दौंड तालुक्यातील महिलांच्या हाती शिवसेनेचे शिवबंधन

दिनेश पवार ,दौंड-तालुक्यातील महिलांनी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश दादा पासलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी काही युवकांनी देखील प्रवेश केला.

शिवसेना महिला आघाडीचे संघटन बळकट करताना तालुक्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी पक्षाच्या वतीने भरीव काम करणार तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र व मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांना राजकीय व सामाजिक दृष्टया अधिक सक्षम बनविणे हे पक्षाचे ध्येय असून तालुक्यातील महिलांना मुख्य राजकीय प्रवाहात आणण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे पासलकर यांनी सांगितले.

यावेळी तालुका महिला संघटक स्वाती ढमाले, छाया जगताप, रेखा शितोळे,प्रमिला शिंदे,शिवसेना विभाग प्रमुख निरंजन ढमाले,सागर आव्हाड व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleयेलघोल येथे सरपंच जयवंत घारे यांच्या हस्ते वृक्षारोपण
Next articleनाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कमला नेहरू हॉस्पिटल मध्ये रुग्णांना फळ वाटप नगरसेविका सुजाता शेट्टी यांचा स्तुत्य उपक्रम