सावरदरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

चाकण- सावरदरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.कोरोना सारख्या परिस्थितीत नागरिकांना ऑक्सिजन भेटणं अवघड झाले आहे .नैसर्गिक ऑक्सिजन आपल्याला झाडा पासून मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपण सर्वांनी झाडे लावून नैसर्गिक ऑक्सिजन तयार करुया असे मत सावरदरी ग्रामपंचायचे उपसरपंच संदिप पवार यांनी व्यक्त केले.

कोरोनाचे सर्व नेम पाळून कमीत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये पर्यावरण दिन सावरदरी मध्ये संपन्न झाला आहे.

यावेळी सरपंच भरत तरस, मुख्याध्यापक मच्छिंद्र शेटे यांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला सरपंच भरत तरस, उपसरपंच संदिप बाळासाहेब पवार, ग्रामसेवक नाईकडे भाऊसाहेब, पोलिस पाटील राहुल साकोरे,ग्रा सदस्य संदिप मेंगळे, निता शेटे, तंटामुक्ती अध्यक्ष संदिप दुधाणे, प्रा संतोष शिंदे,मच्छिंद्र शेटे, बाळासाहेब पवार, करण शेटे, श्रीहरी सोनवणे,बाबुराव शेटे, भगवंत शिंदे,शंकर पवार,गोविंद शेटे,दत्तात्रय शेटे,विश्वास बुचुडे, अंकुश बुचुडे,सयाजी शेटे,महेश शेटे,विश्वास धोंडगे,सचिन थोरात, पोपट गाडे,काळुराम शेटे,संजय सोनवणे,दादु मेंगळे,अजय बधाले, दिनेश बधाले व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleजे बी एम कंपनीकडून महाळुंगे पोलीस चौकीला सुरक्षेतेसाठी संरक्षक बेरिगेट्स
Next articleदोंदे- शिवस्वराज्य दिन अतिशय उत्साहात संपन्न