श्रीमंत प्रतिष्ठानच्या वतीने निराधारांना अन्नदान

अमोल भोसले,पुणे

कोरोना काळात हातावर पोट असणारे, गरजू आणि निराधार लोकांवर उपासमारीची वेळ आली. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन धनकवडी भागातील श्रीमंत प्रतिष्ठानने सदगुरू श्री शंकर महाराजांच्या आशिर्वादामुळे गरजूंना मदतीचा हात दिला. प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात गेले १७  दिवस १७०० व्यक्तींना मोफत जेवण,पाणी,बिस्कीट दिले गेले. अशी माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष समीर आमले यांनी दिली.

अध्यक्ष अथर्व जरे, उपाध्यक्ष समीर आमले आणि कार्याध्यक्ष गणेश शिंदे यांसह कार्तिक कदम, निखिल कन्हेरकर, बंटी शिंदे, मार्तंड धडफळे, प्रणव जाधव, प्रथमेश गुंड, सौदागर लोखंडे, राजस पापळ, अभय जवंजाळ यांची मोलाची साथ मिळाली.

Previous articleकेसनंद तळेरानवाडी रोडचे ऑनलाइन भूमीपूजन
Next articleMPSC ने PSI च्या सबंधित निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू – आकाश मस्के पाटील