आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना प्रतिबंधात्मक आरोग्य किटचे वाटप

चाकण- खेड आंळदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योजक सुनिल पोटवडे यांनी खाजगी व सरकारी हाँस्पिटलला कोरोना प्रतिबंधक आरोग्य साहित्याची भेट दिली.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सुनिल पोटवडे यांनी सहकार्याचा हात पुढे केला असून, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून चाकण परिसरातील हाँस्पिटलला कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पार्श्वभूमीवर सॅनिटायझर, सोडियम हायड्रॉक्लोराईड, थर्मामीटर व मास्क आदी वस्तूंचे मोफत वितरण केले आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला ताई पानसरे,माजी सभापती चंद्रकांत दादा इंगवले, माजी विलास कातोरे, माजी उपसभापती अशोक दादा राक्षे, युवा उद्योजक मयुरशेठ मोहिते , काळुस गावचे सरपंच गणेश पवळे, यशवंत खैरे, योगेश आरगडे, माजी सरपंच पवन जाचक, सदस्य दत्ताभाऊ पोटवडे, नवनाथ पोटवडे ,गणेश पोटवडे, दत्ता पोटवडे ,संदिप खैरे, बारकूशेठ जाचक चेअरमन, धोंडीभाऊ पवळे उपस्थित होते.

Previous articleकरोडो रुपये खर्च करून केलेले भावडी रोडचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे
Next articleमराठी पत्रकार संघाचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकारांचे विविध समस्याबाबत राज्यपालांना साकडे