येलघोल येथे सरपंच जयवंत घारे यांच्या हस्ते वृक्षारोपण

पवनानगर -मावळ तालुक्यातील येलघोल ग्रामपंचायत यांच्या वतीने व वनविभागाच्या मार्गदर्शाना खाली येलघोल या ठिकाणी २०० झाडाचे वृषारोपन करण्यात आले आहे.गावातील शाळा,मंदिर, शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर अशा मोकळ्या जागेवर ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृषरोपन करण्यात आले आहे.यामध्ये सांग,पिपंळ, वड, बाबु,चिंच, आवळा, करंज,अशा विविध प्रकारच्या झाडाचे वृषारोपन करण्यात आले आहे.

पर्यावरणाचा बिघडणारा समतोल सावरण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन आवश्यक असून युवकांनी यात मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेणे गरजेचे आहे”, असे मत येलघोल ग्रामपंचायत चे सरपंच जयवंत घारे यांनी व्यक्त केले.

यावेळी उपस्थित मावळ चे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, सरपंच जयवंत घारे,पंचायत समिती मावळ चे कृषी अधिकारी संताजी जाधव,मंडल अधिकारी प्रकाश बलकवडे, विकास गजभिव,सचिन भोसले,योगेश भेडेकर,तलाठी अंकुश साठे, उपसरपंच गोरक्षनाथ घारे,सदस्य सुखदेव घारे, स्वप्निल शेडगे,लक्ष्मण भिलारे, अध्यक्ष अनंता शेडगे, लक्ष्मण भिलारे,अनंता घारे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष काशिनाथ घारे,भूषण घारे,उत्तम घारे यांच्या सह गावातील नागरिक उपस्थिती होते.

Previous articleदावडीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संभाजी घारे यांच्या हस्ते रोपांचे वाटप
Next articleदौंड तालुक्यातील महिलांच्या हाती शिवसेनेचे शिवबंधन