आशा सेविकांचे प्रश्न मार्गी लावणार-पासलकर

दिनेश पवार,दौंड

कोरोनाविरूद्धच्या लढाईत स्वत:चा जीव धोक्यात घालून तालुक्यातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल “आशा” सेविकांप्रती “कृतज्ञता” व्यक्त करणेसाठी शिवसेना विभागप्रमुख हनुमंत निगडे व शिवसेनेच्यावतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला येथे “कृतज्ञता कार्यक्रम” आयोजित केला होता यावेळी जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते आशा सेविकांना वाफेच्या मशीनचे वाटप करण्यात आले.
यावेळी आशा सेविका यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे पासलकर यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व आशा सेविकांची पासलकर यांनी विचारपूस केली असता , आशा सेविकांनी त्यांना दोन-तीन महिन्यांनी मिळणारे
मानधन, तुटपुंजे मानधन, आशा सेविकांचे बिघडलेले कौटुंबिक अर्थकारण याबाबतच्या व्यथा व समस्या मांडल्या.

यावेळी पासलकर म्हणाले की, आशा सेविका या कोरोना लढाईतील महत्वाचा घटक असून, जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला
करीत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य
सुविधा पुरविण्यासाठी ग्रामीण जनता व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यामध्ये आशा
सेविका महत्वाचा दुवा आहेत.

कोरोना काळात ग्रामीण भागातील लोकांना
स्वच्छता, लसीकरण, ग्रामीण महिलांना बाळंतपण सुखरुप प्रसुती, लसीकरण,गर्भप्रतिबंधक उपाययोजना, बालकांना पूरक आणि पोषण आहारासह जवळपास ७८
कामांचा भार आशा सेविकां सांभाळत असल्याने आशा सेविकांचे या योगदानाबद्दल शिवसेना दौंडच्या वतीने मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त कण्यात आली.

पासलकर पुढे म्हणाले की, आशा सेविकांना आर्थिक पाठबळ देणे अत्यंत आवश्यक असून, आशा सेविकांच्या व्यथा शासनस्तरावरून सोडविण्या साठी योग्य ते सर्व प्रयत्न करणार आहे.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख देविदास दिवेकर, शिवसेना दौंड तालुका महिला संघटिका छाया जगताप, स्वाती ढमाले, रेखा शितोळे, माऊली आहेर, प्रशांत जगताप, शंकर शितोळे, बाळासाहेब कोंडे, गणेश गायकवाड व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleचंद्रकांत शिंदे यांच्या वतीने आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क , सेनीटायझरचे वाटप
Next articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पै.गणेश बोत्रे युथ फाउंडेशनच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप