मळवंडी ठुले येथील नागरिकांना धान्य वाटप

 

तळेगाव दाभाडे-कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि.३१ मे पर्यंत लाँकडाऊन सुरु केले आहे.दुर्गम भागातील नागरिकांना मोलमजुरी चे काम मिळत नसल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याने मळवंडी ठुले येथील डोंगर भागात राहणा-या धनगरवस्तील नागरिकांना व गावातील गरीब व गरजू नागरिकांना “माही फाऊंडेशन” ह्या संस्थेतर्फे गहू, तांदूळ,तेल,साखर अशा जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

धान्य व किराणा वाटप करताना “माही फाऊंडेशन”चे अध्यक्ष सुनिल बेनगुडे, संस्थापक विद्या बेनगुडे पोलीस पाटील अंजली सुतार व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.गरजू लोकांना अडचणीच्या काळात संस्थेकडून मदत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

Previous articleजरेवाडी येथे हुमणी किड नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांची प्रात्यक्षिके
Next articleसलून व्यावसायिक आर्थिक अडचणीत