहान मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना बाहेरगावी जावे लागत असे.रुग्णांची ही गरज ओळखुन डॉ. संतोष उचाळे व त्यांच्या पत्नी डॉ.आरती उचाळे यांनी रुग्नांची गरजओळखुन त्यांच्या दवाखान्यातच हि महत्वाची सेवा चालु केली आहे.

डॉ. उचाळे दांपत्य मुळचे पारनेर तालुक्यातील शिरापुर ह्या गावचे परंतु समाजसेवा व रुग्ण सेवेची आवड असल्यामुळे कवठे येमाई येथे दहा वर्षापुर्वी दवाखाना सुरु केला.रुग्नांना सर्व उपचार एकाच ठिकाण मिळावेत हि सतत धडपड त्याची चालु असते.ह्या ऑपरेशन थिएटरमुळे महिलांच्या प्रसुती,सिझर, रुग्नांचे हार्निया,अपेंडिस,मुळव्याध, फॅक्चर,ई.शस्त्रक्रिया येथेच उपलब्ध होणार आहेत.

या नविन ऑपरेशन थिएटर च्या उद्घाटन प्रसंगी पं.स.सदस्य डॉ. सुभाष पोकळे,मा.सरपंच बबनराव पोकळे,सा.कार्यकर्ते रामदास सांडभोर,जि.प.चे माजी सी.ई.ओ.प्रभाकर गावडे,माजी सरपंच दिपक रत्नपारखी, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे शाखाधिकारी राजेंद्र चाटे,कवठे प्रा.आ.केंद्राचे डॉ. पानगे,सो.संचालक डॉ. हेमंत पवार, उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, येस क्लबचे अध्यक्ष नवनाथ सांडभोर, श्री दत्त मंदीराचे पुजारी गणेश काका जोशी,सो.संचालक रितेश शहा,ग्रा.सदस्य निखिल घोडे,पांडुरंग भोर,निलेश पोकळे,सचिन बोर्हाडे,सा.कार्यकर्ते विठ्ठल घोडे,सोपान वागदरे,एल आय सीचे संपत कांदळकरगुरु,दुडे गुरुजी ई.मान्यवर उपस्थित होते.

न्यु ईंग्लिश स्कुल कवठे येमाई दहावी चा निकाल 94.95%

 कवठे येमाई (धनंजय साळवे)- कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या दोन वर्षांपासून शाळा ऑनलाईन /ऑफलाइन अशा संमिश्र पद्धतीने सुरू होत्या. विद्यार्थी शाळेपासून दूर होते. ऑनलाइन शिक्षण जरी सुरू असले तरी प्रत्यक्ष शाळा,शिक्षक यांच्यापासून विद्यार्थी दुरावले गेले होते.अशा परिस्थिती कवठे येमाई विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एस.एस.सी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल 94.95 % इतका लागला.

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रयत शिक्षण संस्थेचे कवठे येमाई येथील न्यु ईंग्लिश स्कुल विद्यालयाने चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली. दहावीच्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले.विद्यालयात पहिले तीन आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे.

कु.मुखेकर सुरज गणेश – ९४.००%
कु .भोर सोनाक्षी दौलत ९०.४० %
कु पवळे वेदांत राजेंद्र ९०.२० %

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे व त्यांना मागदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन ग्रामस्थांकडुन करण्यात आले.

खराबवाडी येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाचा वेदांत बच्चे दहावीच्या परीक्षेत प्रथम

चाकण : खराबवाडी (ता. खेड) येथील नवमहाराष्ट्र विद्यालयातुन दहावीच्या परीक्षेत वेदांत विवेक बच्चे या विद्यार्थ्याने ९५.६० टक्के मार्क्स मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.

दहावीच्या परीक्षेचा निकाल ९१.१५ टक्के लागला असून या परीक्षेसाठी शाळेतून ३२९ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी २९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश कड यांनी दिली.दहावीच्या परीक्षेत वेदांत विवेक बच्चे या विद्यार्थ्याने ९५.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला,प्रणिता अप्पाजी
घाडगे या विद्यार्थीनीने ९५.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.श्रद्धा विलास खराबी या विद्यार्थीनीने ९५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.अथर्व किरण बेळंबे या विद्यार्थ्याने ९४.४० टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक पटकावला.नंदिनी ब्रिजेश पवार या विद्यार्थीनीने ९२.४० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव कड,सचिव गोरक्षनाथ कड, शाळा समिती अध्यक्ष प्रकाश खराबी,मुख्याध्यापक अविनाश कड,संचालक नंदाराम कड ,काळुराम केसवड सर्व संचालक मंडळ,तंटामुक्ति अध्यक्ष रघुनाथ कड,सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षतेकतर कर्मचारी व पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.वृत्तपत्र क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले दै.पुण्यनगरी पत्रकार व सरपंचनामा न्यूज पोर्टल संपादक विवेक बच्चे यांचा मुलगा वेदांत बच्चे याने दहावीच्या परीक्षेत मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल वेदांतचे खेड तालुक्यातून कौतुक होत आहे.
.

कनेरसर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नवांगतांचे फेटे बांधून स्वागत

राजगुरूनगर-कनेरसर (ता.खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष सन २०२२-२०२३ ची सुरूवात शाळेत दाखल होणाऱ्या नवांगत विद्यार्थ्यांच्या स्वागताने झाली.नवांगत विद्यार्थ्यांची फेटे बांधून, गुलाबपुष्प देवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यांचे औक्षण करून खाऊ वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जन्याबा दौंडकर, व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक यांच्या हस्ते शालेय पुस्तके, गणवेश वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक नानाभाऊ गावडे सर यांनी केले.

सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक शाळेतील शिक्षिका अंजली नामदेव शितोळे मॅडम, सारिका सदानंद राक्षे मॅडम, शुभांगी डिगांबर जाधव मॅडम उपस्थित होते.

फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती संचलित विद्यालयांच्या दहावी व बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

उरुळी कांचन

फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती शिरूर जिल्हा पुणे संचलित इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम  निकालाची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
1) माध्यमिक आश्रम शाळा कुरुंद तालुका.पारनेर जिल्हा.अहमदनगर

मार्च 2022 परीक्षेचा *100%* निकाल
परीक्षेस बसलेले विद्यार्थी 16
उत्तीर्ण विद्यार्थी 16
विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण 9
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 7

प्रथम तीन क्रमांक
1 शिंदे आकाश 90.20%
2 राठोड दिपाली 82.60%
3 वाघमोडे यश 82.40%

2) माध्यमिक विद्यालय कुरुंद
ता-पारनेर.जि-अहमदनगर
इयत्ता -10 वी
निकाल-100%
परीक्षेस बसलेले विद्यार्थी -19
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी -19
1)प्रथम क्र -उबाळे सुष्मिता गौतम 82%
२)द्वितीय क्र-कारखिले तनिष्का आनंदा 80.80%
३)तॄतिय क्र-काळे अनुराग रविंद्र 78%

3) केंद्रीय माध्यमिक आश्रम शाळा कुरुंद तालुका.पारनेर जिल्हा.अहमदनगर

मार्च 2022 परीक्षेचा निकाल
परीक्षेस बसलेले विद्यार्थी 10
उत्तीर्ण विद्यार्थी 9
विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण 1
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 1

प्रथम तीन क्रमांक
1 आकांशा केंजळे 76.20%
2 भगत वैष्णवी 68.40%
3 पवार सुष्मिता 58.40%

4) कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरुंद तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर

इयत्ता बारावी निकाल मार्च फेब्रु. 2022
विज्ञान शाखा 100%
परीक्षेस बसलेले विद्यार्थी 47
उत्तीर्ण विद्यार्थी 47
प्रथम तीन क्रमांक
प्रथम -कुमारी दिवेकर मृण्मयी सुरेश
84.67%

द्वितीय- राठोड पल्लवी रामेश्वर
78.33%

तृतीय -श्रीमंत प्रणव संतोष 74.17%
कला शाखा 97%
परीक्षेस बसलेले 38
उत्तीर्ण विद्यार्थी. 37

कला शाखा प्रथम तीन क्रमांक-

1)प्रथम – देवकर रोहित परसराम 72.33%

2)द्वितीय – डव्हणे सोनाली बाळू – 72.00%

*3)तृतीय* – राठोड कोमल ज्ञानेश्वर – 68.50%

1 ली ते 12 वी विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे,आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा

कुरुंद हे गाव शिरूर पासून फक्त 5 कि.मी अंतरावर असून गव्हाणवाडी निघोज रोडवर आहे.

शिक्षण क्षेत्रात क्रांती करण्यासाठी मोठ्या देवस्थानांनी पुढाकार घ्यावा – उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

नारायणगाव (किरण वाजगे)

शिक्षणात इतिहास घडवायला देवस्थानची साथ महत्वाची आहे. राज्यातील सर्वच मुख्य देवस्थान ट्रस्टने राज्यातील शिक्षण पद्धती आणि शिक्षण प्रणालीत प्रगती करण्यासाठी पुढाकार घेतला तर पुढील काळात शिक्षण क्रांतीचा इतिहास घडेल. असे प्रतिपादन नामदार उदय सामंत यांनी शुक्रवार (दि. १७ )रोजी सायंकाळी ओझर येथील कार्यक्रमात केले.

अष्टविनायक देवस्थान पैकी प्रमुख असलेल्या ओझरच्या श्री विघ्नहर देवस्थान ने उभारलेल्या गणेश पूजनातील गणपतीच्या आवडत्या २१ वनस्पतीचा समावेश असलेल्या “विघ्नहर उद्यान” चे श्री सामंत यांनी उदघाटन केले त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना जुन्नर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, जुन्नर चे नगराध्यक्ष श्याम पांडे, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, विघ्नहर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे, मोरया गोसावी देवस्थानचे अध्यक्ष श्री देव, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, विघ्नहर गार्डन साठी देणगी दिलेले देणगीदार गोविंद खिलारी, ओझरचे सरपंच उपसरपंच सदस्य अन्य देणगीदार, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी संचालक तसेच ग्रामस्थ व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मोढवे यांनी केले.

जनता विद्या मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ढोल- ताशांच्या गजरात स्वागत

घोडेगाव – येथील जनता विद्या मंदिर विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन तसेच ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे सर्व नवनिर्वाचित संचालक अजितकाका काळे,विश्वास काळे पा, वैभव काळे पा,तुकाराम काळे,सूर्यकांत गांधी, प्रशांत काळे पा अँड. संजय आर्वीकर,नवनाथ काळे सुरेशशेठ काळे (मा.अध्यक्ष),ऍड .मुकुंद काळे, घोडेगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. तसेच पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय कैलास बुवा काळे यांना वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले व त्यांनी मुलांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या मुलांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक ढमढेरे यांनी केले व आभार पर्यवेक्षक ए. एस. काळे यांनी मानले तसेच मुलांना शालेय पुस्तक जेष्ठ नागरिकांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या उपप्राचार्य कळंबे ए. एस. व उपशिक्षक डी.जे काळे ,एस .एस.जाधव यांनी केले . त्यानंतर कार्यक्रमाची सांगता सर्व शिक्षकवृंद यासकडून मुलांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.