आमले परिवार बनले अपंग व्यक्तीचा आधार..!

अमोल भोसले

कोरोना काळात श्रीमंत प्रतिष्ठाणच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात अखंड अन्नदान सेवा सुरू आहे. 25 मे रोजी दगडुशेठ हलवाई गणपती मंदीराबाहेर एक अपंग वारकरी व्यक्ती प्रतिष्ठाणच्या सभासदांना दिसली व चौकशी केली असताना त्यांना वाॅकर ची गरज असल्याचे समजले. 2 दिवसातच अनिलराव आमले यांच्या वतीने त्यांना वाॅकर देण्यात आला.

यावेळी अथर्व जरे, समीर आमले, गणेश शिंदे, बंटी शिंदे व प्रथमेश गुंड उपस्थित होते. कोरोना काळात श्रीमंत प्रतिष्ठाण शक्य त्या स्वरूपात संपूर्ण पुणे शहरातील निराधारांना मदत करत आहे. आपणही सदगुरू श्री शंकर महाराज व गुरूवर्य बाप्पू महाराज भिंताडे यांच्या आशिर्वादाने ही निस्वार्थ मदत केल्याचे अनिलराव आमले यांनी सांगितले.

Previous articleनारायणगाव ,वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा शुभारंभ
Next articleढगफुटीमुळे पिकाच्या झालेल्या नुकसानीचे धनादेश वाटप