वन विभागाच्या कर्मचाऱ्यांंचा सन्मान

जुन्नर- तालुक्यातील वैष्णवधाम गावात ( दि१८. मे) रोजी तरुणावर बिबट्याने हल्ला केला होता. त्या वेळेस जुन्नर वनविभागाने त्वरित सहकार्य करून जखमी तरुण गोपाळ पवार यांची औषध उपचाराची व्यवस्था केली.तसेच हल्लेखोर बिबट्या मुळे गावात दहशतीचे वातावरण तयार झाले होते. मात्र वन विभाने त्वरित कारवाई करत दुसऱ्या दिवशीच बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद केला.

वन विभागाने केलेल्या कारवाई मुळे गावकाऱ्यामधील भीती नष्ट झाली. त्या निमित्त अरुणदादा कबाडी,प्रा.नागेश पवार आणि अनिल बंदावणे यांनी वन विभागाची भेट घेऊन वन विभाग अधिकारी अजित शिंदे,मडके साहेब आणि टोपणे मॅडम यांचा छोटासा सत्कार करण्यात आला.

बऱ्याच वेळा प्रामाणिक अधिकाऱ्यांची समाजाकडून दखल घेतली जात नाही त्यांना पुढील कार्यासाठी प्रेरणाही दिली जात नाही अशी भावना प्राध्यापक नागेश पवार यांनी व्यक्त केली. वन विभागाचे अधिकारी अजित शिंदे हे आमचे कर्तव्य होते अशा भावना व्यक्त केल्या सदरील कार्यक्रमाच्या वेळेस वन विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनासुद्धा एक चांगले काम समाजासाठी प्रामाणिकपणाने केल्याने त्याची दखल कोणी ना कोणीतरी घेत असतो पुढील कार्यासाठी त्यांना ऊर्जा मिळाली असे मत टोणपे मॅडम यांनी व्यक्त केले.

Previous articleमाझ्या उपनगराध्यक्ष पदाचा बनावट राजीनामा तयार केल्याचा संजय घोणे यांचा आरोप
Next articleआमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पै. गणेश बोत्रे युथ फाउंडेशनच्या वतीने ठाकरवाडीत किराणा किटचे वाटप