दावडीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संभाजी घारे यांच्या हस्ते रोपांचे वाटप

राजगुरूनगर- पर्यावरणाचे रक्षण हेच आपले कर्तव्य, तर एक झाड लावून ते जगविण्याचा प्रयत्न करू पंचायत समिती सीआरपी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान पंचायत समिती खेड यांच्या मार्फत प्रियांका टाकळकर यांच्या माध्यमातून दावडी येथे संभाजी घारे यांच्या हस्ते रोपे वाटप करण्यात आली

दावडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्य, ग्रामसंघ अध्यक्ष आणि बचत गटातील सर्व महिला यांच्या उपस्थितीत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान पंचायत समिती खेड येथील स्वयंसहायता महिला समूह यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्त तीन हजार आंब्याची लागवड केली.यामध्ये दावडी गावामधील समूह महालक्ष्मी बचत गटातील महिला यांचाही मोठा सहभाग आहे.

यावेळी सरपंच संभाजी आबा घारे, उपसरपंच राहुलदादा कदम, ग्रामसेवक तानाजी इसवे, ग्रामपंचायत सदस्य – सौ. पुष्पाताई होरे, श्री.संतोष सातपुते, श्री.अनिल नेटके, सौ. माधुरी ताई खेसे, सौ.राणीताई डुंबरे, सौ.धनश्रीताई कान्हूरकर, सौ.संगीताताई मैद, मा.सरपंच संगीताताई होरे  उपस्थित होते

Previous articleजागतिक पर्यावरण दिनी खेड माहिती सेवा समितीच्या वतीने वृक्ष लागवड
Next articleयेलघोल येथे सरपंच जयवंत घारे यांच्या हस्ते वृक्षारोपण