सागाचे झाडे विक्रीवरून एकास बेदम मारहाण

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

म्हाळुंगे तर्फे सुपेघर- ( ता . आंबेगाव ) येथे सागाची झाडे विक्रीच्या कारणावरून एकाला मारहाणकरत शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत मंगेश तुकाराम कोकणे ( वय ३१ रा.म्हाळुंगे तर्फे सुपेघर ता.आंबेगाव,पुणे) यांनी तक्रार दिली आहे.

फिर्यादी कोकणे यांचा झाडे कटाईचा व्यवसाय असून त्याने हरीचंद्र खंडु तऴेकर रा. तऴेकर वाडी तां.आंबेगाव जि.पुणे यांची सागाची तोडलेली लाकडे विकत घेतली होती त्याची पुर्ण कारदेशीर परवानगी वनविभाग घोडेगाव यांच्याकडे काढून ती लाकडे दि. 11 रोजी तळेकर येथूनगाडीमध्ये भरुन ती विक्रीसाठी हैद्राबाद येथे चालविली होती.तेंव्हा तेथे दादाभाऊ गणपत इंगवले व लक्ष्मण नाना इंगवले हे तेथे आले व आम्ही तुमची मालाची गाडी येथुन बाहेर जावु देणार नाही आम्हाला दुर-या व्यापा-याकडुन पैसे घ्यायचे आहेत त्याला फोन करुन बोलावुन घ्या असे म्हणुन फिर्यादिस शिवीगाऴ दमदाटी करु लागले त्यानंतर प्रवीण लक्ष्मण इंगवले याने जवऴच असणा-या उकिर्ड्याचे बाजुला पडलेली लाकडी काठीने मारहाण केली तसेच दादाभाऊ गणपत इंगवले व लक्ष्मण नाना इंगवले यांनी हाताने लाथाबुक्कानी मारहाण करुन शिवीगाऴ दमदाटी केली . याबाबत मंगेश कोकणे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तिघाविरोधात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleवाडा गावात आवश्यकता नसल्यास प्रवेश करू नका पोलीस पाटील दिपक पावडे यांचे आवाहन
Next articleनियम मोडणाऱ्या तीन दुकानदारांवर मंचर पोलिसांची कारवाई