कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रमाचा पदवीदान समारंभ संपन्न

गणेश सातव

पुणे – देशातील मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षितांचे प्रमाण हे आपल्याकडील मानसिक रुग्णांच्या तुलनेत अतिशय तोकडे असून कर्वे समाज सेवा संस्थेचा समुपदेशन अभ्यासक्रम पूर्ण करून मानसिक आरोग्य व समुपदेशन क्षेत्रामध्ये पदार्पण करीत असलेल्या समुपदेशकांच्या रूपाने या क्षेत्राला उत्तम प्रकारचे प्रशिक्षित समुपदेशक मिळणार असल्याचे मत वर्ल्ड सायकीयाट्रीक असोशिएशनचे प्रतिनिधी आणि इंडियन सायकीयाट्रीक सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा असोशिएशन ऑफ इंडस्ट्रीयल सायकीयाट्री चे विद्यमान अध्यक्ष डॉ (ब्रिगेडियर) एम एस व्ही के राजू यांनी व्यक्त केले. तसेच अलीकडील काळात बालकांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली दिसून येत असून बालकांच्या विविध समस्यांवर समुपदेशन करणारे प्रशिक्षित बाल समुपदेशक हे मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हावेत अशी अपेक्षा देखील यावेळी डॉ (ब्रिगेडियर) राजू यांनी व्यक्त केली.कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रमाच्या पदवीदान समारंभामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या माजी मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ मेधा कुमठेकर, समन्वयक प्रसाद कोल्हटकर, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर व समुपदेशन अभ्यासक्रम प्रमुख प्रा चेतन दिवाण यांची प्रमुख उपस्थिती होती तर संस्थेचे व्हाईस चेअरमन विनायक घोरपडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

डॉ मेधा कुमठेकर यांनी यावेळी समुपदेशक हा कसा असावा आणि त्याने समुपदेशन करताना नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याविषयी समुपदेशन क्षेत्रामध्ये प्रवेश करीत असलेल्या नूतन समुपदेशकांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले.

समन्वयक प्रसाद कोल्हटकर,  प्र.संचालक डॉ महेश ठाकूर व समुपदेशन अभ्यासक्रम प्रमुख प्रा.चेतन दिवाण यांनी कर्वे समाज सेवा संस्थेच्या माध्यमातून बाहेर पडत असणाऱ्या भावी समुपदेशकांना समुपदेशन व मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये मिळालेले प्रत्यक्ष क्षेत्राकार्यावर आधारित प्रशिक्षण तसेच त्यांनी मिळवलेल्या ज्ञानभांडाराच्या आधारे त्यांनी मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
गेल्या पाच वर्षांमध्ये कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे समाजामध्ये उत्तम समुपदेशकांची भूमिका पार पाडत असून इथेन पुढील काळामध्ये देखील महर्षी धोंडो केशव कर्वे (अण्णा) यांच्या ज्ञानदानाचे आणि समाजसेवेचे व्रत अखंडपणे सुरु ठेवण्याचे काम हे नवीन समुपदेशक करतील तसेच तळागाळापर्यंत समुपदेशन सेवेचा लाभ पोहोचवतील असा विश्वास पदवीदान समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक घोरपडे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केला.

पदवीदान समारंभ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा चेतन दिवाण,डॉ महेश ठाकूर व प्रसाद कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ कल्याणी तळवेलकर, डॉ स्नेहा मुलचंदानी,वृषाली दिवाण, रूपा साळवी,आसावरी पाटणकर,सुहास कुलकर्णी,राम बडकर,मेधा पुजारी, अरुंधती कुलकर्णी,किशोर कोंढाळकर,मोतीलाल सोनटक्के,संजीवनी मुंढे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ कल्याणी तळवेलकर व डॉ स्नेहा मुलचंदानी यांनी केले तर आभार राम बडकर यांनी मानले.

Previous articleसमाजातील संवेदनशील नागरिकांकडून सामाजिक भावनेतून कोविड सेंटरला मदत
Next articleसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरेंद्र पठारे फाऊंडेशन कटिबद्ध