खोरवडी येथे अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

दिनेश पवार,दौंड

खोरवडी (ता.दौंड) येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून साजरी करण्यात आली, कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत सर्व तरुणांनी इतर अनावश्यक खर्च न करता लोकवर्गणीतून अहिल्यादेवी होळकर तरुण मंडळाच्या वतीने गावातील मंदिरात विद्युत उपकरणे बसवून ही जयंती साजरी केली. या उपकरणांचे लोकार्पण सोहळा पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला.

अहिल्याबाई होळकर यांच्या सामर्थ्यशाली कार्याचा आदर्श तरुणांनी घेऊन सामाजिक परिवर्तनाचा वसा घ्यावा असे उपस्थित मान्यवरांच्या मनोगतातून विचार व्यक्त करण्यात आले.

यावेळी गावातील सरपंच शोभा दगडे, उपसरपंच दीपक सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व तरुण वर्ग उपस्थित होते

Previous articleजैदवाडी येथे पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची मोजणी सुरळीतपणे पूर्ण
Next articleओढ्यावरील बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना फायदा