महागांव मध्ये भगवान सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य किटचे वाटप

पवनानगर -कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाच्या विकेंड लाँकडाऊन च्या निर्बंधांमुळे अनेकांचे रोजगार गेले, तर अनेकांना दैनंदिन अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक चणचण भासू लागली असताना महागाव येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान सावंत व सावंतवाडी ग्रामविकास मंच यांच्या प्रयत्नांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (पुणे) यांच्या वतीने महागांव गावातील वाड्या वस्त्यावर गरजुंपर्यंत अन्नधान्य किट उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यापीठाचे प्राध्यापक प्रकाश यादव यांना केली आणि लगेचच त्यांचा होकारार्थी प्रतिसाद मिळाला.

महागाव पंचक्रोशीतील मालेवाडी, धनगरवाडा, धालेवाडी, दत्तवाडी, निकमवाडी, प्रभाचीवाडी, सावंतवाडी, गावठाण येथील आदिवासी, विधवा भगिनी, निराधार महिला, दिव्यांग व्यक्ती अशा निवडक १२१ गरजुंना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.मदत स्विकारल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील क्षणिक आनंद हेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ( पुणे) यांच्या कामाचं फलित आहे असे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्राध्यापक प्रकाश यादव यांनी बोलताना सांगितले.

यावेळी महागांव ग्रामपंचायत चे सरपंच सोपान सावंत, उपसरपंच उर्मिला पडवळ, माजी सरपंच सुरेशशेठ कुंभार, माजी उपसरपंच भाऊ सावंत,पांडुरंग पडवळ, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक धोडिंबा घारे, वसंत तिकोणे, सावंतवाडी चे पोलीस पाटील प्रल्हाद घारे, प्रभाचीवाडी पोलीस पाटील नामदेव डोंगरे, महागांव ग्रामपंचायत सदस्य संतोष घारे, केशव सावंत, भानुदास बहिरट, यमुनाताई मरगळे,शिक्षण समिती अध्यक्ष जनार्दन वावळे, अध्यक्ष लहुभाऊ पडवळ, माजी अध्यक्ष दशरथ सावंत, लक्ष्मण मरगळे, खंडु मरगळे, अनंता सावंत, निलेश सावंत, भगवान सावंत हे उपस्थित होते.

Previous articleवाघोलीतील फर्निचर दुकानाला लागली भीषण आग
Next article‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम पेठ ग्रामपंचायतने यशस्वी राबवली