वाडा गावात आवश्यकता नसल्यास प्रवेश करू नका पोलीस पाटील दिपक पावडे यांचे आवाहन

राजगुरुनगर-खेड तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णाची संख्या वाढत चाललेली आहे. मात्र खेड तालुक्याच्या पश्चिम भागात लोक काळजी घेताना दिसत नाही. प्रशासनाने वारंवार आवाहन करून देखील मास्क न लावणे, विनाकारण गावातून फिरणे, असे प्रकार चालु आहेत. वाडा गावात दि 15/07/2020 रोजी एक कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढलेला आहे.

वाडा गावात भर चौकात कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढलेला आहे. पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, कोरोना समिती, पोलीस प्रशासन वारंवार सूचना देत आहे. मात्र लोकांना वाडा गाव कोरोना विषाणू प्रतिबाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे.

वाडा गावाच्या पोलीस पाटील दीपक पावडे यांच्या वतीने नागरिकांना घरी राहण्याच्या व सुरक्षित राहण्याच्या योग्य त्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.

Previous articleकोरोना प्रतिबंधक उपकरणे, साधनांचे शासकीय दरपत्रक निश्चित करण्याची नितीन वाघ यांनी विभागीय आयुक्तांकडे केली मागणी
Next articleसागाचे झाडे विक्रीवरून एकास बेदम मारहाण