वाघोलीतील फर्निचर दुकानाला लागली भीषण आग

वाघोली /प्रतिनिधी :

वाघोली ता:( हवेली)येथील पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या पानमळा येथील एचपी पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या फर्निचर शोरूमला आग लागून यामध्ये संपुर्ण साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी रोजी एक वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.बाजूच्या दुकानामधील सामान जळण्यापासून वाचवण्यात यश आले आहे.तर स्थानिक नागरिक,पीएमआरडीए अग्निशमक दलाच्या व लोणीकंद पोलिसांच्या प्रयत्नातून दोन तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.


याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार,नगर रोडवरील फर्निचर शोरुम आहे त्या ठिकाणी गाद्या व इतर घरगूती फर्निचर तयार करून विक्री केले जाते त्याला दुकानाला ही आग लागली होती.आग इतकी प्रचंड होती की त्या आगीने रौद्ररूप धारण केले होते.जवळच असलेल्या माजी जि,प,सदस्य रामदास दाभाडे, काका जाधवराव व स्थानिक ग्रामस्थांसह पाण्याचे टँकर बोलून आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली तर ही आग विझविण्यासाठी सचिन महाजन यांच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीए, अग्निशमन दलाचे तीस जवान व एकूण चार गाड्या दाखल झाल्या होत्या.अग्निशमन दलाने या आगीवर दोन तासांत नियंत्रण मिळविले असले तरी या आगीची झळ बाजूच्या दुकानातील थोडेफार साहित्य तसेच ऑफिस मधील संगणक,फाईल्स व कागदपत्रे जळून खाक झाले.आगीवर अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळविले अन्यथा बाजूची दुकानं जळून खाक झाला असती तर मोठी दुर्घटना घडली असती परंतु वाघोली ग्रामस्थांच्या आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली हेच म्हणावे लागेल.

*************
१)वाघोलीत अनेक मोठे गोडाऊन आणि शोरूम असून त्यांना अद्यावत कर्मचारी,सेक्युरीटी आणि आग रोधक साहित्य नाहीत.

२)परिसरातील गोडाऊन चे फायर ऑडिट आतापर्यंत करून घेण्यात आलेलेच नाहीत ही बाब उघड झाली आहे.

३)आग विझविण्यासाठी लागणारी यंत्रणा व शोरूम व्यवस्थापन अपयशी ठरले असल्याचे मदतीसाठी धावलेल्या स्थानिक तरुणांनी सांगितले.

४)व्यावसायिकांच्या चुकी मुळे सर्वच यंत्रणेला धरले जाते वेठीस, इन्शुरन्स साठी नुकसान होते लाखात दाखविले जाते करोडोत.

आग लावली कि लागली ?

एक वर्षात पाच ठिकाणी लागल्या आगी.

कटकेवाडी येथील एका नामांकित कंपनीच्या गोडाऊनला आग लागली होती ती आग दोन दिवस धुमसत होती.या सर्व घडामोडी मुळे वाघोली परिसरातील गोडाऊन आणि शोरूमला आग लावली जाते का ? लागते ? असा प्रश्न सर्वसामान्य पडला असून याची चर्चा वाघोली परिसरात सुरू आहे.

Previous articleपाऊसाळ्यापूर्वी पवनानगर ते धालेवाडी रस्ता करा… लोकप्रतिनिधी चे व प्रशासनाचे दुर्लक्ष
Next articleमहागांव मध्ये भगवान सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य किटचे वाटप