केसनंद तळेरानवाडी रोडचे ऑनलाइन भूमीपूजन

अमोल भोसले,उरुळी कांचन

मतदारसंघातील विविध विकास कामाच्या बाबतींत लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अशोक पवार सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. कामाची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी स्थानिक पातळीवरील प्रतिनिधीनी विशेष लक्ष दिले पाहिजे. आपणही सर्वानी प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे मत हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी व्यक्त केले.

आमदार अशोक पवार यांच्या आमदार निधीतून केसनंद तळेरानवाडी रोड साठी 15/-लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. ऑनलाईन पद्धतीने उपस्थितीत मान्यवराच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदीप कंद, माजी सरपंच चंद्रकांत सातव, तालुका युवक अध्यक्ष योगेश शितोळे, मा.अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हवेली तालुका अभिमन्यू हरगुडे पाटील, आप्पासो हरगुडे पाटील, चेअरमन वि.वि.कार्य. सोसायटी तळेरानवाडी योगेश चव्हाण, लखन जाधव, केतन हरगुडे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी
Next articleश्रीमंत प्रतिष्ठानच्या वतीने निराधारांना अन्नदान