शिंदवणे घाटातील रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करा- आमदार अशोक पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिंदवणे घाटामध्ये मागील काही दिवसापासून अपघात होण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे भिषण झालेल्या अपघातामुळे मृत्यू होत आहे. यासाठी शिंदवणे गावचे माजी सरपंच आण्णासाहेब महाडिक यांनी शिंदवणे घाटात वारंवार होत असलेल्या अपघाताची दखल घेत व पाठपुरावा करत शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार , उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, हवेली तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील, अप्पर तहसिलदार हवेली विजयकुमार चोबे, यांना शिंदवणे घाट येथे सतत होणाऱ्या घटनास्थळी प्रत्यक्ष घेऊन गेले असता सदर ठिकाणी आमदार अशोक पवार यांच्या गाडीसमोरच एक पीकअपचा अपघात झाला हे प्रत्यक्षात पाहिल्यानंतर ताबडतोब संबंधित अधिकारी यांना फोन करून लवकरात लवकर काम करण्याचे आदेश दिले. बाह्यवळणावर कठडे बांधण्याचे व रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे आदेश दिले.

यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, हवेली तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील, अप्पर तहसिलदार हवेली विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, मंडल अधिकारी दीपक चव्हाण, तलाठी अधिकारी प्रदीप जवळकर,आदि उपस्थित होते.

Previous articleकृषीनिष्ठ शेतकरी गणपत कड यांचे अल्पशा आजाराने निधन
Next articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने किराणा किटचे वाटप