ओढ्यावरील बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना फायदा

दिनेश पवार,दौंड

दौंड तालुक्यातील लिंगाळी येथील मसनरवाडी,येडेवाडी, खोमणे वस्ती येथील ओढ्यावरती तीन बंधारे बांधून पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम पूर्ण झाले आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी याबाबत वीरधवल जगदाळे यांच्याकडे या कामासंदर्भात मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार येथील ओढ्यावरती तीन बंधारे बांधण्यात आले.यामुळे पाण्याचे योग्य नियोजन होऊन परिसरातील शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे. यामुळे येथील सर्व क्षेत्र बारमाही ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.या कामाबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Previous articleखोरवडी येथे अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
Next articleसामाजिक कार्यकर्ते महादेव पवळे यांचे वृद्धापकाळाने दुख:द निधन