चार वर्षीय मुलीचे अपहरण करणारा जेरबंद

अमोल भोसले,उरुळी कांचन

स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतून एका चार वर्षाच्या मुलीचे अपहरण काल झाले होते. त्याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. स्वारगेट पोलिसांनी सोशल मीडियावर वर मुलीचे वर्णन टाकून पोस्ट व्हायरल केलेली होती.

आज दुपारी दोन वाजता एक व्यक्ती लहान मुलीला घेऊन होऊन सासवड येथील पीएमटी स्टॉप वर थांबला होता. सोशल मीडिया वरची पोस्ट पाहून त्या नंबर वर एका स्थानिक नागरिकांनी फोन केला. स्वारगेट पोलिसांनी सासवड पोलीस स्टेशनला संपर्क केला. मिळालेली माहिती सांगितली त्याप्रमाणे सासवड पोलीस स्टेशन मधील पोलीस कॉन्स्टेबल जाधव ताबडतोब पीएमटी स्टॉप वर गेले त्या इसमाला व मुलीला ताब्यात घेतले. त्या इसमाचे नाव विलास कांबळे असे असून मुलीला कोठे तरी विक्री करायच्या उद्देशाने पळवून आणल्याचे त्याने सांगितले.

मुलीचा फोटो स्वारगेट पोलीस स्टेशनला पाठवून तीच मुलगी असल्याची खात्री केली. स्वारगेट पोलीस सासवड येथे येऊन मुलीला ताब्यात घेऊन गेले आहेत. आसे सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.

Previous articleMPSC ने PSI च्या सबंधित निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू – आकाश मस्के पाटील
Next articleजागतिक पर्यावरण दिनी खेड माहिती सेवा समितीच्या वतीने वृक्ष लागवड