नुकसानग्रस्त मेंढपाळांना मदत मिळवून देऊ : गणेश बोत्रे

चाकण- सांगुर्डी परिसरात अवकाळी पावसाने मेंढ्या मृत्यू पडल्याने मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पै.गणेश बोत्रे यांनी पाहणी केली.

यावेळी मेंढपाळाची गाऱ्हांनी ऐकून घेतल्यानंतर सरकारने तातडीने आर्थिक मदत केली पाहिजे असे गणेश बोत्रे सांगितले.

यावेळी मेंढपाळ बांधवांना भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करीन असे आश्वासन बोत्रे यांनी दिलेेेे.

 

परिसरातील नुकसानग्रस्त मेंढपाळांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी मेंढपाळांनी आपले गाऱ्हाणे मांडून त्वरित मदतीची अपेक्षा व्यक्त केली. तातडीने नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे, असे गणेश बोत्रे म्हणाले.

यावेळी नितीन गाडे, सुधीर गाडे, समीर भसे, सोमनाथ भसे,विजय बोत्रे, अनिकेत गाडे,ऋषभ बोत्रे, प्रसाद गाडे,ऋषिकेश ससे,विनीत लोणारी आदी उपस्थित होते.

Previous articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पै.गणेश बोत्रे युथ फाउंडेशनच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप
Next articleकरोडो रुपये खर्च करून केलेले भावडी रोडचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे