पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी

सचिन आव्हाड,पुणे

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती कात्रज कोंढवा रोड गोकुळनगर येथे पूण्य श्लोक अहील्यादेवी प्रतिष्ठाण कात्रज कोंडवाडा रोड , पै विश्वराज तात्या वाघमोडे मित्र परिवार यांच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्वारगेट सारसबाग येथील पुतळ्यास समाज बांधवांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले .

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात साजरी करता आली नसली तरी, पैलवान विश्वराज तात्या वाघमोडे मित्रपरिवार यांच्यावतीने यंदाच्या जयंती महोत्सवाच्या खर्चातून गरजू नागरिकांना अन्नधान्य किट वाटप, गोकुळ नगर येथील नानासाहेब धर्माधिकारी उद्यानात वृक्षारोपण तसेच परिसरातील पोलिस स्टेशन येथे मास्क, सॅनिटायझर,बिसलरी वाटप आदी विविध उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली आल्याची माहिती विश्वराज वाघमोडे यांनी दिली .

पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटरला 700 सलाईन बाटल्या, फळे ,1000 बिस्कीट पुढे, बिसलरी बॉक्स,आदि साहित्य देण्यात आले. या कार्याची दखल घेऊन निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पैलवान विश्वराज तात्या वाघमोडे यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी अतुल बापू पाटील, पोपट बेरे, गोविंद ठोंबरे, सचिन हजारे ,हनुमंत गोफने, महादेव सोलंकर ,कल्याण चोरमले, लक्ष्मण मोठे ,दादासाहेब महारणवर, आदिनाथ हजारे, शिवराज पालवे, रेवन कुरडे, अजित इटनर, शैलेश दादा गाजरे, अमोल हुलगे ,रामभाऊ मोठे ,भाऊ हुलगे,अमोल मापारी, पप्पू बरकडे, नामदेव राख , अमोल मापारी, नितीन पाटील , ज्ञानेश्वर देवकाते, आदिनाथ देवकाते ,दत्ता सातारकर, ब्रह्मदेव मासाळ, गहिनीनाथ ढेंकळे ,संदीप धायगुडे ,हनुमंत ढेकळे, महादेव हजारे ,रामभाऊ शिंदे ,प्रकाश वाघमोडे ,आबा शिंदे ,बाळू गडदे, माऊली गडदे ,महावीर हुलगे, भिवाजी कुराडे ,अॅड. सोमनाथ कोकरे ,अॅड. बपाजीसाहेब मासाळ, आबा पारखे ,आप्पा पाटोळे, अविनाश गोराड ,विशाल खांडेकर, परशुराम चलवादे, प्रवीण माने ,प्रशांत वाघमोडे, पप्पू गोयेकर ,श्रीकांत देवकाते, भाऊ गलांडे ,सागर हुलगे ,आबासाहेब मारकड ,नितीन पालवे ,सुनील पालवे ,देवा कोळेकर, संतोष पारखे, आदी उपस्थित होते.

या जयंती महोत्सव कार्यक्रमास विशेष मार्गदर्शन सतीश मारकड, दत्तूशेठ सोलंकर, चंद्रकांत हंडाळ, भाऊसाहेब डोंबाळे, कैलास हुलगे ,बापूसाहेब ठोंबरे, बिभीषण खरात ,पत्रकार रवी कोपनर, दत्तू डोंबाळे ,आदींचे केले .

Previous articleपुर्व हवेलीतील रिंगरोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
Next articleकेसनंद तळेरानवाडी रोडचे ऑनलाइन भूमीपूजन