करोडो रुपये खर्च करून केलेले भावडी रोडचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे

वाघोली /प्रतिनिधी :-मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून वाघोली ते भावडी रोडचे काम करोडो रुपये खर्च करून करण्यात आले आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले असून लगेच रस्त्याला मोठ मोठे तडे गेले आहेत.तर हे काम करत असताना रस्त्याच्या कडेला अडथळा ठरणारे विद्युत पोल देखील काढले गेले नाहीत.तर काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईट पट्ट्या देखील भरलेल्या नाहीत.त्यामुळे वाघोली ते भावडी रोडवर वारंवार अनेक अपघात होऊन कित्येक जण मृत्युमुखी पडले आहेत.तर काही जणांना कायमचे अपंगत्व देखील आले आहे.तर पाच नंबर खाणीपासून सुरभी हॉटेल पर्यंत पीएमआरडीएच्या माध्यमातून फंड उपलब्ध करून रोडचे काम करण्यात आले आहे.

खाण उद्योगाच्या जड वाहतुकीमुळे वाघोलीत होणारी नित्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून ह्या रस्त्याचे काम करण्यात आहे.मात्र हे काम देखील अतिशय निकृष्ट व दर्जाहीन झाले आहे,येथे देखील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईट पट्ट्या देखील भरल्या गेलेल्या नाहीत.यामुळे अशा निकृष्ट दर्जाच्या व अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी भावडी रोडने येजा करणाऱ्या नागरिकांकडून व ग्रामस्थांकडून केली जात आहे.

तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून असे निकृष्ट दर्जाचे व अर्धवट काम करून संपूर्ण कामाचे बिले काढण्यासाठी मदत करणाऱ्या साईट अधिकारी व ठेकेदार यांची चौकशी करून संमधीतावर त्वरित कारवाई करावी अन्यथा भाजपच्या वतीने संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर जनआंदोलन उभारले जाईल अशा इशारा लेखी पत्राद्वारे भाजपचे युवा मोर्चा सरचिटणीस संदीप सातव यांनी दिला आहे..

वाघोली ते भावडी व पाच नंबर खाण ते सुरभी हॉटेल पर्यंतचा सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून सर्वच ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत, साईट पट्ट्या भरल्या गेल्या नाहीत रस्त्यात अडथळा ठरणारे लाईटचे पोल काढले गेले नाहीत यामुळे अपघात झाले आहेत.त्यामुळे मिलीभगत दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.या निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला वाघोली परिसरातील दुसरे एक काम मंजूर करण्यात आले आहे.त्यामुळे नवीन मंजूर झालेले काम देखील संबंधित ठेकेदाराकडून काढून घेऊन या ठेकेदाराला तात्काळ काळ यादी टाकावे- संदीप सातव , संघटन सरचिटणीस पुणे जिल्हा भाजयुमो

Previous articleनुकसानग्रस्त मेंढपाळांना मदत मिळवून देऊ : गणेश बोत्रे
Next articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना प्रतिबंधात्मक आरोग्य किटचे वाटप