नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कमला नेहरू हॉस्पिटल मध्ये रुग्णांना फळ वाटप नगरसेविका सुजाता शेट्टी यांचा स्तुत्य उपक्रम

अमोल भोसले,पुणे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कमला नेहरू हॉस्पिटल मंगळवार पेठ पुणे येथील रुग्णांना फळ वाटप करण्याचा कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका सदस्या, शहर सुधारणा समिती/ वृक्ष प्राधिकरण समिती सुजाता सदानंद शेट्टी यांच्या वतीने करण्यात आलेला होता. फळ वाटप कार्यक्रम मेल सर्जिकल, फीमेल मेडिकल, फीमेल सर्जिकल, मेल मेडिकल, फिजिओथेरपी डिपारमेंट येथील तब्बल ३५० रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. फळ वाटप कार्यक्रम पुणे शहर इंदिरा काँग्रेस कमिटीचे संस्थापक ज्येष्ठ नेते शामराव अर्जुनराव पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या फळ वाटप कार्यक्रमाबरोबरच कमला नेहरू रूग्णालय या ठिकाणी असलेले समस्त कर्मचारी स्वच्छता कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांचा देखील त्यांनी आजवर केलेल्या अविरत सेवेबद्दल त्यांचा सत्कार या कार्यक्रमा मध्ये करण्यात आला. अशाप्रकारे कर्मचाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी प्रथमच करण्यात आलेला आहे याबद्दल कर्मचाऱ्यांनी देखील कौतुक केले. पुणे शहरातील पूर्व भागामध्ये कमला नेहरू रुग्णालय येथे काम चालू असलेले स्व.मातोश्री पद्मावती कृष्णा शेट्टी ICU केंद्राची पाहणी करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत मा.स्थायी समितीचे अध्यक्ष सदानंद कृष्णा शेट्टी, कमला नेहरू हॉस्पिटल चे सुप्रीडेन्ट लता त्रिंबके , असिस्टंट सुप्रीडेन्ट मंदार नागमोडे , रुग्णालयाचे सचिव श्रीकृष्णा सकट , इक्बाल शेख,अक्षय गायकवाड, मुमताज शेख, अमर शामराव पवार, वसीम शेख, हरीश अय्यर , विशाल शिंदे ,सतीश चव्हाण, मंगेश भरत साखरे, सुलतान शेख, अशोकराव चव्हाण, नूरुद्दीन अन्सारी, राहुल चव्हाण, इक्बालदादा शेख, राजू भाई शेख, सचिन भाऊ शेंडगे, तसेच अश्विनी मित्र मंडळ, सदानंद शेट्टी मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमा दरम्यान covid-19 ची समस्त खबरदारी घेण्यात आलेली आहे तसेच सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आलेले आहे.

Previous articleदौंड तालुक्यातील महिलांच्या हाती शिवसेनेचे शिवबंधन
Next articleकोण म्हणतं ७० वर्षात मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत प्रयत्न झाले नाहीत ?.. विकास लंवाडे