सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरेंद्र पठारे फाऊंडेशन कटिबद्ध

अमोल भोसले पुणे

सामाजिक जीवनात तुम्ही तुमच्या लोकांसाठी सहजरित्या उपलब्ध असणे फार गरजेचे असते. भेडसावणाऱ्या समस्येला काळ वेळ काही माहीत नसते. सध्याचा काळ हा वेळेला धावून जाण्याचा आहे त्यामुळे माझा मोबाईल नंबर कायमच माझ्या लोकांसाठी सुरू ठेवलेला असल्याचे सुरेंद्र पठारे यांनी सांगितले.

काल आपल्या खराडी येथील विडी कामगार वासाहती मधून काही नागरिकांनी फोन करून त्यांच्या भागात बोलावून घेतले. त्यांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांनी माझ्यासमोर मांडल्या. ड्रेनेज व्यवस्थापना संदर्भातील, रस्त्यांवरील खड्डयांसंदर्भातील आणि पाण्याविषयी काही समस्या नागरिकांनी मांडल्या. याव्यतिरिक्त नागरिकांनी मांडलेल्या इतरही समस्या माझ्या नजरेस पडल्या. या समस्या प्रशासनाकडून सोडवल्या जाव्यात यासाठी पाठपुरावा केला जाईल तसेच ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’ कडूनही हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, मार्गी लावण्यासाठी ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’ कटिबद्ध असल्याचे सुरेंद्र पठारे यांनी सांगितले.

Previous articleकर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रमाचा पदवीदान समारंभ संपन्न
Next articleपत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडीतील सर्व घटक एकत्र बसून निर्णय घेऊ- उपमुख्यमंत्री अजित पवार