समाजातील संवेदनशील नागरिकांकडून सामाजिक भावनेतून कोविड सेंटरला मदत

कोरेगावमुळ
डाॅ मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठान उरुळी कांचन यांच्या वतीने कोरेगावमूळ येथील कोविड सेंटरला प्रतिष्ठानच्या वतीने तीन पोती गहू देण्यात आला. त्या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय कांचन, उपाध्यक्ष सुनील गोते, सचिव रोहिदास कोतवाल, कार्याध्यक्ष सागर कांचन, खजिनदार सोमनाथ कोतवाल, जेष्ठ विश्वस्त संजय टिळेकर, संतोष दौंडकर, पोपट साठे यांनी कोरेगावमुळचे सरपंच विठ्ठल शितोळे, उपसरपंच नंदू कड, यशोदा मंगल कार्यालयाचे मालक अमोल भोसले, ग्रामपंचायत सदस्य भानुदास जेधे, दत्तात्रय काकडे, नितीन कड यांच्या कडे सुपूर्द केला.
प्रतिभा आरोग्य मंदिराला (कोविड केअर सेंटर) समाजातील संवेदनशील नागरिकांकडून मदतीचा ओघ सुरूच प्रतिभा आरोग्य मंदिरातील रुग्णांना मदत व्हावी म्हणून माजी सरपंच राजेंद्र रतन चौधरी व विद्यमान सदस्या अश्विनी योगेश चौधरी यांनी स्वतःच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येकी ११०००/-  रुपयांचे धनादेश, तर हडपसर येथील उद्योजक रोहित थेऊरकर यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने ११०००/- रुपयांचा धनादेश रावलक्ष्मी फाऊंडेशनला आमदार अशोक पवार यांच्या कडे सुपूर्द केला
रोटरी क्लब तर्फे कोरेगावमुळ येथील यशोदा मंगल कार्यालय, केंद्र क्र.५ येथील रुग्णांसाठी सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, पीपीई किट, मेडिसिन, मास्क, खाद्यतेल, गव्हाचे पीठ, तांदूळ, तूरडाळ, मुगडाळ, हरभरा डाळ व मसाले इत्यादी किरणामाल देण्यात आला.
स्वागत हॉटेलचे मालक सुधीर कुंजीर यांनी त्यांचे चिरंजीव कु.गौरव कुंजीर यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांसाठी ५ किलो चिकन व २०० अंडी भेट म्हणून दिले. यावेळी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरदादा जांभळकर, उपसभापती विकास शिवले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष माऊली थेऊरकर तसेच प्रसिद्ध उद्योजक पांडुरंग ढगे उपस्थित होते.
Previous articleदेऊळगाव राजे कोविड सेंटरला आमदार कुल यांची भेट
Next articleकर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रमाचा पदवीदान समारंभ संपन्न