जागतिक पर्यावरण दिनी खेड माहिती सेवा समितीच्या वतीने वृक्ष लागवड

वाघोली- १९७४ पासून संयुक्त राष्ट्रांनी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातील सरकार, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात. त्याच अनुषंगाने गेली सहा वर्ष माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने बकोरी येथील डोंगरावर तब्बल वीस हजार पेक्षा जास्त झाडांची लागवड करण्यात आली आणि आज जागतिक पर्यावरण दिनी बकोरि डोंगरासह पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये वृक्ष लागवड व्हावी असा आदेश महाराष्ट्र राज्य माहिती सेवा समिती अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी दिल्यामुळे आज खेड तालुक्यातील बहूळ येथे माहिती सेवा समितीचे पदाधिकारी यांच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी खेड तालुका अध्यक्ष गुलाब वाडेकर,सामाजिक कार्यकर्ते विशाल वाडेकर,विनोद जाधव, भवाजी वाडेकर,गणेश वाडेकर यांसह समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

माहिती अधिकार कायदा वापर प्रचार आणि प्रसार सोबतच पर्यावरणाशी संबंधित विविध विषय,घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागृकता निर्माण करणे आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावले उचलणे असा पर्यावरण दीन हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे माहिती सेवा समितीचे पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आज जागतिक पर्यावरण दिन वृक्ष लागवड करून एक वेगळा संदेश समाजासमोर मांडला आहे- चंद्रकांत वारघडे,प्रदेशाध्यक्ष माहिती सेवा समिती महाराष्ट्र


आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला संदेश देतोय स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणे गरजेचे आहे आज ऑक्सीजन देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो मात्र कायमस्वरूपी फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांना आपण विसरू नये म्हणून आज जागतिक पर्यावरण दिनी खेड तालुका माहिती सेवा समितीच्या वतीने पुणे जिल्हा माहिती सेवा समिती अध्यक्ष श्री लक्ष्मण गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खेड तालुक्यातील विविध ठिकाणी वृक्ष लागवड केली- गुलाब वाडेकर,अध्यक्ष खेड तालुका माहिती सेवा समिती

Previous articleचार वर्षीय मुलीचे अपहरण करणारा जेरबंद
Next articleदावडीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संभाजी घारे यांच्या हस्ते रोपांचे वाटप