सलून व्यावसायिक आर्थिक अडचणीत

दिनेश पवार – दौंड

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या वतीने सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेता हे लॉकडाऊन वेळोवेळी वाढवण्यात आले,अत्यावश्यक सेवा साठी शासनाकडून काही नियम देऊन सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे,सलून व्यावसाय गेली कित्येक दिवसापासून बंद ठेवण्यात आला आहे .

यामुळे या व्यावसायिकासमोर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे,दुकानाचे भाडे,लाईट बिल,दैनंदिन गरजा या भागवण्यासाठी खूप अडचणी येत असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले, यासाठी काही तरी मदत मिळणे गरजेचे आहे अशी मागणी सलून व्यावसायिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

आमच्या प्रतिनिधी शी काही व्यावसायिकांनी संवाद साधला यामध्ये व्यवसाय बंद असल्याने घरात किराणा,भाजीपाला आशा आवश्यक गरजा भागविण्यासाठी सुध्दा खूप संघर्ष करावा लागत असल्याचे मत या व्यावसायिकांनी व्यक्त केले तरी आम्हाला काही तरी मदत मिळावी अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे.

यामध्ये दत्ता राऊत,भगवान बंड, विजय ताटे,निरंजन पंडित, धनंजय ताटे,प्रवीण पंडित,हनुमंत जाधव,दादा काळे, अक्षय पंडित यांनी आपल्या व्यथा आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मांडल्या

Previous articleमळवंडी ठुले येथील नागरिकांना धान्य वाटप
Next articleदौंड मध्ये शिवसैनिकांकडून एक घास आपुलकीचा उपक्रम