MPSC ने PSI च्या सबंधित निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू – आकाश मस्के पाटील

नितीन शिंदे

वाघोली /प्रतिनिधी:-MPSC ने PSI च्या सबंधित निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन असा इशारा आकाश मस्के पाटील दिला आहे.आयोगाने ने PSI फिजीकल संदर्भात नुकत्याच काढलेल्या आदेशात उमेदवारांची शारीरिक परीक्षेचे गुण अंतिम निकाला करिता गृहित न धरता ते केवळ पात्रते करिता ठेवले जाणार‌ आहेत या संदर्भात
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी संदर्भात परिपत्रक काढून शारीरिक दुर्ष्ट्या महत्व कमी करून एकुण गुणांच्या द्रुष्टीने नकारात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न केला आहे या निर्णयाच्या विरोधात मराठवाडा बहुजन असोसिएशनचे अध्यक्ष आकाश‌ मस्केपाटील यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.
आजपर्यंत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी एकुण गुणांमध्ये 100 गुणांचा वाटा हा शारीरिक चाचणीसाठी फायनल निकालामध्ये समाविष्ट केला जात असे त्यामुळे या चाचणीस महत्त्व प्राप्त होते परंतु आता त्याची मर्यादा 60 गुणांची करून शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे .

पोलिस उपनिरीक्षक हे पद पुर्णपणे गुन्हेगारी क्षेत्राशी निगडित व जनतेच्या सेवेसाठी काम करत असते परंतू सध्याच्या नियमावली नुसार पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निम्म्याहून जास्त प्रमाणात शारीरिक दुरुष्ट्या कमकुवत असणाऱ्याला उमेदवाराला संधी उपलब्ध होणार आहे .

पोलिस उपनिरीक्षक या पदासाठी कायम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना अभ्यास करून व शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होऊन गुन्हेगारी क्षेत्रावर पोलीस खात्याचा दबदबा वाढवला आहे व त्याबरोबर जनतेची सेवा केली आहे व करत आहेत परंतु या निर्णयाने पोलिस उपनिरीक्षक या पदासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होणार आहे.

उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त नसल्यास गुन्हेगारी पासुन जनतेची कशी सुटका करणार आहे ! याचा लोकसेवा आयोगातील अध्यक्ष व सदस्याना विसर पङला आहे का ?

हा निर्णय ग्रामिण भागातील उमेदवारांन वरती अन्याय करणारा असुन त्यांचे मानसिक खच्चीकरण करणारा सुध्दा आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरीत मागे घेऊन पुर्वी प्रमाणेच शाररिक चाचणीचे गुण अंतिम निकाला करिता ग्रहित धरण्यात यावेत व विद्यार्थी युवकांना न्याय द्यावा अशी मागणी मराठवाडा बहुजन असोसिएशन चे अध्यक्ष आकाश मस्केपाटील, प्रकाश खैरे,सुरेश वांढेकर पाटील,प्रविण पवार,वैभव गायकवाड,सचिन काळे,कृष्णा देशमुख यांच्या वतीने करण्यात आली.

Previous articleश्रीमंत प्रतिष्ठानच्या वतीने निराधारांना अन्नदान
Next articleचार वर्षीय मुलीचे अपहरण करणारा जेरबंद