कृषीनिष्ठ शेतकरी गणपत कड यांचे अल्पशा आजाराने निधन

अमोल भोसले,उरुळी का़ंचन

शिंदवणे गावचे प्रगतिशील शेतकरी व क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय फलोत्पादन मिशन पुणे जिल्हा कमिटीचे माजी सचिव, हवेली तालुका शेतकरी शास्त्रज्ञ कृषी मंचाचे अध्यक्ष गणपतराव महादेव कड यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याशी संबंधित विविध शासकीय कमिट्यांचे अशासकीय सदस्य म्हणून वेळोवेळी कार्यरत होते.

तसेच आमदार अशोक पवार, माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार अशोक टेकवडे, कृषी शिक्षण परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांचे निष्ठावान सहकारी म्हणून हवेली तालुक्यात परिचित होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले, मुलगी, सुन, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे धाकटे बंधू संपत कड यांचे पंधरा दिवसांपूर्वीच दुःखद निधन झाले होते. तिनं आठवड्यात दोन सख्ख्या भावांचे निधन होण्याची पूर्व हवेलीतील ही पहिलीच घटना आहे

Previous articleमोहीनी राक्षे यांची क्राईम बाॅर्डर वृत्तपत्राच्या खेड तालुका प्रतिनिधी पदी नियुक्ती
Next articleशिंदवणे घाटातील रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करा- आमदार अशोक पवार