खडकवासला बॅक वॉटर सिरीज आणि एमटीडीसीचे पानशेत निवास पर्यटकांसाठी सज्ज

पुण्यापासून फक्त २० किमी अंतरावर आहे जगप्रसिद्ध खडकवासला धरण येथून पुढे आहे इतिहासप्रसिद्ध सिंहगड, येथून राजगड व तोरणा या दोन इतिहासप्रसिद्ध किल्यांचे विहंगम दृश्य पहावयास मिळते व गाडीने या किल्ल्यांजवळ जाता येते.येथून जवळच आहेत पानशेत, वरसगांव ही दोन जुळी धरणे (अगदी आजूबाजूला असलेली धरणे.) या दोन्ही धरणांच्या बॅकवॉटर मध्ये वॉटर स्पोर्ट्स ची व्यवस्था आहे. येथून बोटीने लवासा या पर्यटन सिटीला जाता येते. पानशेत धरणापासून १७/१८ किमी वर उत्तरेला टेमघर धरण व दक्षिणेला गुंजवणी धरण आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे या ठिकाणी अत्याधुनिक अशा 35 सुटचे सुसज्ज असे पानशेत पर्यटक निवास आहे. या पर्यटक निवासामध्ये स्विमिंग पुलसह, गार्डन, मुलांच्या खेळण्यासाठी एरिया, कॉन्फरन्स हॉल असुन “वर्क फ्रॉम नेचर” च्या संकल्पनेअंतर्गत वाय-फाय सुविधा देण्यात येत आहे. या ठिकाणी डेस्टिनेशन वेडींग, प्रि-वेडींग फोटो शुट आणि कार्पोरेट कंपन्यासाठी कॉन्फरन्स हॉलची सुविधाही देणत आली आहे. या ठिकाणी महामंडळाचे अद्ययावत उपहारगृह असुन सर्व प्रकारच्या रुचकर पदार्थांबरोबरच स्थानिक खाद्यपदार्थ आणि रुचकर जेवणाची सोय ही करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणुन कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत असुन कर्मचाऱ्यांना आदरातिथ्याचं विशेष प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. सध्याचे वातावरण पाहता पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन महामंडळाच्या पर्यटक निवासात करण्यात येत आहे. उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्यात येत आहेत. त्याचबरोबर पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना साधारणतः पुढील वर्षासाठी कायमस्वरुपी करण्यात येत असुन पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात येत आहे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असुन आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरुन पर्यटक निवासात औषधेपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पर्यटक निवासात पर्यटकांना आयुर्वेदी‍क काढा, व्हिटयॅमिन सी आणि डी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी मुखपटटी, फेसशिल्ड, हातमोजे इ. व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वच पर्यटक निवासातील कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. – श्री. दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे

सदरच्या परिसरात टेंट कॅम्पस, रिसॉर्ट्स, हॉटेल्स, कृषी पर्यटन केंद्रे, फार्म हाऊसेस, गेस्ट हाऊसेस, होम स्टेज, ट्री हाऊसेस असे अनेक पर्याय उपलब्ध असून येथील पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या पर्यटन सेवांमध्ये सुसूत्रता असावी व पर्यटकांना अधिकाधिक चांगली सेवा देता यावी यासाठी एक “कॉमन प्लॅटफॉर्म” तयार केला आहे.

येथील सर्व पर्यटन व्यावसायिक हे पर्यटन व्यवसायासंबंधी अत्यंत जागरूक असून येथील अनेक पर्यटन व्यावसायिक हे डॉक्टर्स, वकील, इंजिनियर्स, टेक्निशियन्स, पत्रकार, प्रोफेसर आहेत. पर्यटन क्षेत्राची आवड आहे म्हणून यांनी या भागामध्ये रिसॉर्ट्स, फार्म हाऊसेस, होम स्टेज, टेंट कॅंम्पस इत्यादी सुरू केले आहेत.

छ्त्रपती शिवाजी महाराजांनी येथील मावळ्यांच्या मदतीने व त्यांच्या बलिदानाने येथेच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती येथील या ज्वलंत इतिहासाची ओळख पर्यटकांना व्हावी यासाठी येथील अनेक रिसॉर्टस मध्ये इतिहासाविषयी माहिती आपल्याला मिळू शकते. या इतिहासप्रसिद्ध भागामध्ये फिरताना आपल्याला त्या ज्वलंत इतिहासाच्या वारसंस्थळांचे प्रत्यक्ष दर्शन घेता येते. अगदी पांडव कालीन पुरातन जागृत देवस्थाने येथे आहेत.

येथे येणाऱ्या पर्यटकाला व त्यांच्या परिवारामधील आबालवृद्ध अशा प्रत्येकाला पर्यटनाविषयी अनेक सेवा सुविधा येथे उपलब्ध आहेत. वॉटर स्पोर्ट्स सोबतच पक्षी संग्रहालय, ऍडव्हेंचर स्पोर्ट्स, रोप क्लायबिंग, हॉर्स रायडींग, जंगल सफारी, ट्रेकिंग, लाईव्ह म्युझीक, जादूचे व मनोरंजनाचे अनेक प्रयोग, टीम बिल्डिंग, कॉर्पोरेट इव्हेंट्स, वन भोजन अशा अनेक ऍक्टिव्हिटीझ येथे उपलब्ध आहेत. येथून जवळच निळळकंठेश्वर, लवासा, खेड शिवापूर, बनेश्वर, प्रती बालाजी अशी अनेक पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची ठिकाणे असून खडकवासला, पानशेत बॅकवॉटर डेस्टिनेशन मध्ये पर्यटक आपल्या परिवारासोबत २ किंवा ३ रात्री स्टे करून या ठिकाणांना भेटी देऊन आपली सुटटी व अनेक कौटुंबिक सेलिब्रेशन्स याठिकाणी साजरे करू शकता.

येथे मल्टी कुझीन रेस्टॉरंट्स सोबतच अस्सल गावरान व्हेज व नॉन व्हेज जेवणही उपलब्ध आहे. येथे अगदी ताजे ताजे मासे, चिकन, मटण तसेच गावरान कोंबड्यांचे चिकन सर्वत्र उपलब्ध असून येथील अनेक रिसॉर्ट्स व हॉटेल्समध्ये स्थानिक भाजीपाला वापरूनच आपल्या आवडीनुसार डिशेस तयार करून सर्व्ह केल्या जातात हे येथील वैशिष्ठ आहे.

खडकवासला-पानशेत बॅकवॉटर सिरीज डेस्टिनेशन मध्ये जल पर्यटन, पावसाळी असंख्य धबधबे, वन पर्यटन, वन्यजीव पर्यटन, साहसी पर्यटन, ट्रेकिंग, ग्राम पर्यटन, कृषी पर्यटन, सिंहगड, राजगड, तोरणा असे किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण व प्राथमिक प्रशासन केंद्र असलेला इतिहासप्रसिद्ध वाडा, अनेक पुरातन जागृत देवस्थाने, पोल्ट्री, डेअरी, फिशरी, पशुखाद्य प्रकल्प पाहणी, पक्षी निरीक्षण, केव्ज, ऐतिहासिक स्थळे, जंगल ट्रेल, होम स्टेज, लॅविष रिसॉर्ट्स, मेडिकल टुरिझम, योगा आणि वेलनेस टुरिझम, विविध यात्रा-जत्रा, थीम रिसॉर्ट्स, लाईव्ह परफॉर्मन्सेस, फार्म फ्रेश उत्पादने विक्री, ग्राम कलाकुसर विक्री, काजवे निरीक्षण, फुलपाखरे निरीक्षण, कारावान, ओपन जीप सफारी, मचाण, वॉचटॉवर, पतंग महोत्सव, फिशिंग, फार्मिंग experience, फुलशेती, फळशेती, फिशपोंड्स, ओपन थिएटर, टेंट कॅम्पिंग, बेटावरील स्टे कॅम्पिंग, प्रति बालाजी, कमर अली दरवेश दर्गा, बनेश्वर सारखी अनेक मंदिरे, पिकनिक स्पॉट्स, ग्रामीण खाद्य संस्कृती, NDA, BSF सारखे भव्यदिव्य कॅम्पस, प्रायव्हेट बंगले, MICE सुविधा, लवासा पर्यटन सिटी हे सगळे सगळे येथे खडकवासला-पानशेत बॅकवॉटर सिरीज डेस्टिनेशन मध्ये तयार असून येथील वेल्हे तालुका ऍग्री अँड रुरल टुरिझम को-ऑप सोसायटी ली. आणि खडकवासला बॅकवॉटर सिरीज टुरिस्ट डेस्टिनेशन फोरम या स्टेकहोल्डर्स असोसिएशन यासाठी कार्यरत असुन पर्यटन सेवांमध्ये सुसूत्रता व व्यावसायिकता आणत आहेत.
येथे अनेक चित्रपट, टीव्ही सिरीज, वेब सिरीज यांचे फार मोठ्या प्रमाणात शूटिंग होत असून प्री-वेडिंग शूट साठी व तसेच डेस्टिनेशन वेडिंग साठी मुंबई, गुजरातसह अनेक ठिकाणांहून येथे फार मोठ्या प्रमाणामध्ये बुकिंग होत आहे. येथील काही रिसॉर्ट्स मध्ये हणीमुनर्स साठी स्वतंत्र कॉटेजेस तयार करून घेतले असून, या थिम्सना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

येथे येण्या जाण्यासाठी शासनाच्या बस, एसटी, खाजगी जीप अशा वाहनांची व्यवस्था असून पर्यटक आपल्या परिवारासाठी सेपरेट लोकल जीप बुक करू शकतो. तसेच अगदी टू व्हीलरने देखील पर्यटक हा संपूर्ण बॅकवॉटरचा सुंदर परिसर फिरून आनंद घेऊ शकतो. येथे लोकल साईटसिंग करण्यासाठी देखील खाजगी जीप भाड्याने मिळतात.

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये शासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुचविलेल्या आवश्यक प्रत्येक बाबींची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासंबंधी येथील प्रत्येक पर्यटन व्यावसायिकाने नियोजन केले असून पूर्णपणे सुरक्षित पर्यटन सेवा सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत.


सर्व पर्यटकांचे खडकवासला-पानशेत बॅकवॉटर सिरीज डेस्टिनेशन मध्ये हार्दिक स्वागत करताना सध्याच्या लॉकडाऊन नंतर पर्यटकांनी आपल्या परिवारासोबत, मित्रमंडळींसोबत तसेच कंपनीमधील सहकाऱ्यांसोबत खडकवासला बॅक वॉटर सिरीज मधील पर्यटन स्थळांना एकवेळ नक्की भेट द्यावी अशी विनंती मा. श्री. आनंद गोरड, चेअरमन, वेल्हे तालुका ऍग्री अँड रुरल टुरिझम को-ऑप सोसायटी ली. आणि खडकवासला बॅकवॉटर सिरीज टुरिस्ट डेस्टिनेशन फोरम यांनी केली आहे.

अधिक माहितीसाठी 9325771201 या क्रमांकावर पर्यटकांनी आपला ट्रॅव्हल प्लॅन Whats App वर कळवावा, जेणेकरुन पर्यटकांना उत्तम प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध करुन देता येतील.श्री. दिपक हरणे,प्रादेशिक व्यवस्थापक,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे.

Previous articleमराठी पत्रकार संघाचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकारांचे विविध समस्याबाबत राज्यपालांना साकडे
Next articleदिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि दिव्यांग संस्था यांच्या वतीने कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप