दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि दिव्यांग संस्था यांच्या वतीने कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

नारायणगाव (किरण वाजगे)

दिव्यांग इंडस्ट्रीज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज पुणे आणि दिव्यांग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या कलाकारांना तसेच गरीब, दिव्यांग, आदिवासी, वंचित , दलित व गरजू लोकांना अन्नधान्य तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.नुकतेच नारायणगाव येथे स्थानिक कलाकारांना या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

ज्येष्ठ लावणी व तमाशा कलावंत सीमा पोटे नारायणगावकर, मोहित नारायणगावकर, ज्येष्ठ कलाकार महादेव खुडे, राजेश सांगवीकर, ज्येष्ठ निवेदक व सोंगाड्या सुधाकर पोटे, स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांचे चिरंजीव कैलास व राजेश सावंत, कवी वाजे, श्री भंडारी आदी कलाकारांना या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
पुण्यातील दानशूर उद्योजक दानिश शहा तसेच समाजसेविका कांचन भागवत यांच्या वतीने प्रामुख्याने जुन्नर तालुक्यातील तमाशा कलावंतांना अन्नधान्य किराणा व भाजीपाल्याचे किट मोफत देण्यात आले.

याकामी रघुनाथ येमुल गुरुजी यांचे सौजन्य लाभले.
यावेळी कलाकारांच्या वतीने सीमा पोटे नारायणगावकर यांनी कलाकारांना केलेल्या मदतीबद्दल दानिश शहा व कांचन भागवत यांचे ऋण व्यक्त केले. मोहित नारायणगावकर यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार सुधाकर पोटे यांनी मानले.

Previous articleखडकवासला बॅक वॉटर सिरीज आणि एमटीडीसीचे पानशेत निवास पर्यटकांसाठी सज्ज
Next articleजैदवाडी येथे पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची मोजणी सुरळीतपणे पूर्ण