पाऊसाळ्यापूर्वी पवनानगर ते धालेवाडी रस्ता करा… लोकप्रतिनिधी चे व प्रशासनाचे दुर्लक्ष

पवनानगर – बाजारपेठेला जोडणारा पवनानगर धालेवाडी रस्ता पूर्णपणे खड्ड्येमय झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.दरवर्षी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येते. परंतु रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्यामुळे काम झाल्यानंतर तीन ते चार महिन्यांमध्ये रस्ता पूर्णपणे उखडला जातो.

या रस्त्यावरून धालेवाडी,मालेवाडी,दत्तवाडी,निकमवाडी अशा गावाकडे हा रस्ता जात असतो.या रस्त्यावरुन शाळेतील विद्यार्थी, दुग्ध व्यवसाय, शेतकरी, कामगार, असल्यामुळे वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात होत असल्या कारणाने रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला .खराब रस्त्यामुळे या भागात टू व्हीलर फोर व्हीलर यांचे छोटे-मोठे अपघात नेहमी घडत असतात, तसेच गाड्याचा मेंटनस वाढत असून नागरिकांना एन कोरोना काळात पाठीचे व मणक्याचे त्रास आधिक बळावत आहेत.

या रस्त्यासाठी लोक प्रतिनिधी यांनी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम तातडीने पावसाळ्याच्या अगोदर हाती घेऊन रस्त्या पूर्ववत करावा, आशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहेनगर ते धालेवाडी हा रस्ता येत्या एक दोन आठवड्यात सुरु करणार असून या रस्त्यासाठी जिल्हा वर्षीक योजनातून ३०-५४ अंतर्गत सुमारे ३० लाख रुपये मंजूर झाले आहे- सुरेश कानडे उपभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मावळ

Previous articleढगफुटीमुळे पिकाच्या झालेल्या नुकसानीचे धनादेश वाटप
Next articleवाघोलीतील फर्निचर दुकानाला लागली भीषण आग